वैंदाणे
?वैंदाणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नंदुरबार |
जिल्हा | नंदुरबार जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | अहिराणी, भिलाऊ, वडर |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/३९ |
वैंदाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार उष्ण असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
लोकजीवन
[संपादन]वैंदाने येथे प्रामुख्याने शेती केली जाते.तसेच येथे अनेक जोड व्यवसाय व शेतीपूरक व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात केले जातात. या गावात हिंदू धार्मिक त्यात पाटील,भिल्ल,धनगर,राजपूत,नाभिक,महार,ब्राम्हण,सुतार,चांभार, मांग, वडर ई. जातीचे लोक राहतात. गावात हिंदू धर्माचे सगळे सण साजरा होतात. प्रामुख्याने गावात बैलपोळा, अक्षय तृतीया (आखाजी),होळी ई. सण जोरात आणि सर्व जाती समभावाने साजरी होतात.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]गावात भगवान विष्णूने तीन अवतार असून त्यात मोहिनी माता आणि स्वयं महाविष्णू यांची स्वयंभू मूर्ती
काही शतकांपूर्वी स्थापित करण्यात आली आहे तसेच त्या ठिकाणी मारुती व स्वयंभू गौरीशंकर मूर्ती देखील स्थापित करण्यात आली आहे. ज्यांचे मंदिर गावाच्या मधोमध आहे.
येथे गावात अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी महविश्र्नुंची भव्य मोठी यात्रा भरते. गावाच्या बाहेर भवानी टेकडीवर स्वयंभू आई भवानीमाता तसेच आई कालिंका माता व आई दुर्गामाता तसेच शिवलिंग व टेकडीच्या प्रवेशावर 11 फूट उंच हनुमान ची स्थापना केली आहे. गावात अमरावती नदी वाहते जिला आजही एथील लोक जीवनदायिनी म्हणून संबोधतात. नदीच्या कडेने एक गुहा आहे जी जिला ग्रामदेवता बकाटू माता म्हणून पुजले जाते. गावात आल्यावर बस स्थानकावर श्री छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भगवान गौतम बुद्ध तसेच गावाच्या मधल्या भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी व गावाच्या दुसऱ्या भागात विर एकलव्य अशे देखण्या जोगे व इतिहासाची जाणिव करून देणारे पुतळे स्थापित करण्यात आले आहेत. गावाच्या सीमेवर वनविभागाचा मोठा परिसर आहे ज्यात
भुसारा बरडा/बल्ला (डोंगर) व इतर झडवान परिसर आहे. त्यात अनेक प्राणी व पक्षी जसे लांडगे, कोल्हे, हरीण,माकड, रानडुक्कर, ससे,मोर, चातक, सुतारपक्षी, पोपट, कबुतर इत्यादी आढळतात.
गावाच्या पूर्व भागाला अमरावती (मालपुर) धरण आहे ज्याचा संपूर्ण जलमय भाग वैंदाने परिसरात येतो. येथील दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. या गावात अनेक हजारो भाविक भक्त अक्षय तृतीया यात्रे साठी दरवर्षी येत असतात.