"सोनू निगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
| वाद्य = |
| वाद्य = |
||
}} |
}} |
||
'''सोनू निगम''' हा [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक लोकप्रिय [[पार्श्वगायक]] आहे. सोनू निगमचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी [[फरिदाबाद]], [[हरयाणा]] येथे झाला. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केले आहेत. सचिन पिळगावकरच्या एका मराठी चित्रपटात त्याने गाणे व पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. काही हिंदी चित्रपटांत त्याने नायकाच्या भूमिकाही केल्या आहेत, पण तो प्रयत्न मात्र फारसा यशस्वी ठरला नाही. |
'''सोनू निगम''' हा [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक लोकप्रिय [[पार्श्वगायक]] आहे. सोनू निगमचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी [[फरिदाबाद]], [[हरयाणा]] येथे झाला. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केले आहेत. सचिन पिळगावकरच्या एका मराठी चित्रपटात त्याने गाणे व पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. काही हिंदी चित्रपटांत त्याने नायकाच्या भूमिकाही केल्या आहेत, पण तो प्रयत्न मात्र फारसा यशस्वी ठरला नाही. अंकशास्त्र्यांच्या सल्ल्यामुळे त्याने आपल्या नावाचे स्पेलिंग 'Nigam' ऐवजी 'Niigaam' असे बदलले होते, पण अधिक भरभराटीचे कोणतेही चिन्ह न दिसल्यामुळे स्पेलिंग परत पूर्ववत केले. |
||
=== कारकीर्द === |
=== कारकीर्द === |
२२:१४, ७ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
सोनु निगम | |
---|---|
सोनू निगम | |
आयुष्य | |
जन्म | ३० जुलै, १९७३ |
जन्म स्थान | फरिदाबाद, हरियाणा, भारत |
संगीत साधना | |
गायन प्रकार | पॉप, पार्श्वगायन |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | गायक, अभिनेता, संगीतकार |
सोनू निगम हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. सोनू निगमचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी फरिदाबाद, हरयाणा येथे झाला. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केले आहेत. सचिन पिळगावकरच्या एका मराठी चित्रपटात त्याने गाणे व पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. काही हिंदी चित्रपटांत त्याने नायकाच्या भूमिकाही केल्या आहेत, पण तो प्रयत्न मात्र फारसा यशस्वी ठरला नाही. अंकशास्त्र्यांच्या सल्ल्यामुळे त्याने आपल्या नावाचे स्पेलिंग 'Nigam' ऐवजी 'Niigaam' असे बदलले होते, पण अधिक भरभराटीचे कोणतेही चिन्ह न दिसल्यामुळे स्पेलिंग परत पूर्ववत केले.
कारकीर्द
सोनू निगम साधारण वयाच्या तिसर्या वर्षापासून आपल्या वडिलांसमवेत सभारंभात तसेच लग्न सोहळ्यात गायचा. बालपणात त्याने बर्याच गायन स्पर्धांतही यशस्वी भाग घेतला. वयाच्या साधारण १९ व्या वर्षी तो आपल्या वडिलांबरोबर मुंबईत आला.
त्याचे मुंबईतले सुरुवातीचे वास्तव्य धडपडीचे होते. टी- सिरीज कंपनीचे मालक यांनी त्याला संधी दिली. पण त्यातही त्याला मोहम्मद रफीचीच गाणी गाण्यासाठी मिळाली. त्यामुळे बर्याच लोकांपर्यंत आपला आवाज पोहचवूनही त्याच्यावर बर्याच जणांनी तो रफीची नक्कल करीत असल्याचा शिक्का मारला. १९९० मध्ये त्याने जानम चित्रपटासाठी पहिले गाणे गायले, पण काही कारणास्तव तो चित्रपट बंद पडला. दरम्यान, त्याने आकाशवाणीवरच्या जाहिरातींना आवाज दिला. अर्थात झी वाहिनीच्या सा रे गा मा कार्यक्रमाने त्याला ओळख दिली मग त्याने मागे वळून पाहिले नाही. मग बेवफा सनम चित्रपटातले त्याचे 'अच्छा सिला दिया तूने' हे गाणे तुफान गाजले आणि पार्शवगायक म्हणून स्थिरावण्याची संधी त्याला मिळाली.
सोनू ने सारेगामात सूत्रधाराची भूमिका घेतल्यापासून त्याला अधिकाधिक गाणी मिळू लागली. १९९७ च्या बॉर्डर चित्रपटातले "संदेसे आते है" हे त्याचे गाणे सुपरहिट झाले. त्यानंतर त्याच वर्षी प्रदेस चित्रपटातले ये दिल दिवाना हे गाणे त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यात आणि रफीच्या नकलेचा शिक्का पुसण्यास कामी आले. त्यानंतर त्याची स्वतंत्र शैली सर्वांनी मान्य केली. तसेच रोल मॉडेल म्हणूनही तो गणला जाऊ लागला.
गाण्यात भावना व्यक्त करणे, आवाजांचा पोत बदलणे यामुळे त्याला महान गायकांच्या श्रेणीत बसायला फार वेळ लागला नाही. हिंदीप्रमाणेच त्याने बंगाली, उडिया, कानडी, पंजाबी, तामीळ, तेलुगू, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी, मराठी या भाषांतही गाणी म्हटली आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |