शेख हसीना
शेख हसीना | |
बांगलादेशच्या पंतप्रधान
| |
विद्यमान | |
पदग्रहण ६ जानेवारी २००९ | |
मागील | इयाजुद्दीन अहमद |
---|---|
कार्यकाळ २३ जून १९९६ – १५ जुलै २००१ | |
मागील | खालेदा झिया |
पुढील | इयाजुद्दीन अहमद |
बांगलादेश अवामी लीगच्या पक्षाध्यक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण १७ मे १९८१ | |
जन्म | २८ सप्टेंबर, १९४९ पूर्व बंगाल, पाकिस्तान (आजचा बांगलादेश) |
वडील | शेख मुजिबुर रहमान |
धर्म | मुस्लिम |
शेख हसीना (बांग्ला: শেখ হাসিনা; लग्नानंतरचे नाव: शेख हसीना वाजेद; २८ सप्टेंबर, इ.स. १९४९; ) ह्या दक्षिण आशियामधील बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान असून जानेवारी इ.स. २००९ पासून पदारूढ आहेत. ह्यापूर्वी इ.स. १९९६ ते इ.स. २००१ दरम्यान त्या ह्या पदावर होत्या. शेख हसीना बांगलादेशाचे स्वातंत्र्यसैनिक व पहिले पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान ह्यांची मुलगी असून, इ.स. १९८१ सालापासून त्या बांगलादेश अवामी लीग ह्या राजकीय पक्षाच्या पक्षाध्यक्ष आहेत.
गेली चार दशके देशाच्या राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या हसीना ह्यांच्यावर अनेकदा भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले आहेत. बेगम खालेदा झिया ह्या शेख हसीनांच्या प्रतिस्पर्धी असून त्या दोन नेत्यांनी गेली २० वर्षे बांगलादेशाच्या राजकारणावर आपली पकड ठेवली आहे.
जून-ऑगस्ट २०२४मध्ये झालेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशमधून पळ काढून भारतात आसरा घेतला.
बाह्य दुवे
[संपादन]- अवामी लीगच्या संकेतस्थळावरील माहिती Archived 2014-02-09 at the Wayback Machine.