"तिरुपती बालाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
124.123.62.158 (चर्चा)यांची आवृत्ती 1631592 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १: ओळ १:
{{हा लेख|बालाजी भारतीय देवता|बालाजी (निःसंदिग्धीकरण)}}
{{हा लेख|बालाजी भारतीय देवता|बालाजी (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Lord 4728$|thumb|right|श्री व्यंकटेश्वर]]
[[चित्र:Lord Venkat.jpeg|thumb|right|श्री व्यंकटेश्वर]]


'''बालाजी'''( [[तेलुगू]] వెంకటేశ్వరుడు , वेंकटेश्वरुडु! (डु हा आदरार्थी अव्यय) ) ही हिंदू देवता [[विष्णू|विष्णूचा]] अवतार मानली जाते. बालाजीचे मुख्य स्थान [[तिरुपती]] येथे आहे.
'''बालाजी'''( [[तेलुगू]] వెంకటేశ్వరుడు , वेंकटेश्वरुडु! (डु हा आदरार्थी अव्यय) ) ही हिंदू देवता [[विष्णू|विष्णूचा]] अवतार मानली जाते. बालाजीचे मुख्य स्थान [[तिरुपती]] येथे आहे.

१६:०९, १ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

श्री व्यंकटेश्वर

बालाजी( तेलुगू వెంకటేశ్వరుడు , वेंकटेश्वरुडु! (डु हा आदरार्थी अव्यय) ) ही हिंदू देवता विष्णूचा अवतार मानली जाते. बालाजीचे मुख्य स्थान तिरुपती येथे आहे.

मूर्ती

बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे.

तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी ह्या ख्रिश्चन धर्मस्थळानंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो. मंदिराची शैली दाक्षिणात्य गोपुर शैली आहे.

इतिहास

मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानन्यात येते. लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर ( तिरुमला) मोठे वारुळ होते. एका शेतक-यास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली. स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःच त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.


ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिराचा काळ किमान २००० वर्षे आहे. पल्लव राणी समवाईने इस. ६१४ मध्ये येथिल पहिली वेदी बांधली. [तमिळ] संगम साहित्यात (काळ: इसपूर्व ५०० - इस २००) या स्थानाचा उल्लेख आहे. चोळापल्लव साम्राज्यांनी मंदिराला दिलेल्या योगदानाचे कित्येक पट सापडले आहेत. चोळा राज्यकालात मंदिराच्या वैभवात वाढ झाली. १५१७ मध्ये कृष्णदेवराय राजाने दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यात आला. मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी मंदिराच्या कायमस्वरुपी देखभालीची व्यवस्था केली. त्यानंतर म्हैसूरगदवल संस्थानांद्वारे ही मंदिराला मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था १९३३ पर्यंत सुरु होती.[१] प्रशासकास विचरणकर्ता असे म्हणतात. १९३३ साली मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमलेला असे. सध्या देखील मंदिराची व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थानम विश्वस्त पाहतात.

तिरुमला रांगा मध्ये एकूण ७ डोंगर आहेत. मंदिर मुख्य शहरापासून सडकरस्त्याने २० किंमी अंतरावर आहे. बरेचसे यात्रेकरु ११ किमीची चढाई करणे देखील पसंत करतात. येथे रोज जवळपास ५०,००० दर्शनार्थी असतात.

ऊत्सव

ब्राह्मोत्सवम हा येथील मुख्य उत्सव आहे.

चित्रदालन

संदर्भ आणि नोंदी