शिरगाव खुर्द
?शिरगाव खुर्द महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खेड |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
शिरगाव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]येथे पुरातन कालीन श्री रामवरदायिनी देवीचे मंदिर आहे. मंदिरात श्री गुढी पार्वती, पार्वती आणि श्री साठशिर धारण केलेली देवी आहे. समोरच श्री झोलाई मानाई आणि जानाई या देवी आहेत. बाजुलाच श्री रघुवीर मठ आहे तेथेच स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिरात श्री रामपंचायतन सोबत विरभद्र आणि गणेश आहेत. ही मंदिरे कौलारू आहेत.समोरच श्री मारुतीराया आहेत. भव्य मूर्ती मिशा असलेली. पायाखाली राक्षसी आणि शेपटी वाचवलेली स्त्री असावी. उत्सव जोरदार होतात. तुळशीचे लग्न ही जत्राच असते. प्रतिपदा ते तुलसी विवाह असा बारा दिवस भजन, पूजन, जागरण असते. तसेच शिवाजीनगर या वाडीच्या माथ्यावर जो डोंगर आहे त्याला पालदुर्ग म्हणतात. तेथे भुयार कोरलेली आहेत. शिरगाव बाजूस दोन भुयार आहेत आणि पाली गावाच्या बाजूस तिन भुयार आहेत. आतमध्ये बरीच माणसे राहू शकतात. तेथेच भुयारात पाण्याचे टाके आहे.हे सातीआसरांचे स्थान आहे. भुयाराच्या प्रवेशद्वारावर दगडात मूर्ती कोरलेली आहे. येथेही लोक उत्सव करतात. पालदुर्ग शिखरावरून खेड पर्यंतचा भाग सहज नजरेच्या टप्प्यात येतो. गावात प्रवेश करताच श्री कालिका आईच मंदिर लागते.शिरगाव खोऱ्यात उगम असलेल्या डुबी नदीवर पिंपळवाडी पाटबंधारे प्रकल्प पहाण्यासारखा आहे.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]खोपीतून पुढे आल्यावर शिरगाव शेवटचे गाव. खेड शिरगाव रस्ता आहे. नियमित बस येते. गावाच्या उत्तरेकडील भागात डोंगर चढून गेल्यावर सातारा,जावळीतील सिंदी, वळवण,रौदी, उचाट ही गाव लागतात त्यापुढे श्री चकदेव आणि दुसऱ्याच बाजूस श्री जोम मल्लिकार्जुन पर्बत ही पुरातन शिवालय लागतात. गावाच्या पूर्वेला निवे गाव लागते त्याच्यापुढे श्री नागेश्वर शिवालय उंच डोंगरावर आहे. गावाच्या दक्षिणेला तळवट पाली ही गावे आहेत.
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/