शेनाझ ट्रेझरीवाला
भारतीय अभिनेत्री | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून २९, इ.स. १९८१ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
शेनाझ ट्रेझरीवाला (जन्म २९ जून १९८१) [१] ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि ट्रॅव्हल व्लॉगर आहेत.
कारकिर्द
[संपादन]महाविद्यालयात असताना त्यांचे पहिली मॉडेलिंग काम हे शीतपेय गोल्ड स्पॉटसाठी होते.[२] एमटीव्ही नेटवर्क एशियाने त्यांना एमटीव्ही मोस्ट वॉन्टेड कार्यक्रमात व्हीडीयो जॉकी म्हणून कामावर घेण्यापूर्वी अकाई आणि फिलिप्ससाठी जाहिरातींचे काम देखील त्यांनी केले होते.[२][३]
२००१ च्या तेलुगू चित्रपट एदुरुलेनी मनिषी मध्ये त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली.[४] मुंबईच्या एका नाईट क्लबमध्ये दिग्दर्शक केन घोष यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी इश्क विश्कमध्ये मुख्य भूमिकेची स्वीकार केला.[५][६] ह्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड्सद्वारे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले.[७] त्यांच्या प्रवासाच्या प्रेमामुळे त्यांनी कॉस्मोपॉलिटन, एले आणि फेमिना साठी प्रवासवर्णनाचे लेख लिहिले आहेत.[३][६][८] २०१० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, ट्रेझरीवाला मुंबई येथे राहत होत्या आणि ट्रॅव्हल चॅनेलवर कल्चर शॉकचे यजमान म्हणून काम करत होत्या.[८] २०११ मध्ये, त्यांनी अमेरिकन टीव्ही मालिका वन लाइफ टू लिव्हमध्ये रमा पटेल म्हणून आवर्ती भूमिका मिळावली. काही महिन्यांनंतर, त्यांनी २०१२ मध्ये शो रद्द होईपर्यंत हे काम केले आणि नंतर २०१३ मध्ये शोचे वेबिसोड प्रसारित करण्यास सुरुवात केली तेव्हा त्या भूमिका बजावण्यास परतल्या.[९]
२००९ मध्ये त्या आगे से राईट आणि रेडिओ या चित्रपटांमध्ये दिसल्या. त्यांनी २०११ च्या लव का द एंड या चित्रपटासाठी पटकथा लिहिली आणि अभिनय देखील केला. दिल्ली बेली व मैऔर मिस्टर राइट चित्रपटातही त्यांनी काम केले. २०१५ दरम्यान, त्या युनायटेड स्टेट्समधील कॉमेडी सेंट्रलवरील द नाईटली शो विथ लॅरी विल्मोर मध्ये त्या अधूनमधून पॅनेलिस्ट होत्या.[१०]
२०१७ मध्ये, त्या समीक्षकांनी प्रशंसित इंडी चित्रपट द बिग सिकमध्ये दिसल्या जिथे त्यांनी कुमेल नानजियानीच्या वहिनीची भूमिका केली होती. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी महिला स्पेशल रेसलिंग कार्यक्रमाचे संयोजन देखील केले आहे.[११] अभिनयासोबतच त्या आता यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर ट्रॅव्हल व्लॉग शेअर करातात.[१२]
वैयक्तिक जीवन
[संपादन]ट्रेझरीवालांचे वडील व्यापारी सागरी अभियंता होते [८] आणि त्यांचा जन्म एका पारशी कुटुंबात झाला होता. ट्रेझरीवाला यांनी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयात (सेंट झेवियर्स कॉलेज) येथे शिक्षण घेतले.[८][२] २००१ मध्ये, त्या न्यू यॉर्क शहरात गेल्या जिथे त्यांनी ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय पद्धतीचा अभ्यास केला.[१३] न्यू यॉर्कमध्ये असताना त्यांनी न्यू यॉर्क विद्यापीठ येथे लेखनाचा अभ्यासक्रमही घेतला.[१३]
डिसेंबर २०१४ मध्ये दिल्लीतील एका उबर चालकाने केलेल्या बलात्कार नंतर शेनाझ ट्रेझरीवाला यांनी नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि अनिल अंबानी यांच्यासह भारतातील अनेक शक्तिशाली लोकांना एक खुले पत्र लिहिले व महिलांच्या सुरक्षेवर भाष्य केले. त्यात त्यांनी भारतीय महिलांच्या सुरक्षेसाठी या कारणाविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली.[१४][१५][१६][१७]
फिल्मोग्राफी
[संपादन]वर्ष | शीर्षक | भूमिका | नोट्स |
---|---|---|---|
२००१ | एदुरुलेनी मनीषी | श्री | तेलुगु चित्रपट |
२००३ | इश्क विश्क | अलिशा सहाय | |
२००४ | हम तुम | शालिनी | |
२००६ | उमर | सपना पी. लाखा | |
२००९ | आगे से राइट | मोती | |
रेडिओ | शनाया धिंग्रा | ||
२०११ | लव का द एंड | कु. नाझ | |
दिल्ली बेली | सोनिया मेहरा | ||
२०१४ | मैं और मिस्टर राईट | आलिया | |
२०१७ | द बिग सिक | फातिमा | |
मुन्ना मायकल | अँकर | ||
२०१८ | काळकांडी | आयशा | |
२०२१ | अमेरिकनिश | अमिरा | इंग्रजी चित्रपट |
दूरदर्शन
[संपादन]वर्ष | शीर्षक | भूमिका |
---|---|---|
२००७ | कल्चर शॉक | स्वतः / यजमान |
२०११-१३ | वन लाइफ टू लिव्ह | रमा पटेल |
२०१५ | द नाईटली शो विथ लॅरी विल्मोर | योगदानकर्ता |
२०१६ | ब्राउन नेशन | डिंपल पारीख |
पुरस्कार
[संपादन]- २००४ - नामांकन - इश्क विश्क फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
संदर्भ
[संपादन]- ^ "Shenaz Treasurywala turned Travel Blogger after failed Bollywood career". News Track (English भाषेत). 29 June 2020. 16 November 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b c "Veejays with a vengeance!". द टाइम्स ऑफ इंडिया. 8 June 2003. 10 April 2007 रोजी पाहिले.
- ^ a b Vashisht, Pooja (9 February 2004). "Treasured and most wanted!". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 April 2007 रोजी पाहिले.
- ^ "Eduruleni Manishi – Nadumunu Chooste jarade Song". रोजी मूळ पानापासून संग्रहित2024-02-13. 2024-02-13 रोजी पाहिले – YouTube द्वारे.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ Dhattiwala, Raheel (3 June 2003). "Straight Answers". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 April 2007 रोजी पाहिले.
- ^ a b Iyer, Sandhya (28 July 2003). "Bollywood is too filmi for me". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 April 2007 रोजी पाहिले.
- ^ 49th Filmfare Awards
- ^ a b c d "Shenaz: Culture Shock". Travel Channel, Discovery Communications. 17 May 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 April 2007 रोजी पाहिले.
- ^ "Soap Opera Digest: Your No. 1 Source For Soap News". Soap Opera Digest. 28 January 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Rivera, Joshua. "'The Nightly Show with Larry Wilmore' announces its cast of contributors -- exclusive". Entertainment Weekly. 10 January 2015 रोजी पाहिले.
- ^ "Shenaz Treasury to Host All-women's Special Wrestling Event 'WWE Evolution'". News18. 24 October 2018.
- ^ "B'day Special: VJ, Actress And Now A Vlogger, The Journey Of Shenaz Treasurywala". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-06-29. 2023-12-20 रोजी पाहिले.
- ^ a b Fatima, Nishat (27 April 2002). "Shenaz: Most wanted again". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 April 2007 रोजी पाहिले.
- ^ "Shenaz Treasurywala: India actress in plea to stop rape". BBC News. 12 December 2014. 15 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "Shenaz Treasurywala's Open Letter To NaMo, Sachin, Amitabh & The 3 Khans". द टाइम्स ऑफ इंडिया. 15 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "Actor Shenaz Treasurywala's open letter to PM, Amitabh Bachchan, SRK". India Today. 15 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "Uber Rape Case: Actress Shenaz Treasurywala writes open letter to Narendra Modi, Shah Rukh Khan, Amitabh Bachchan". The Indian Express. 11 December 2014. 15 December 2014 रोजी पाहिले.