संग्रामपूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संग्रामपूर, बुलढाणा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?संग्रामपूर
तामगाव
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

२१° ०१′ ४८″ N, ७६° ४०′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २७३ मी
विभाग अमरावती
जिल्हा बुलढाणा
भाषा मराठी
तहसील संग्रामपूर (महाराष्ट्र)
पंचायत समिती संग्रामपूर (महाराष्ट्र)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४४२०२
• +०७२६६
• MH-२८

संग्रामपूर (महाराष्ट्र) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.

भौगोलिक स्थान विस्तार :

हे छोटसं शहर महाराष्ट्राच्या विदर्भातील अमरावती विभागतल्या बुलढाणा जिल्ह्यात उत्तरेस आहे. संग्रामपूर तालुक्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत.पूर्वेस अमरावती व अकोला जिल्हा लागू आहे.तर पश्चिमेस व दक्षिणेस अनुक्रमे जळगाव (जामोद) व शेगाव हे तालुके आहेत.

संग्रामपूर हे अक्षांश २१.०३ उत्तर व रेखांश ७६.६८ पुर्व या अक्षवत्तावर स्थित आहे.हे समुद्रसपाटीपासून २७३ मी. उंचीवर आहे

नद्या आणि पाण्याचे स्रोत :

पाण्याचे व्यवस्थापन नसल्याने या तालुक्यात पाण्याची टंचाई भासते.तालुक्याच्या दक्षिण सीमेला लागून पुर्णा ही मुख्य नदी वाहते.तर तालुक्याच्या उत्तर भागातून उगम पावणाऱ्या लहान लहान उपनद्या व नाले तिला येऊन भेटतात.उदा. वान, बेबळा ह्या नद्या व पांडव नाला,इत्यादी. त्यापैकी वान नदी ही जरी तालुक्याच्या पुर्व सीमेतून वाहत असली तरी ती तालुक्याला वरदान ठरली आहे. वान नदीवरील वारी हनुमान (धरण) या प्रकल्पातील पाणी हे तालुक्यातील अनेक गावांना पिण्यासाठी पुरवले जाते. वारी हनुमान हा एक निराळा प्रकल्प आहे जो बुलढाणा ,अकोला व अमरावती या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर स्थित आहे.

धार्मिक :

धार्मिककदृष्ट्या तालुक्यातील सोनाळा , पळशी (झाशी)काटेल ही गावे महत्त्वाची आहेत. त्यामध्ये सोनाळा येथे श्री सोनाजी महाराज संस्थान, तर पळशी येथील शंकरगिरी महाराज संस्थान व काटेल येथील संत गुलाबबाबा संस्थान ही धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी दरवर्षी यात्रा व उस्तव साजरे केले जातात.यामुळे हजारो भाविक येथे भेटी देतात.

संग्रामपूर तालुक्यातील गावे :

संग्रामपूर तालुक्यातील गावे
  • अंबाबारवा
  • अकोली खु.
  • अकोली बु.
  • अस्वंद
  • आलेवाडी
  • आवार
  • ईटखेड
  • उकडगाव
  • उकळी बु.
  • उमरा
  • एक्लारा
  • करमोडा
  • कळमखेड
  • कवठळ
  • काकनवाडा खु.
  • काकनवाडा बु.
  • काकोडा
  • काटेल
  • काथरगाव
  • कुंधेगाव
  • कुंभारखेड
  • कोद्री
  • कोलद
  • खिरोडा
  • खेळ थोरात पातुर्डा
  • खेळ दळवी पातुर्डा
  • खेळ भोगळ पातुर्डा
  • खेळ माळी पातुर्डा
  • चांगेफळ खु.
  • चांगेफळ बु.
  • चिचारी
  • चुनखेडी
  • चोंढी
  • जस्तगाव
  • झाशी
  • टाकळी पंचगव्हाण
  • टाकळेश्वर
  • टुनकी खु.
  • टुनकी बु.
  • तामगाव
  • दानापूर
  • दुर्गादैत्य
  • देऊळगाव
  • धामणगाव
  • निमखेड
  • निरोड
  • निवाना
  • नेक्नापूर
  • पंचाळा (जामोद)
  • पंचाळा (बावनबीर)
  • पळशी (झाशी)
  • पळसोडा
  • पातुर्डा खु.
  • पिंगळी खु.
  • पिंगळी बु.
  • पिंपरी अडगाव
  • पिंपरी कवठळ
  • पेसोडा
  • बानोदा
  • बाल्हाडी
  • बावनबीर
  • बोडखा
  • बोरखेड
  • भिलखेड
  • भोन
  • मनार्डी
  • मारोड
  • मालठाणा बु.
  • मोमिनाबाद
  • मोहोकोट
  • राजपूर
  • रिंगणवाडी
  • रूधाना
  • रोहिण खिंडकी
  • लाडणापूर
  • लोहगाव बु.
  • वकाना
  • वडगाव
  • वरवट खंडेराव
  • वरवट बकाल
  • वसाळी
  • वानखेड
  • वारखेड
  • शिवनी
  • शेवगा खु.
  • शेवगा बु.
  • संग्रामपूर
  • सगोडा
  • सायखेड
  • सालवन
  • सावळा
  • सावळी
  • सोनाळा
  • हडीया महाल
  • हिंगणा