सदस्य:V.narsikar/प्रतवारी धोरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा प्रस्तावित प्रतवारी धोरणाचा फक्त गोषवारा आहे.मूळ चर्चेतील फक्त महत्त्वाचे मुद्दे येथे टाकले आहेत. याबाबत काही वाद निर्माण झाल्यास कृपया मूळ लेखन तपासावे. त्याची जबाबदारी हे लेखन करणाऱ्यावर नाही. किचकट चर्चा वाचत बसण्यापेक्षा मुद्दे सहजासहजी सोप्या रितीने वाचणे शक्य व्हावे हा उद्देश यामागे आहे.

प्रतवारी धोरणासाठी प्राप्त मत-मतांतरांचा थोडक्यात गोषवारा[संपादन]

सदस्य:अभय नातू[संपादन]

  1. पहिल्या लेखाची पातळी ही 'शून्य पातळी' राहील. शून्य दर्ज्याच्या लेखासाठी उल्लेखनीयता आवश्यक नाही. असे लेख त्याचा दर्जा बदलण्यास आवश्यक काम केले नाही तर, कालांतराने वगळले जातील.
  2. लेखात आवश्यक बदल केल्यावर ते टप्प्या-टप्प्याने दर्जोन्नत केले जातील.

सदस्य:सुबोध कुलकर्णी[संपादन]

  1. धोरण तातडीने लागू करून प्रायोगिक स्तरावर आणावे.प्रक्रिया सुरू करावी. रचना लागू करीत-करीतच धोरण आपसूक आकारास येईल.


सदस्य:WikiSuresh/सदस्य:QueerEcofeminist/[संपादन]

(मूळ कच्चा आराखडा येथे WikiSuresh या नावाने प्रस्तावित केला आहे.)

  • नवीन लेखांचे/लेखांचे मूळ चार स्तर असावेत-
  1. प्रारंभिक पातळी
  2. पहिली पातळी
  3. दुसरी पातळी
  4. तिसरी पातळी
  5. लेखांची प्रतवारी लावताना आवश्यक बाबीं ठरवाव्या लागतील
  6. कोण ठरवू शकेल पातळी आणि पातळी मान्यतेची प्रक्रिया काय असेल याबाबत ठरविणे
  7. "उल्लेखनीयता सिध्द करण्यापासून ते गुणवत्तापूर्ण लेख तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया" एकाच धोरणात असावी
  8. प्रारंभिक पातळीचा लेख ही पायरी महत्त्वाची असेल-तेथेच अनेक खडतर निकष लावले जातील, सर्व विकितत्त्वाचे पालन होईल.
  9. लेखसंख्येपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची

लेखात

  • गुणवत्तेशी प्रतारण करू नये.
  • योग्य, वैध, स्पष्टपणे सिद्ध होत असणारे संदर्भ (किमान 3) वादग्रस्त, अतिशयोक्त विधानांना प्रत्येकी एक संदर्भ असावा.किमान प्रत्येक परिच्छेदाला एक संदर्भ असावा
  • NPOV(Neutral point of view-तटस्थ दृष्टीकोन ठेउन), प्रताधिकार भंग, पाल्हाळीक मजकूर नसावा
  • कोणताही 'नेमकेपणाचा' साचा नसावा
  • योग्य विकिदुवे असावेत.
  • यथायोग्य सुचालन साचे व side box(कडपट्टी) असावे
  • गुणवत्ता निर्धारणाची प्रक्रिया ठरवावी लागेल व साचे तयार करावे लागतील
  • योग्य शुद्धलेखन व व्याकरण असावे
  1. लेखाची प्रतवारी ठरविण्यास आवश्यक सर्व कामे करावी लागतील

सदस्य:Tiven2240[संपादन]

  1. मराठी विकिपीडियावर पातळी असण्याची शक्यता खूप कमी आहे कारण त्या विषयी धोरण स्पष्ट काही प्रमाणात उपलब्ध करू शकत नाही.
  2. मराठी विकिपीडियावर मनुष्यबळ नाही
  3. या साच्यात जर इतर पाळीव खाते/उत्पात करणारे सदस्य/बोट/स्क्रिप्ट तयार झाले तर ती क्रिया उलटवन्यास मनुष्यबळ नाही

प्रचालक या प्रकल्पावर अधिक वेळ सक्रिय नाही

  1. त्यात होणारे स्वार्थपणा/प्रभाव/व्यक्तिगत हल्ला/ईर्ष्या कोण जबाबदार असेल?
  2. यात काही प्रश्न नाही की यामुळे विकिपीडियावर पसारा वाढेल परंतु हा पसारा ५०००० लेखाचा असेल ज्याचे जबाबदार कोण नाही.
  3. त्यामुळे जेव्हपर्यंत याचा उपाय भेटत नाही तोपर्यंत हा प्रस्ताव तसास ठेवावा अशी विनंती.

सदस्य:usernamekiran[संपादन]

  1. "शून्य पातळी" ही en:Category:Unassessed articles प्रमाणे असावी.
  2. "शून्य पातळी" आणि "उल्लेखनीयता" ह्या पूर्णपणे वेगळ्या असाव्या.
  3. "शून्य प्रत, पहिली, दुसरी, तिसरी प्रत" ह्या ऐवजी "अमूल्यांकीत", "क दर्जा", "ब दर्जा", आणि "अ दर्जा" अशी वर्गवारी असावी.
  4. इंग्रजी विकीपेडिया वर जे लेख अतिशय छोटे आहेत, त्यांची वर्गवारी "stub" (en:Category:Stub-Class articles) करण्यात येते. ह्या वर्गवारीचा उल्लेखनीयतेशी काहीही संबंध नसतो.

सदस्य:सुबोध कुलकर्णी[संपादन]

खालीलप्रमाणे लेखांची प्रतवारी असावी असे वाटते -

  1. न तपासलेले –सध्या असलेले सर्वच लेख सर्वप्रथम या वर्गात जोडले जावेत.
  2. शून्य दर्जा – त्रोटक (२०० शब्दांपेक्षा कमी), उल्लेखनीयता/प्रताधिकार/शैली/शुद्धलेखन/योग्य संदर्भ/npov यांची पूर्तता न करणारे, मशिन भाषांतर
  3. सामान्य दर्जा – वरील सर्व बाबींची पूर्तता करणारे + योग्य वर्गीकरण असलेले
  4. चांगला दर्जा - वरील सर्व बाबींची पूर्तता करणारे + माहितीचौकट, चित्र, विकिडाटा कलम जोडलेले, सर्व मजकुराला योग्य व वैध संदर्भ, बाह्य दुवे व हे ही पहा हे विभाग जोडलेले
  5. उत्तम दर्जा – विकी आधारस्तंभ व शैली मार्गदर्शक तत्वे यांचे संपूर्णत: पालन, उपलब्ध इतर विकी प्रकल्पांना जोड, आवश्यक चित्रे/नकाशे/ध्वनी
  6. लेख तपासणाऱ्या लोकांची पात्रता ठरविणे महत्त्वाचे. त्यासाठी त्या गटातील योग्य असे लेख पात्र व्यक्तीने तयार करणे महत्त्वाचे.

सदस्य:आर्या जोशी[संपादन]

  1. चर्चेत होणारी पुनरुक्ती टाळून मत नोंदविले.
  2. झालेल्या चर्चेतून गुणवत्तेचे निकष ठरविता येतील.
  3. लेखाच्या आशयाशी त्याचे शीर्षक जुळणारे हवे.प्रतवारीमध्ये असे लेखन अग्रक्रमात असावे.
  4. रंगांचे निकषही निश्चित करावेत (?). ते लेखाची प्रत सांगतील. (हा मुद्दा म्हणजे नेमका काय हे मलातरी समजले नाही. खुलासा आवश्यक)
  5. इंग्रजी विकिवरील याबाबतचे निकष संदर्भ म्हणून पाळावयास हवेत पण, तंतोतंतपणे लगेचच वापरता येतील असे नाही.(काही संपादक अद्याप अपरिपक्व/प्रगतीशिल आहेत.)

सदस्य:V.narsikar[संपादन]

  1. सक्षम मनुष्य बळ हवे. (अभय नातूंचे उत्तर-कामे स्वयंचलितरित्या करून घेता येतील)


हा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यास आवश्यक / पुरक असणारी इतर समांतर कामे[संपादन]

  1. उल्लेखनीयता धोरण ठरविणे
  2. प्रतींचा/दर्जाचा/पातळीचा/स्तराचा वर्गवृक्ष तयार करणे
  3. धोरणास आवश्यक साचे व वर्ग तयार करणे
  4. साचा आपोआप लावला जाण्यास आवश्यक तांत्रिक बदल
  5. दर्जा निश्चित करण्यासाठी, त्या दर्जानुरूप वेगवेगळे गट निश्चित करणे आवश्यक