Jump to content

दत्तजयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्री दत्त जयंती या पानावरून पुनर्निर्देशित)

दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते.[][]

अमळनेर येथील दत्त जयंती उत्सव

हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार (डिसेंबर/जानेवारी) मार्गशीर्ष (अग्रहायण) महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.

दत्त संंप्रदाय

[संपादन]
दत्तजयंती उत्सव रायपाटण(तालुका राजापूर)

दत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वतीवासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात.[] दत्ताची स्थाने प्रयाग येथे, आणि महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी आहेत.[][][] श्रीदत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो.[]

देवता स्वरूप

[संपादन]

दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकस्वरूप आहे[]. दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारतभम्रण केले. ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली.[] महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो.[१०]

गुरुचरित्र वाचन सप्ताह

[संपादन]

भगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंधित दत्त संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र हा होय. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस दत्त भक्त पुरुष या गुरुचरित्र ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करतात.[११][११] दत्त जयंतीला या वाचनाचे पारणे करतात.[१२]

उत्सवाचे स्वरूप

[संपादन]
दत्तजयंती उत्सव कीर्तन रायपाटण तालुका राजापूर

दत्त जयंतीच्या दिवशी, दत्ताच्या देवळात भजन, कीर्तन होते. संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात, त्यामुळे त्या वेळी जन्माचे कीर्तन असते[१३]. देवळावर रोषणाई केली जाते.[१४] पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते. भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एक आठवडाही केले जाते.[१५] या उत्सवात संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात.[१६] अशा कार्यक्रमांचेही विशेष आयोजन केले जाते.[१७] केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा उत्सव उत्साहाने संपन्न केला जातो. आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था केली जाते.[१८]

हे सुद्धा पहा

[संपादन]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Dube, Narasiṃha Prasāda (1996). Sakalamata sampradāya: siddhanta aura sāhitya (हिंदी भाषेत). Vikāsā Prakāśana.
  2. ^ Pandey, Rajbali (1978). Hindū dharmakośa (हिंदी भाषेत). Uttara Pradeśa Hindī Saṃsthāna, Hindī Samiti Prabhāga.
  3. ^ सय्यद, झियाऊद्दीन (१८.१२.२०१५). "श्रीदत्त संप्रदायातील परंपरा". ९.१२.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Patukale, Pro Kshitij (2012-10-27). Kardaliwan : Ek Anubhuti. Kardaliwan Seva Sangh. ISBN 978-93-5087-609-1.
  5. ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
  6. ^ सय्यद, झियाऊद्दीन (१८.१२. २०१५). "अपरिचित दत्तस्थाने". ९.१२. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ Samarth, Shree Swami; Kendra, Vishwa Kalyan (2008-08-01). Guru Charitra (इंग्रजी भाषेत). Sterling Publishers Pvt. Ltd. ISBN 978-81-207-3348-0.
  8. ^ Kalelkar, Dattatraya Balakrishna (1972). Jivanta vratotsava. Rāshṭrīya Granthamālā.
  9. ^ Patukale, Kshitij (2013-01-01). Kardliban Eak Anubhuti (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-82901-45-7.
  10. ^ Bivalakara, Raghunātha Vāsudeva (1990). Mahārāshṭra ke pramukha sādhanā sampradāya (हिंदी भाषेत). Kaustubha Prakāśana.
  11. ^ a b सय्यद, झियाउदीन (१६. १२. २०१५). "उपासना गुरुचरित्राची". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ दैनिक भास्कर (१९. १२. २०१८). "22 को मनाएंगे श्री दत्त जन्मोत्सव". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ Pāṭhaka, Yaśavanta (1980). Nacu kirtanace rangi : Marathi kirtanasastheca cikitsaka abhyasa. Kontinentala Prakasana.
  14. ^ Dube, Narasiṃha Prasāda (1996). Sakalamata sampradāya: siddhanta aura sāhitya (हिंदी भाषेत). Vikāsā Prakāśana.
  15. ^ दैनिक भास्कर (१५.१२. २०१८). "दत्त जयंती महोत्सव कल से". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  16. ^ दैनिक भास्कर (१०. १२. २०१८). "स्वराभिषेक में आएंगे मशहूर कलाकार, होगा गायन-वादन". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  17. ^ म. टा. प्रतिनिधी, पुणे (१८. १२. २०१८). "भक्तिगीतांची सुश्राव्य मैफल". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  18. ^ "दत्तजयंती उत्सव सुरू". १५.१२.२०१८. 2019-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९.१२.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)