Jump to content

सदस्य चर्चा:Shriniwas Hawaldar

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Shriniwas Hawaldar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Shriniwas Hawaldar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०७ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :



मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १०:१८, २७ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]


महोदय , मी संपादन करताना default settings मध्ये बदल झाला आहे. ==संदर्भ== नंतरचे 'संपादन ' लुप्त झाले आहे आहे . कृपया सुधार करावा म्हणजे संपादन करणे शक्य होईल. धन्यवाद


काम झाले आहे. तरी सुद्धा दृष्य आपणास अभिप्रेत असे न दिसल्यास ब्राऊजर (न्याहाळक) रिफ्रेश करावा. तरीही प्रॉब्लेम आल्यास आपला ब्राऊजर कोणता ते कळवा सविसतर माहिती देईन.
त्रुटी == चिन्हाच्या बाहेर ==संदर्भ== च्याच ओळीत लेखन (अनवधानाने) झाल्याने आली असावी. ==चिन्हे== विभाग शीर्षक निर्मितीकरता वापरली जातात. विभाग शीर्षकाशिवायचे लेखन त्या नंतरच्या ओळीपासून करावयाचे असते. भविष्यात अशी त्रुटी सरावाने तुमची तुम्हालाही दूर करता येईल.
आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२७, १७ एप्रिल २०१४ (IST)[reply]

ग्रेसांच्या कविता

[संपादन]
सर्वप्रथम, ही माहिती विकिपीडियावर घातल्याबद्दल धन्यवाद.
विकिपीडियावर सहसा पुस्तकांबद्दलची माहिती असते. विवरण किंवा ललितलेखन येथे लिहिले जात नाही. अशाने लेख रुक्ष झाला तरी यामागे लेखांत फक्त फॅक्ट्स असावी हा प्रयत्न असतो. मी तुमचे विवरण लेखाच्या चर्चापानावर हलविले आहे तसेच त्यात पॅरैग्राफही घातले आहेत.
तुम्हाला पुस्तकाच्या संकेतस्थळाचा दुवा (लिंक) द्यायचा आहे कि ग्रेसांच्या विकिपीडिया लेखातून येथे लिंक द्यायची आहे हे नेमके कळले नाही. कळविल्यास दोन्हीपैकी कोणतेही सहजपणे करता येईल.
पुन्हा एकदा मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आणि तुमच्याकडून अधिकाधिक लेखन घडो ही आशा/अपेक्षा.
अभय नातू (चर्चा) २२:०९, ८ नोव्हेंबर २०१४ (IST)[reply]
  धन्यवाद. मला ग्रेस च्या इंग्लिश पानावर पुस्तकाच्या संकेतस्थळाचा दुवा (लिंक) द्यायचा आहे ते आपण ही करू शकता.मी पुस्तकाच्या स्थळावर संपादन केले आहे तेही कृपया आपण बघून घ्यावे व त्यात काही संशोधन अपेक्षित असल्यास करावे.
  माझ्या संपादनानंतर Paras आली नाहीत पण ते आवश्यक आहेत.
आपणास या प्रमाणे लेखनाच्या सुरवातीस समास सोडावयाचा असल्यास  : हे चिन्ह लेखन सुरु करण्या पुर्वी वापरावे किंवा लेखन पहिल्या रेषेपासून करावे. अन्यथा आपले लेखन लेख सोडून बाहेर जाते आहे असे दिसेल.
नवा परिच्छेद सुरु करण्यासाठी एक ओळ रिकामी सोडावी.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२५, २५ नोव्हेंबर २०१४ (IST)[reply]
   पुस्तकाचे संपादन आपल्या सहायतेने पूर्ण झाले आहे. ग्रेसच्या इंग्लिश पानावरून पुस्तकाच्या पानापर्यंत  दुआ कसा देता  येईल ? म्हणजे ग्रेसच्या इंग्लिश पानावर लिंक  कोठे आणि कशी द्यावी  जेणे करून  टिचकी मारल्यावर पुस्तकाच्या पानावर पोहोचनणे शक्य होईल?


कोणत्या पुस्तकाच्या पानावर ? मराठी विकिपीडियाच्या पानावर असेल तर [[:mr:ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे|Gracechya Kavita Dhukyakadun Prakashaakade]] अर्थात या संदर्भाने इंग्रजी विकिपीडियात त्यांचे काही वेगळे संकेत असू शक्तील त्याचे मार्गदर्शन तेथेच मागावे. काँटीनेटल प्रकाशनाच्या संस्थळावरील दुवा द्यावयाचा झाल्यास [http:www.कॉन्टीनेटलपानाचादुवा spaceGracechya Kavita Dhukyakadun Prakashaakade]
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४४, २५ नोव्हेंबर २०१४ (IST)[reply]

पुस्तक परिचय / पुस्तकावरील लेख

[संपादन]

नमस्कार, आपण एक पुस्तक परिचय देण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता, त्या संबंधित माहिती देत आहे. सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे की, कोणत्याही लेखकाने स्वतःवर किंवा स्वतःशी संबंधित संस्था/ग्रंथ इत्यादी वर लिखाण करणे विकिपीडियावर अमान्य आहे. याला स्वप्रचार (सेल्फ प्रमोशन) असे म्हणतात. दुसरे म्हणजे इतर कोणत्याही व्यक्तीने तुमच्या पुस्तकावर स्वतंत्र पान लिहिलेले चालेल. ते कसे लिहावे यासाठी कृपया श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक), आंबेडकर अँड बुद्धिझम आणि द सेकंड सेक्स हे काही पुस्तकावरील लेखपान पाहून घेणे. लेख लिहिताना काही अडचण निर्माण झाल्यास मला येथे मेसेज करावा. - संतोष गोरे ( 💬 ) ११:४४, २६ मार्च २०२२ (IST)[reply]