Jump to content

मराठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शहाण्णव कुळी मराठा या पानावरून पुनर्निर्देशित)
क्षत्रिय मराठा - महा रट्ट
Flag of The Maratha Empire
क्षत्रिय मराठा
एकुण लोकसंख्या
ख़ास रहाण्याची जागा
भारत ध्वज India

महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू

भाषा
धर्म
हिंदू (क्षत्रिय)

मराठा ही एक महाराष्ट्रातील दख्खनी क्षत्रियांची शाखा किंवा जात आहे.[][] मराठा , भारतातील इतिहासात पराक्रमी योद्धे म्हणुन ओळखले जातात. महाराष्ट्राचे नाव महा रट्ट (मराठा) यांच्यावरूनच आले आहे. मराठा - शालिवाहन साम्राज्याच्या नाणेघाटातील शिलालेखात महा रट्ट म्हणजेच मराठा वंशाचा उल्लेख आहे. भारतीय इतिहासात मराठा (महा रट्ट) हा राज्यकर्ता समाज आहे. त्यांची लोकसंख्या प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात जास्त आहे , जे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबई पासून गोव्यापर्यंत आणि नागपूरच्या पूर्वेस सुमारे १०० मैल (१६० किमी) अंतर्देशीय भागात पसरलेले मराठी भाषिक प्रदेश आहे. त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रासह गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा काही प्रमाणात आहे.

इतिहास

[संपादन]

मराठा ही जात महाराष्ट्रातील क्षत्रिय शाखा आहे. महाराष्ट्राच्या क्षत्रिय समाजाला मराठा म्हणतात. महाराष्ट्रावर राज्य करणारे जे क्षत्रिय मराठा राजवंश झाले जसे सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, शिलाहार, निकुंभ, सेंद्रक, कदंब, कलचुरी, मौर्य या सर्व क्षत्रिय मराठा राजवंशाचे वंशज आजचे 96 कुळी क्षत्रिय मराठा आहेत.

  • मराठ्यांच्या ९६ कुळांमध्ये २४ सुर्यवंशी, २४ चंद्रवंशी,२४ ब्रम्हवंशी आणि २४ शेषवंशी अशी एकूण ९६ कुळे आहेत. प्राचीन पुराण ग्रंथांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद ,तसेच रामायण महाभारत आदी प्राचीन ग्रंथांमध्ये क्षत्रियांचा इतिहास विस्तृतपणे वर्णन केला गेला आहे.
  • मराठा साम्राज्य

लष्करी इतिहास

[संपादन]

अनेक मराठा कुळांनी पाटील किंवा देशमुख म्हणून बहामनी सल्तनत तसेच तिच्या उत्तराधिकारी असलेल्या दख्खनच्या सल्तनती आणि मुघल साम्राज्य यांच्या सेवेत १४व्या शतकापासून वतनदारी व्यवस्थेअंतर्गत काम केले. त्या काळातील प्रभावशाली कुटुंबांमध्ये सावंत घराणे (सावंतवाडी), घोरपडे घराणे (मुधोळ), निंबाळकर घराणे (फलटण), माने, शिर्के, महाडीक आणि मोहिते यांचा समावेश होतो.[]

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वतःचे भोसले घराणे या कुटुंबांच्या तुलनेत नंतरच्या काळात प्रभावात आले. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांत शिवाजी महाराजांना या घराण्यांशी विविध रणनीतींचा वापर करून लढावे लागले किंवा त्यांना आपल्या अधीन आणावे लागले. त्यापैकी एक घटना म्हणजे मोरे घराण्यातील चंद्रराव मोरे—जो विजापूरचा एक मराठा सरदार होता—याचा वध करून जावळी खोरे जिंकणे. हे खोरे आजच्या महाबळेश्वर जवळ आहे.[]

जावळी जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांना दक्षिण आणि नैऋत्य महाराष्ट्रात आपल्या मोहिमा वाढविणे शक्य झाले. इतर उपायांमध्ये विवाहसंबंध प्रस्थापित करणे, देशमुखांना वगळून थेट गावच्या पाटलांशी व्यवहार करणे, किंवा आवश्यकतेनुसार बलप्रयोग करून त्यांना अधीन करणे यांचा समावेश होता.[][]

नातेसंबंध, कुलदेवता आणि देवक

[संपादन]

मराठा समाजात एखाद्या कुळ किंवा वंशगटाचे सदस्यत्व हे पितृवंशीय पद्धतीने मिळते. एखाद्या कुळातील लोकांमध्ये सामान्यतः समान आडनाव, समान कुलदेवता आणि समान कुलचिन्ह किंवा देवक आढळते.[]

“खरे मराठे” मानल्या जाणाऱ्या ९६ कुळांची यादी तयार करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत; परंतु या याद्या एकमेकांपासून मोठ्या प्रमाणावर भिन्न असून त्यांबाबत मतभेदही आहेत.[][]

या ९६ कुळांच्या यादीला पाच स्तरांमध्ये विभागलेले मानले जाते. यांपैकी सर्वात उच्च स्तरामध्ये पाच प्रमुख मराठा कुळांचा समावेश असल्याचे नमूद केले जाते.[१०]

एखाद्या कुळामध्ये स्थान किंवा प्रतिष्ठा ही व्यक्ती वैध विवाहातून जन्मलेली आहे की उच्चविवाह (hypergamy) प्रथेमुळे जन्मलेली आहे यावरही अवलंबून असते. इतिहासात उच्च श्रेणीतील मराठा कुळांना वंशपरंपरागत वतन) धारण करण्याचा अधिकार होता. यात जमीन अनुदाने, कर वसुलीचे हक्क (महसुली पाटीलकी )किंवा गावाच्या पोलीस व्यवस्थेची जबाबदारी (पोलीस पाटीलकी) यांचा समावेश होता. उच्च श्रेणीतील कुळांकडे मोठ्या जमिनीच्या मालमत्ता किंवा जहागीर असत.

वतनधारक कुळांकडे अनेक पिढ्यांपर्यंत मागे जाणाऱ्या लिखित वन्शावली नोंदी आढळतात.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "एक मराठा लाख मराठा people". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.
  2. "India | Facts, Culture, History, Economy, & Geography". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.
  3. Kulkarni, G.T. (1991). "Deccan (Maharashtra) Under the Muslim Rulers from Khaljis to Shivaji: A Study in Interaction". Bulletin of the Deccan College Research Institute. 51/52: 501–510. ISSN 0045-9801. JSTOR 42930434.
  4. Eaton, Richard M. (2019). India in the Persianate Age: 1000–1765. Penguin UK. p. 198. ISBN 978-0-14-196655-7.
  5. Stewart Gordon (2007). The Marathas 1600–1818. Cambridge University Press. p. 85. ISBN 978-0-521-03316-9.
  6. Gordon, Stewart (16 September 1993). "Shivaji (1630–80) and the Maratha polity" (PDF). The Marathas 1600–1818. Cambridge University Press. The New Cambridge History of India. p. 69. doi:10.1017/CHOL9780521268837. ISBN 978-0-521-26883-7.
  7. 1 2 Carter, A. T. (1973). "A Comparative Analysis of Systems of Kinship and Marriage in South Asia". Proceedings of the Royal Anthropological Institute of Great Britain and Ireland. 1973 (1973): 29–54. doi:10.2307/3031719. JSTOR 3031719. 27 September 2020 रोजी पाहिले.
  8. Kathleen Kuiper, ed. (2010). The Culture of India. Rosen. p. 34. ISBN 9781615301492.
  9. Rosalind O'Hanlon (2002). Caste, Conflict and Ideology: Mahatma Jotirao Phule and Low Caste Protest in Nineteenth-Century Western India. Cambridge University Press. pp. 17–. ISBN 9780521523080. 13 May 2011 रोजी पाहिले.
  10. Louis Dumont (1980). Homo hierarchicus: the caste system and its implications. University of Chicago Press. p. 121. ISBN 9780226169637. 13 May 2011 रोजी पाहिले.