"बांगलादेश विजय दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २०: ओळ २०:
== हेही पाहा==
== हेही पाहा==
* [[बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध]]
* [[बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध]]
* [[१९७१चे भारत-पाक युद्ध]]
* [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध]]





०२:३४, २३ डिसेंबर २०११ ची आवृत्ती


बांगलादेश विजय दिन बांगलादेश या दिवशी पाकिस्तान पासून स्वतंत्र झाला. बांगला मुक्ती वाहिनी ला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता.भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ ला सुरु होवून १६ डिसेंबर १९७१ ला संपले. बांगलादेशातील नागरीकांना व बांगला मुक्ती वाहिनी ला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने पाकिस्तानी हवाई दलाला आदेश देवून रॅ‍पीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येवून भारतीय धावपट्यांवर बाँब टाकून त्या निकामी केल्या. अवघ्या काही तासांच्या अवधीत भारतीय लष्कराने त्या धावपट्ट्या पुर्ववत करून हवाई हल्ल्याची तयारी केली.

भारताला गुंतवून,ठेवण्यासाठी, त्याच वेळी पाकिस्तान ने सीमेवरही हल्लाबोल केले. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानचा १४०००(?) किमी प्रदेश ताब्यात घेतला. हा प्रदेश १९७२ च्या शिमला करार तरतुदीत सद्भावनेचे प्रतिक म्हणून परत केला गेला. पुढे भारताने आपले डावपेच जास्त प्रखर करून समुद्र मार्गेही पाकिस्तानची नाकेबंदी केली. दोन पाकिस्तानी डिस्ट्रॉयर्स बुडवून व एक पाणबूडी भारतीय नौदलाने कराची बंदरात पाकिस्तानला नामोहरम केले.

पाकिस्तानच्या बांग्लादेशातल्या हवाई विभागावर हवाई हल्ले करून पाकिस्तानी हवाई दल उध्वस्त केले गेले. सर्व बाजूंनी कोंडी व पराभव झाल्यामुळे पाकिस्तान ने भारता समोर पराभव पत्करला. ९०००० पाकिस्तानी सैनीक भारताला शरण आले. अशा रीतीने भारताने एक बलशाली सत्ता व अभेद्य हवाईदल हा नावलौकीक स्थापन केला व युद्ध थांबले.

या युद्धाआधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी युरोप चा दौरा केला व ब्रिटनफ्रांस यांच्या सहीत जागतिक मत भारताकडे वळवले. त्याच वेळी रशिया बरोबर करार करून दडपण आणून चीन लाही या युद्धापासून दूर ठेवण्यात यश मिळवले. पाकिस्तानी सैन्याने या युद्धात बांगलादेशीयांवर अन्वनित अत्याचार केले होते. याच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत.

पुढे १६ डिसेंबर या नावाने १९७१ च्या युध्दाची पार्श्वभूमी घेऊन काढलेला चित्रपटही आहे.

हेही पाहा