संमेलनपूर्व संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ठाणे शहरात २५ ते २७ डिसेंबर २०१० या काळात ८४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार होते. तत्पूर्वी ठाण्यात संमेलनपूर्व संमेलन या नावाखाली काही उपक्रम झाले ते असे :---

  • २०ऑक्टोबर २०१० : नियोजित संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा सत्कार
  • १४ नोव्हेंबर २०१० : अक्षर‍अंगण कार्यक्रम. हा कार्यक्रम १५ दिवस चालू होता. या कार्यक्रमात १४ तारखेला ’ईवरले अक्षर’ या नावाने नेटकर कवींचे काव्यसंमेलनही झाले.
  • २८ नोव्हेंबर २०१० : ठाण्याजवळच्या सातपाटी गावी कोळी ग्रामीण साहित्य संमेलन झाले.
  • सातपाटी, पालघर, कासारवडवली येथे बाल, महिला, आदिवासी, महानुभाव, विद्यार्थी अशी विविध संमेलनपूर्व साहित्य संमेलने झाली.
  • ११ डिसेंबर २०१० :मराठी शुद्धलेखनाची संमेलनपूर्व कार्यशाळा
  • १२ डिसेंबर २०१० :सूत्रसंचालक आणि निवेदकांची संमेलनपूर्व कार्यशाळा
  • १४ डिसेंबर २०१० : कवितेची कार्यशाळा
  • १९ डिसेंबर २०१० : महानुभाव साहित्य संमेलन
  • २३ डिसेंबर २०१० : बाल साहित्य संमेलन
  • २४ डिसेंबर २०१० : राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन

पुण्यात २६ मार्च २०१०पासून भरलेल्या तीन दिवसीय ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधीही असेच संमेलनपूर्व संमेलन १ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत झाले होते. त्यावेळी झालेले उपक्रम :-

  • १ फेब्रुवारी २०१० : प्रा. ग.प्र. प्रधान यांच्या हस्ते या उपक्रमांचा आरंभ झाला. या वेळी लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचा "साहित्यातील लोकरंग' हा कार्यक्रम झाला.
  • १६ फेब्रुवारी २०१० : रोजी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वरंग कविसंमेलन झाले.
  • १९ फेब्रुवारी २०१० : "संवाद माजी संमेलनाध्यक्षांशी' या कार्यक्रमात प्रा. मिलिंद जोशी यांनी अरुण साधू, मधू मंगेश कर्णिक, सुभाष भेंडे, प्रा. म.द. हातकणंगलेकर आणि राजेंद्र बनहट्टी यांच्याशी संवाद साधला होता.
  • २२ फेब्रुवारी २०१० : "महानुभाव आणि मराठी साहित्य' या विषयावर नरेंद्र मुनी अंकुळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र झाले. त्या चर्चासत्रात झुंजार सावंत, दिनकर बोरकुले, आनंदकिशोर डहाणे, विश्वास नांगरे हे सहभागी झाले होते.
  • १ मार्च २०१० : ’भूर्जपत्र ते वेबपेज’ ह्या विषयावर एक परिसंवाद झाला. ह्यात डॉ. अनिल अवचट, पत्रकार संध्या टाकसाळे, पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख लेखिका उज्‍ज्वला बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी आणि चित्रपट निर्माते महेश घाटपांडे ह्यांनी भाग घेतला होता. परिसंवादातील चर्चेदरम्यान ‘ब्लॉगिंग करणारे कवी-लेखक मराठी साहित्याच्या दर्जाचा विचार करतात का’ असा एका विषय चर्चेला आला. ह्यावर श्री. महेश घाटपांडे ह्यांनी खूप दर्जेदार ब्लॉग्जही असतात हा मुद्दा उदाहरणांनी स्पष्ट केला होता.
  • २ मार्च २०१० : "सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र-कुठं आहोत? कुठं जायचयं?' या विषयावरील परिसंवादाने या उपक्रमांची सांगता झाली.
  • पिंपरी चिंववड शहरात जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधी चिंचवड येथे एक एकदिवसीय संमेलनपूर्व संमेलन झाले. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते २७-१२-२०१५ रोजी या संमेलनाचे उद्‌घाटन झाले.


हे सुद्धा पहा[संपादन]

मराठी साहित्य संमेलने