गाडगे महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संत गाडगे महाराज या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
गाडगे बाबा 
समाज सुधारक
Gadge Maharaj.jpg
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखफेब्रुवारी २३, इ.स. १८७६, फेब्रुवारी १३, इ.स. १८७६
महाराष्ट्र
मृत्यू तारीखडिसेंबर २०, इ.स. १९५६
अमरावती
नागरिकत्व
व्यवसाय
 • social worker
मातृभाषा
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
Gadge Maharaj (es); গাডগে মহারাজ (bn); Sant Gadge Maharaj (fr); Gadge Maharaj (nl); Gadge Maharaj (de); गाडगे बाबा (mr); ಗಾಡ್ಗೆ ಮಹಾರಾಜ್ (kn); ਗਾਡਗੇ ਮਹਾਰਾਜ (pa); Gadge Maharaj (en); गाडगे महाराज (hi); గాడ్గే బాబా (te); காட்கே மஹராஜ் (ta) समाज सुधारक (hi); সমাজ সংস্কারক (bn); సంఘ సంస్కర్త, సంచార సాధువు (te); ਸਮਾਜ ਸੁਧਾਰਕ (pa); social reformer (en); ಸಮಾಜ ಸುಧಾರಕ (kn); समाज सुधारक (mr); இந்திய சமுதாய மறுமலர்ச்சியாளர் (ta) Debuji Zhingraji Janorkar, Sant Gadge Maharaj, Gadge Baba (en); गाडगे महाराज, संत गाडगे बाबा, संत गाडगे महाराज (mr); గాడ్గే మహరాజ్, సంత్ గాడ్గే బాబా, దేబూజీ ఝింగ్రాజీ జానోర్కర్ (te)

गाडगे महाराज (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६;जन्म कोतेगाव(शेंडगाव); मृत्यू: २० डिसेंबर १९५६ अमरावती) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.[ संदर्भ हवा ]

संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते. [१]

गाडगे महाराजांची चरित्रे[संपादन]

 • असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
 • ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)
 • कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)
 • गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)
 • गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)
 • श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)
 • Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)
 • गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)
 • गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)
 • गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)
 • निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
 • मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
 • लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)
 • लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)
 • The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)
 • संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)
 • संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)
 • संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
 • Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)
 • संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)
 • श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)
 • श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)
 • संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)
 • गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)
 • समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )
 • स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

गाडगेबाबांच्या जीवनावरील चित्रपट[संपादन]

 • डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर
 • देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त

साहित्य संमेलन[संपादन]

महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.

पुरस्कार[संपादन]

गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जात असे. हा पुरस्कार तूर्त स्थगित केला गेला आहे. (२०१८ची बातमी).

पहा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

बाह्य दुवे[संपादन]

 1. ^ चव्हाण, रा. ना. (२०१३). संत-सुधारक व त्यांचे धर्मविचार एक अभ्यास. पुणे: रा. ना. चव्हाण जन्मशताब्दी वर्ष प्रकाशन. pp. १२९.