वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय

जन्म: १८८०
मृत्यू: २ सप्टेंबर, १९३७
चळवळ: क्रांतिकार्य
वडील: अघोरनाथ चट्टोपाध्याय
पत्नी: बरदा सुंदरी देवी
अपत्ये: सरोजिनी नायडू आणि हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय

वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय(१८८० - २ सप्टेंबर, १९३७) हे एक प्रमुख भारतीय क्रांतिकारक होते. ज्यांनी शस्त्रास्त्रांचा वापर एक साधन म्हणून करून भारतात ब्रिटिश राजवट नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या महायुद्धचा काळात त्यांनी जर्मन साम्राज्यांशी संबंध जोडले, त्या वेळी बर्लिन समितीने ब्रिटनच्या विरोधात युरोपमधील भारतीय विद्यार्थ्यांचा सभेचे आयोजन केले व त्या वेळी त्यांनी जपानी कार्यवाहीचा शोध लावला. १९२० मध्ये ते भारतीय चळवळीसाठी कम्युनिस्टांचे समर्थन करण्यासाठी मॉस्को येथे गेले. चट्टोपाध्याय जर्मन कम्युनिस्ट पार्टी (केपीडी) मध्ये सामील झाले. १९३० च्या दशकात त्यांनी मॉस्को येथे वास्तव्य केले. जुलै १९३७ मध्ये जोसेफ स्टॅलीनच्या ग्रेट पर्जमध्ये अटक करण्यात आली, २ सप्टेंबर १९३७ रोजी वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना फाशी देण्यात आली.[१]

सुरुवातीचे जीवन[संपादन]

वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय जन्म १८८० साली झाला. त्यांचे लहानपणीचे टोपणनाव बिनी किंवा बिरेन असे होते. विरेन्द्रनाथ हे डॉ अघोरनाथ चट्टोपाध्याय यांचे सर्वात मोठे(द्वितीय) पुत्र होते. ते निजाम महाविद्यालयचे माजी प्राचार्य आणि प्राध्यापक होते, तसेच विज्ञान-तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञही होते. त्यांची पत्नी बरदा सुंदरी देवी ह्या बंगाली कुटुंबातील एक कवी आणि गायिका होत्या. त्यांची मुले सरोजिनी नायडू आणि हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय हे सुप्रसिद्ध कवी आणि संसद सदस्य होत्या. त्यांची दुसरी मुलगी मृणालिनी एक राष्ट्रवादी कार्यकर्त्या होत्या, तर मुलगा मारीन राजकीय कार्यात सक्रीय होता. चट्टोपाध्याय यांना धर्मनिरपेक्ष व उदारमतवादी शिक्षण मिळाले होते. त्यांना खुप साऱ्या भारतीय भाषांचे ज्ञान अवगत होते त्यामध्ये ते तेलुगू, तामिळ, बंगाली, उर्दू, पर्शियन, हिंदी, तसेच इंग्रजी भाषेत ते प्रवीण होते. तसेच ते फ्रेंच, इटालियन, जर्मन, डच, रशियन आणि स्कॅन्डिनेव्हियन भाषा शिकत होते. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी मद्रास विद्यापीठमधून मॅट्रिक केली व कलकत्ता विद्यापीठमधून आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली होती.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Some revolutionary workers (पान क्र.५१५ ते ५१८)" (PDF). https://cultural.maharashtra.gov.in (Maharashtra State Gazeteers Dept.). १७ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  2. ^ M, Shabeermon (2011-04-13). "HISTOBLOG: VIRENDRANATH CHATTOPADHYAYA". HISTOBLOG. Archived from the original on 2018-08-18. 2018-08-18 रोजी पाहिले.