"भारतीय आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ४६: | ओळ ४६: | ||
स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात काही समाजांत पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते. |
स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात काही समाजांत पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते. |
||
मराठीतील ’कर’ने शेवट होणारी आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर ([[माडगुळ]] गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे : पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या |
मराठीतील ’कर’ने शेवट होणारी आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर ([[माडगुळ]] गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे.) बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे : पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या नावांच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत. |
||
गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. |
गुजरातमधील काही पारशी आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. अहमदाबादवाला, खंबातवाला, गांजावाला, दारूवाला, नडियादवाला, मेहवाला, मेहसाणावाला, लकडावाला, लंडनवाला, सोडावाॅटरबाॅटलओपनरवाला, सोडावाला, वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे : मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत. गावावरून पडलेली आणखी आडनावे, भरूचा, सुरतिया, सुरती |
||
यांशिवाय कनोजिया, कांकरिया, कापडिया यांसारखी काही [[याकारान्त आडनावे|'या'कारान्त आडनावे]] असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे. |
यांशिवाय कनोजिया, कांकरिया, कापडिया यांसारखी काही [[याकारान्त आडनावे|'या'कारान्त आडनावे]] असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे. |
२३:५७, १ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
कुटुंब नाव किंवा आडनाव हे कटुंब, घराणे, अथवा मूळ गांव यांचे निदर्शक उपनाम म्हणून वापरले जाते. एकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळत असल्यामुळे निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली असावी. वैयक्तिक नावालाच पाळण्यातले नाव किंवा ख्रिश्चन नेम असे म्हणतात.
भारतातील नावे वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. नावे आणि आडनावे जात, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार बदलतात. उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत, त्याऐवजी वडिलांचे नाव किंवा त्या नावाचे आद्याक्षर जोडतात, आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक नावाआधी. उदा० एन.गोपालस्वामी अय्यंगार. यातले एन. म्हणजे नरसिंह, गोपालस्वामींच्या वडिलांचे नाव.
अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलिन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल.
भारतीय आडनावांमध्ये अनेकदा काही सूत्र असते. ग्रामनामावरून पडलेल्या मराठी आडनावांच्या शेवटी ’कर’ हा प्रत्यय असतो. वाल्हेकर, मुळगावकर, माडखोलकर, पुणेकर, माहीमकर ही त्याची उदाहरणे. जर त्या मराठी माणसाचे मूळ तेलंगणातले असेल तर ’कर’ऐवजी ’वार’ हा प्रत्यय असतो. उदा० अन्नमवार, कन्नमवार, चिद्रेवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार. पारपिल्लेवार, फुलकुंठवार, बोजेवार, मुनगंटीवार, हमपल्लीवार वगैरे. उत्तरी भारतात ’वार’ऐवजी ’वाल’असते. आगरवाल, बकलीवाल, धारीवाल इ.इ. धंद्यावरून किंवा गावांवरून ठेवली जाणारी बोहरी आणि पारशी आडनावे - कोलंबोवाला, दारूवाला, नडियादवाला, ताडीवाला, बाटलीवाला वगैरे.
याहून एक वेगळा प्रकार म्हणजे याकारान्त नावे. ही हिंदू, मुसलमान, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या पाचही धर्मीयांमध्ये आढळतात. हिंदूंमधली अशी आडनावे असणारे बहुधा मारवाडी, गुजराती किंवा सिंधी-पंजाबी असतात. नावे अशी -
- आंटिया
- कनोजिया
- कांकरिया
- कापडिया
- कुटमुटिया
- कोडिया
- चोरडिया
- छाब्रिया
- झकेरिया
- झाझरिया
- डालमिया
- डिया
- देढिया
- दोडिया
- फिरोदिया
- बगाडिया
- बोखारिया
- भांखरिया
- भाटिया
- मारडिया
- मोठवाडिया
- रुईया
- रेशमिया
- लोहिया
- वाडिया
- सिंघानिया
- सिसोदिया
- सुरपुरिया, वगैरे वगैरे.
भारताच्या पूर्व भागातील नावे
पश्चिमी भारतातील नावे
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील नामकरण पद्धतीमध्ये मधले नाव वडिलांचे किंवा पतीचे असते. उदाहारण : सचिन रमेश तेंडुलकर या क्रिकेटपटूच्या नावातील पहिले नाव "सचिन", मधले नाव "रमेश" हे वडिलांचे नाव तर "तेंडुलकर" हे आडनाव आहे.
स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात काही समाजांत पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते.
मराठीतील ’कर’ने शेवट होणारी आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर (माडगुळ गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे.) बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे : पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या नावांच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत.
गुजरातमधील काही पारशी आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. अहमदाबादवाला, खंबातवाला, गांजावाला, दारूवाला, नडियादवाला, मेहवाला, मेहसाणावाला, लकडावाला, लंडनवाला, सोडावाॅटरबाॅटलओपनरवाला, सोडावाला, वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे : मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत. गावावरून पडलेली आणखी आडनावे, भरूचा, सुरतिया, सुरती
यांशिवाय कनोजिया, कांकरिया, कापडिया यांसारखी काही 'या'कारान्त आडनावे असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे.
'नी'कारान्त किंवा 'णी'कारान्त आडनावे
नीकारान्त व णीकारान्त आडनावे बहुधा सिंधी लोकांची असतात, तशी ती काही गुजराथी-मारवाड्य़ांचीही असतात. 'वाणी' या सारखे एखादेच नाव मराठी असते. अशी काही आडनावे :-
अखानी, अडानी, अंबानी, अलानी, आंबलानी. आमलानी, गंगवानी, घेलानी, चटवानी, चांदवानी, जानी, बडयानी, बडीयानी, बिमाणी, बुंदियानी, भायानी, भीमजयानी, भूपतानी, भोजानी, मेघाणी, रूपाणी, लाखाणी, शहानी, वगैरे
सिंधी आडनावे
अजवाणी, कर्णमलानी, केवलरामाणी, गिडवाणी, चंडीरामाणी, जगतियानी, गुरसियानी, पुर्सनानी, बुटाणी, भगतानी, भटियानी, भवनानी, भोजवानी, मतलानी, मीरचंदानी, मोटवानी, रामाणी, वासवानी, हरियाणी, हिंगोराणी
मराठी आडनावे
महाराष्ट्रातील मराठी आडनावांइतकी विविधता जगात इतरत्र क्वचितच आढळेल. त्या आडनावांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल :-
गावावरून किंवा प्रदेशावरून
उदा० अकोले गावावरून अकोलकर, अडगुलवरून अडगुलवार, आरोंदे गावावरून आरोंदेकर, आष्टनकर, इंगळहळ्ळीकर, गुजराथी, गुमगावकर, तावशी गावारुन तावसकर, पंजाबी, पारे गावावरून पारेकर, मारवाडी, रेवणवरून रेवणवार, वाल्हे गावावरून वाल्हेकर, वगैरे.
निसर्गातील एखाद्या स्थलविशेषावरून
ओढे, डोंगरे, ढगे, पर्वते, वगैरे
प्राण्यावरून किंवा पक्ष्यावरून
कावळे, कोकीळ, कोळी, कोल्हे, गरुड, गाढवे, घारे, घोडावत (राजस्थानी आडनाव), घोडे, घोडके, घोडचौरे, चोचे, चोरघोडे, डुकरे, ढोक, तरस, तितीरमारे, नाग, पाखरे, पाल (बंगाली आडनाव), पिसे, पोपट, पोळ, बकरे, बोकड, बोके, मांजरे, मुंगी, मोरे, रानबोके, लांडगे, वाघ, वाघमारे, शेळके, सरडे, मुंगुसमारे, वगैरे’ घोडके
शरीराच्या अवयवावरून
- डोईफोडे
- डोके
- दंडगे
- दंडवते
- दहातोंडे
- पायगुडे
- पायमोडे
- बाराहाते
- लांबकाने
- मानकापे
भाज्यांच्या किंवा फळांच्या नावावरून
आंबेकर, आवळे, कणसे, काकडे, केळकर, चिंचोरे, गाजरे, नारळीकर, पडवळ, फणसे, भेंडे, भोपळे, मुळे, वांगीकर, वगैरे.
पूर्वजांच्या व्यवसायावरून
कुलकर्णी, कुळकर्णी, कोळी, गुरव, देशपांडे, देशमुख, पाटील, लोहारे, लोहोकरे, वाणी, शिंपी, सुतार, सोनार, सोनी (गुजराथी)
फार्सी धातू नविश्तन् लागून होणारी आडनावे
कापडणवीस, कारखानीस, कोटणीस, खासनीस, चिटणीस, जमेनीस, तटणीस, पागनीस, पारसनीस, पोतनीस, फडणीस, फडणवीस वाकनीस, हसबनीस
वस्तूवरून
ताटे, पाटे, पोटे, लाटे, लोटे,
मुस्लिम संस्कृतीतून आलेली नावे/आडनावे
आबाजी, पागे, पेशवे, बाजीराव, बाबूराव, मिराशी, मुकादम, मुतालीक, मोगल, वकील, शहाजी
मराठी आडनावांची यादी :
अ
अंकलीकर, अकोलकर, अग्निहोत्री, अडगुलवार, अडागळे, अधिकारी, अवचट, अहिरे,
आ
आगरकर, आगलावे, आजगावकर, आठवले, आडवे, आडे, आडेकर, आपटे, आंबटकर, आंबले, आंबिले, आंबेकर, आंबेडकर, आमले, आमनेरकर, आरोंदेकर, आवटे, आवळे, आष्टनकर,
इ/उ/ए/ओ
इंगळहळ्ळीकर, इंगळे, इचलकरंजीकर, इरुळे, उशिरे, उशीर, उसरे, एकबोटे, ओगले, ओतूरकर,
क
कडू, कदम, कन्नाके, कपाळे, कमलाकर, करकरे, करंगळे, करडे, करपे, करमरकर, करवंदे, कर्डीले, कर्डीवाळ, कर्वे, कल्याणी, काकड, काकडे, काजळे, कांडलकर, काण्णव, कातोते, कांदळकर, कानडे, कानफाडे, कानविंदे, कानिटकर, कापडी, कापसे, काबरे, कांबळे, कामत, कामाने, कामारकर, कामेरकर, कारखानीस, कारुळकर, कारेकर, कालकुंद्रीकर, कालगुडे, काशीकर, काळे, काळेल, काळेले, किर्लोस्कर, कीर्तनकार, कीर्तिकर, कुमदाळे, कुमावत, कुरसंगेˌ कुर्लेकर, कुलकर्णी, कुलसंगेˌ केकडे, केरकर, केरूळकर, केसकर, केळकर, कोकाटे, कोचे, कोठारे, कोडगिरवार, कोडीतकर, कोतवाल, करकंडे, कोरडे, कोरगावकर, कोरे, कोलटक्के, कोहोजकर, कोळी, काेळेकर
ख
खडके, खड्ये, खतगांवकर, खत्री, खंदारे, खरसाडे, खरसुंडीकर, खराटे, खरात, खरे, खरोले, खर्चे, खलबते, खवस, खळे, खाटमोडे, खांडगे, खांडरे, खाडे, खांडेकर, खांडे(भराड), खाड्ये, खांदवे, खानवलकर, खानविलकर, खानापूरकर, खानोलकर, खापरे, खांबल, खांबे, खांबेटे, खामकर, खिलारी, खिलारे, खुजे, खुटवड, खुटे, खुडे, खुतारकार, खेटे, खेसे, खैरनार, खैरमोडे, खैरे, खोगरे, खोचरे, खोटे, खोत, खोपडे, खोले, खोसे,
ग
गजेंद्रगडकर, गडकर, गडकरी, गणगोत्रे, गद्रे, गबाळे, गरुड, गवस, गवळी, गवाणकर, गव्हाणे, गांगर्डे, गांगुर्डे, गांजावाला, गाडगीळ, गाडे (पाटील), गाढवे, गाढे, गांधी, गायकवाड, गायतोंडे, गावडे, गावणकर, गावसकर, गिलबिले, गुजर, गुप्ते, गुरव, गोखले, गोटे, गोडसे, गोते, गोंदकर, गोन्साल्वीस, गोरुले, गोरे, गोवारीकर, गोवित्रीकर, गोवेकर, गोसावी, गोळे
घ
घरवाडे, घाटगे, घाटे, घाडगे, घावडे, घुर्ये, घेगडे, घेगडेधार, घेवडे, घोगरे, घोडेले, घोरपडे, घोलप,
च
चंद्रचूड, चंद्रवंशी, चंद्रात्रे, चंद्रात्रेय, चनशेट्टी, चमकेरी, चरपे, चवरे, चव्हाण, चव्हाणके, चांगले, चांदे, चांदोरकर, चांदोलकर, चापेकर, चाफे, चाफेकर, चिकटे, चिकणे, चिंचुलकर, चिंचोळकर, चिटको, चिटणीस, चितळे, चिंतामणी, चित्रे, चिंदरकर, चिपळूणकर, चोडणकर, चोपडे, चोपे, चौगुले, चौधरी, चौरे,
छ
छत्रे, छप्परवाल, छापीकर
ज
जगताप, जगदाळे, जंगम, जंगले, जमदाडे, जयकर, जवळकर, जांगळे, जाधव, जांभळे, जामनिक, जायभाये, जावकर, जिचकर, जोशी
झ
झगेकार, झरे, झरेकर, झाडगावकर, झाडे, झारापकर, झेंडे, झेंडेकर, झोपे,
ट,ठ
टकले, टिळक, टिळेकर, टेकवडे, टेंबे, ठोंगे, ठोंबरे,
ड
डक, डख, डफळ, डफळे, डोईफोडे, डोके, डोंगरे, डोंगळे,
ढ
ढंभेरे, ढमढेरे, ढमाले, ढवळे, ढाकणे, ढोबळे
त
तनपुरे, तळपदे, तळेकर, तळेले, ताकवले, ताकसांडे, ताटे, तांदळे, तापकीर, तांबे, ताम्हाणे, तायडे, तारमळे, तावडे, तावसकर, तितीरमारे, तुपे, तुळसकर, तेंडुलकर, तोकडे, तोडणकर
द
देशपांडे, देशमाने, देशमुख. देवरे
न
नखरे, नगरनाईक, नजरबागवाले, नरवडे, नरवाडे, नलावडे, नवले, नाईक, नाखरे, नागदेवे, नागपुरे, नागपूरकर, नागमोते, नागवे, नागवडे, नाडकर्णी, नातू, नांदरे, नांदूरकर, नाबडे, नामवाड, नायक, नारकर, नारळे, नारोळे, नालुगडे, नाले, नावकर, नासरे, निकम, निगडे, निंबाळकर, निंभोरकर, निमकर, निवंगुणे, नुपनर, नेने, नेमाडे, नेमाणे, नेरूरकर, नेसनतकर
प
पगारे, पंचनदीकर, पंचपोर, पटवर्धन, पडवळ, पंडित, पतके, परते, परब, परमार, परांजपे, परांजप्ये, पवार,पवार-घेगडेधार, पांगारकर, पाचपोर, पाचर्णे, पाचोरे, पाटकर, पाटणकर, पाटील, पाठक, पांडे, पाताडे, पानतावणे, पायगुडे, पारकर, पारखी, पारखे, पारगावकर, पारेकर, पालेकर, पावगी, पाष्टे, पितळे, पिसाळ, पिळगावकर, पिळणकर, पुजारी, पुडके, पुरकर, पुरोहित, पुसाळकर, पुळेकर, पेठे, पेडणेकर, पेंडसे, पेंढारकर, पेशवे, पोटदुखे, पोटे, पोतदार, पोतनीस, पोरजे, पोरंपाजे, पोवार, पोळ, प्रभुदेसाई, प्रभू,
फ
फड, फडके, फरगडे, फाकले, फाटक, फाटे, फावरे, फुगे, फुटाणे, फुलझेले, फुलपगार, फुलपगारे, फुलमाळी, फुलसुंदर, फुले,
ब
बगडाने, बगाटे, बच्चे, बंडगर, बनकर, बनसोडे, बर्वे, बागगावकर, बागवान, बागवे, बागोरे, बाजड, बापट, बाबर, बामणे, बारटक्के, बाळफाटक, बांदोडकर, बाहेकर, बिबीकर, बुधे, बूसाठे, बेडगे, बेलदार(कुमावत), बेंद्रे, बेर्डे, बेलसरे, बैताडे, बोके, बोडनासे, बोंडाळे. बोबडे, बोरकर, बोरगावकर, बोरसे, बाेराडे
भ
भट, भंडारी, भाटकर, भाटवडेकर, भांडारकर, भांडे, भामरे, भालेकर, भालेराव, भुजबळ, भिडे, भिंडे, भिसे, भेगडे, भोकरे, भोगले, भोते, भोमकर, भोर, भोले, भोसले, भोळे
म
मडके, मयेकर, मराठे, मसुरकर, मसुरेकर, महागावकर, महाजन, महाडिक, महामुनी, महेंद्रकर, मांगले, मांजरे, मांजरेकर, माडीवाले, मातुरे, मानगांवकर, माने, मारणे, मालवणकर, मा(हि)हीमकर, मिंडे, मिरजकर, मिरासदार, मिसाळ, मिस्त्री, मुंडे, मुजुमदार, मुरकुटे, मुसमाडे, मुसळे, मुळे, मुळये, मेश्राम, मेस्त्री, मेहेंदळे, मोटे, मोडक, मोने, मोरे, मोहरीर, मोहरील, मोहिते, मोहोड, म्हलाने, म्हस्के, म्हात्रे, म्हापणकर,
य
यवतकर, यज्ञोपवीत, यादव, येरावार, येवले, येवलेकर
र
रतनाळीकर, रत्नपारखी, रसम, रसाळ, रहाणे, रहिराशी, राऊत, रांगणेकर, राखुंडे, राचमले, रांजणे, राजवाडे, राजिवडे, राजे, राठोड, राणे, रानडे, रानबोके, राने, राव, रावकर, रावते, राहंगडाले, राहते, रिकामे, रिसबूड, रेगे, रेणावीकर, रेवणकर, रेवणवार, रेवणशेट्टे,
ल
लाखे, लागू, लाड, लाले, लिमये, लेले, लोखंडे, लोटलीकर
व
वकटे, वंजारे, वरटकर, वझे, वडाभाते, वर्तक, वाकडे, वाघ, वाघधरे, वाघमारे, वाघमोडे, वाटकर, वाटवे, वाटेकर, वाठोरे, वानखडे, वानखेडे, वायंगणकर, वासे, वाल्हेकर, वाळवे, विचारे, विंझे, विटेकर, विद्वांस, वेंगुर्लेकर, वैद्य,
श
शंभरकर, शहाणे, शिंदे, शिरोडकर, शिर्के, शिवडे, शेट्ये, शेडगे, शेळके
स
सकपाळ, सकस, सकारकर, संगमनेरे, सपकाळ, सप्रे, सय्यद, सरंजामे, सरडे, सरदेशपांडे, सरनाईक, सरवदे, सरोदे, सव्वासे, सहस्रबुद्धे, साटम, साठे, सातपुते, सातारकर, सानप, साने, साप्ते, साबडे, साबळे, सामंत, सार्डिवाल, साव, सावंत, सावदेकर, सावरकर, सावर्डेकर, सावळेकर, सासवडकर, साळगावकर, साळवी, साळवे, साळसकर, साळुंखे, सुखटणकर, सुरवसे, सुर्यवंशी, सुर्वे, सूर्यवंशी, सोंगटे, सोंदनकर, सोनकांबळे, सोनटक्के, सोनवणे, सोनार, सोनारकर, सोनावणे, सोनावळे, सोपारकर, सोमदे, सोलनकर, सोवनी, सोहोनी, स्वामी,
ह
हगवणे, हरदास, हरावत, हरिनखेडे, हर्डीकर, हागे, हिंगे, हिवाळे, हुमन, हुमने, होगे, होनाळे,
क्ष
क्षीरसागर
मराठी आडनावांत ओकारान्त, याकारान्त आडनावे असतात, तशीच ’जे’कारान्त, ‘डे’कारान्त, 'बे'कारान्त, आणि 'भे'कारान्त आडनावेही असतात. अशी काही आडनावे :-
जेकारान्त
- ताटपुजे
- नागरगोजे
- पोरजे
- पोरंपाजे
डेकारान्त
अरगडे, अलगडे, आडे, आंबवडे, आंबाडे, उंडे, उराडे, कदमबांडे, करडे, करंडे, काकडे, कातुर्डे, कानडे, कानफाडे, कारंडे, कासारखेडे(कर), काळगुडे, केकडे, कोरडे, खाटमोडे, खाडे, खांडे(कर), खांडे(भराड), खुडे, खोडे, खोतलांडे, खोपडे, खोब्रागडे, खोलंगडे, गराडे, गवांडे, गांगुर्डे, गाडे(कर), गायतोंडे, गावडे, गावंडे, गिंडे, गोजमगुंडे, गोडे, गोलांडे, घरवाडे, घांगुर्डे, घाडे, घालुगडे, घेवडे, घोडे, घोरपडे, चिंचवडे, जगनाडे, जमदाडे, जानगुडे, झगडे, झेंडे, टेकवडे, डोईफोडे, तांगडे, तायडे, तावडे, तोकडे, दबडे, दराडे, दरोडे, दाभाडे, दामगुडे, देवडे, देशपांडे, धनवडे - पवार कुळी संदर्भ:www.dharpawar.com,धनावडे, धांगुर्डे, धांडे, धोंगडे, नरवडे, नरवाडे, नलावडे, नागवडे, नालुगडे, निगडे, नेमाडे, पलांडे, पांडे, पायगुडे, पिंडे, पुंडे,फरगडे, बनसोडे, बलकवडे, बागडे, बानुगडे, बांडे, बेंडे, बेर्डे, बेलखोडे, बैनाडे, बोबडे, बोऱ्हाडे, भाईगडे, भांडे, भिडे, भिंडे, भुंडे, भेगडे, भेंडे, माडे, मांडे, मातीगडे, मिंडे, मुंडे,मुसमाडे, राखुंडे, राजवाडे, रानडे, रेडे, रोकडे, रोडे, लकडे, लबडे, लांडे, लोखंडे, वाईंगडे, वाघमोडे, शिवडे, शेंडे, सरदेशपांडे, साबडे, हंबरडे, हांडे, हुंडे(करी), वगैरे.
बेकारान्त
- गोडांबे
- गोलांबे
- चौबे (हिंदी-गुजराती आडनाव)
- टेंबे
- तांबे
- दुबे (हिंदी-गुजराती आडनाव)
- बिंबे
- बोंबे
- भोबे
- लांबे
- लेंभे
- वाळंबे
- वाळिंबे
- शेंबे
- सुंबे
भेकारान्त
- उभे
- चोभे
- जांभे
- टेंभे
- लंभे
- लेंभे
- लोभे
- सुंभे
दक्षिणी भारतातील नावे
प्राचीन काळापासून दक्षिणी भारतीय लोकांत एका खास प्रकारच्या नामकरण पद्धती प्रचलित आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एकच नाव दिले जात होते. ते पुढील कारणांपैकी एका कारणामुळे दिले जात असे. :
- त्याचे गाव किंवा नगराचे नाव, उदा., इंकोल्लु, उद्यवारा, कुलार, कोकर्डी, चावली, चिट्टी, जनस्वामी, दासिग, बंगळूर, सिंग्री (सिंगिरी), हट्टंगडी, हट्टिंगडी, हुबळी, इत्यादी.
- त्यांच्या परिवारावरून किंवा वंशावरून नाव, उदा. पुलितेवर, सहोंता.
- जातीवरून नाव, उदा. अय्यंगार, अय्यर, राव, नायर.
आडनाव हा प्रकार दक्षिणी भारतीयांत नाही.
उत्तरेकडील आडनावे
अग्निहोत्री, अग्रवाल, आगरवाल, आर्य, आहुजा, कपूर, कोहली, खन्ना, खान, खुराणा, गोयल, चतुर्वेदी, चोपडा, चोप्रा, चौहान, त्यागी, त्रिपाठी, त्रिवेदी, दास, देसाई, द्विवेदी, पांडे, पाण्डेय, बेदी, भट, भट्टी, मल्होत्रा, माथूर, मिश्रा, मिस्त्री, मौर्य, यादव, रंधावा, राजपूत, राठोड, रायजादा, रोशन, वर्मा, व्यास, शर्मा, शास्त्री, श्रीवास्तव, सिंघल, सिंघानिया, सेठी,
बंगालमधील आडनावे
(आडनावात शेवटी अकारान्त जोडाक्षर आल्यास त्याचा उच्चार आकारान्त होतो.)
गुप्त (उच्चार गुप्ता), घोष, चक्रवर्ती (उच्चार चोक्रोबोर्ती), चटोपाध्याय(चॅटर्जी), ठाकुर (टागोर), दास, बंडोपाध्याय-वंद्योपाध्याय (बॅनर्जी), वर्मन् (उच्चार बर्मन), वसु-बसु-बोशू, (बोस), भौमिक, मिश्र (उच्चार मिश्रा), मुखोपाध्याय (मुखर्जी), राय-रॉय (रे), सारंगी, सेन, सरकार (सोरकार)
- जोडनावे
दासगुप्त, रॉयभौमिक, रॉयचौधरी, सेनगुप्त, सेनरॉय, रायसेन, ही बंगाली जोडआडनावे प्रसिद्धच आहेत. काही बंगाली आडनावे तिहेरी असतात. उदा० बसू राय चौधरी, घोष रॉय चौधरी वगैरे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक गुरू दत्तची पत्नी असलेली प्रसिद्ध गायिका गीता दत्त, हिचे माहेरचे आडनाव घोष रॉय चौधरी होते, सासरचे दत्त (पदुकोण नाही!).
गुजरातमधील आडनावे
अंबानी, गढा, गांधी, चौहान, मेहता, मोदी, शहा, शाह,
पहा
ओकारान्त नावे : याकारान्त आडनावे : मराठी नावे
|} |}