Jump to content

"श्राद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६८: ओळ ६८:
'''(१४) एकादश मासिक,'''
'''(१४) एकादश मासिक,'''


'''(१५) द्वादश मासिक''' :- हीं ज्या त्या महिन्याचे आरंभी करतात.
'''(१५) द्वादश मासिक''' :- ही ज्या त्या महिन्याचे आरंभी करतात.


'''(१६) ऊनाब्दिक''' : - बारावा महिना ज्या दिवशीं संपतो त्या दिवसाचे पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हांहि करावें. अधिक मास त्या महिन्याचें मासिक श्राद्ध दोनदां करावें; म्हणजे एकंदर सतरा श्राद्धें करावयाची. ही सर्व मासिकें खरोखर त्या त्या उक्त कालीं केलीं पाहिजेत; परंतु बारावे दिवशीं सपिंडी करावयाची असल्यानें, व सपिंडी करण्याचा अधिकार मासिक श्राद्धें केल्यावांचून प्राप्त होत नसल्यानें, ती अकरावे किंवा बारावे दिवशी अपकर्ष करून ( अलीकडे ओढून घेऊन ) करण्याची चाल आहे. वास्तविक पाहतां सपिंडीकरणश्राद्ध हें सर्व मासिकें झाल्यानंतर वर्षाचे शेवटचे दिवशी अब्दपूरित श्राद्ध करून करावें, हा उत्तम पक्ष, असें वचन आहे. परंतु सपिंडी केल्याशिवाय चल, उपनयन, विवाह इत्यादि मंगलकार्ये करतां येत नसल्यानें, सपिंडी श्राद्ध बारावे दिवशींच करण्याचा आतां प्रघात पडला आहे या विषयीं धर्मसिंधूंत आनंत्यात्कुलधर्माणां पुंसां चैवायुषः क्षयात् । अस्थिरत्वाच्छरीरस्य द्वादशाहः प्रशस्यते असें वचन आहे. म्हणजे, कुलधर्म अपार आहेत, व मनुष्याचें आयुष्य क्षणभंगुर आहे, तसेंच शरीर अशाश्वत आहे; यासाठी बारावा दिवस ( सपिंडीस ) योग्य आहे. या कारणास्तव सपिंडी अलीकडे घेतल्यानें तत्पूर्वींचीं जीं मासिक श्राद्धें तीहि सपिंडीपूर्वीं ओढावी लागली. तथापि सपिंडी झाल्यावर हीं सर्व मासिकें तत्तत्कालीं पुन्हां करतात. याबद्दल पुढें विवेचन केलें आहे. ( पहा सपिंडी प्रकरण ).
'''(१६) ऊनाब्दिक''' : - मृत्यूनंतर बारावा महिना ज्या दिवशी संपतो त्या दिवसाच्या पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हाही करतात. मृत्यूचा दिवस अधिक मासात येत असल्यास त्या महिन्याचे मासिक श्राद्ध दोनदा करतात.; म्हणजे एकंदर सतरा श्राद्धे होतात. ही सर्व मासिके खरोखर त्या त्या उक्त काळी केली पाहिजेत; परंतु बाराव्या दिवशीं सपिंडी करावयाची असल्यानेे, व सपिंडी करण्याचा अधिकार मासिक श्राद्धेे केल्यावाचून प्राप्त होत नसल्याने, ती अकराव्या किंवा बाराव्या दिवशी अपकर्ष करून (अलीकडे ओढून) करण्याची चाल आहे. वास्तविक पाहता सपिंडीकरणश्राद्ध हे सर्व मासिके झाल्यानंतर वर्षाच्या शेवटचे दिवशी अब्दपूरित श्राद्ध करून करणे, हा उत्तम पक्ष, असे वचन आहे. परंतु सपिंडी केल्याशिवाय चल, उपनयन, विवाह इत्यादि मंगलकार्ये करतां येत नसल्याने, सपिंडी श्राद्ध बाराव्या दिवशींच करण्याचा आता प्रघात पडला आहे या विषयी 'धर्मसिंधू' ग्रंथात ‘आनंत्यात्कुलधर्माणां पुंसां चैवायुषः क्षयात् । अस्थिरत्वाच्छरीरस्य द्वादशाहः प्रशस्यते ॥’ असें वचन आहे. म्हणजे, कुलधर्म अपार आहेत, व मनुष्याचें आयुष्य क्षणभंगुर आहे, तसेंच शरीर अशाश्वत आहे; यासाठी बारावा दिवस (सपिंडीस) योग्य आहे. या कारणास्तव सपिंडी अलीकडे घेतल्याने तत्पूर्वींची जीं मासिक श्राद्धे तीहि सपिंडीपूर्वी ओढावी लागली. तथापि सपिंडी झाल्यावर हीं सर्व मासिके तत्काळी पुन्हा करतात. याबद्दलचे विवेचन धर्मशास्त्राचा इतिहास (डॉ. पां.वा. काणे, १९८० या गंथातील सपिंडी प्रकरणात केले आहे.

सोळा श्राद्धांस सोळा ब्राह्मण सांगावे. त्यांची श्मश्रू सकाळीं करवून अभ्यंग स्नान घालावें, व दुपारीं एकोद्दिष्ट श्राद्धाप्रमाणें एक तंत्रानें ( एकदम ) ही श्राद्धें करावी. असमर्थानें आमान्नानें करावींत.
सोळा श्राद्धांस सोळा ब्राह्मण सांगतात. त्यांची श्मश्रू सकाळीं करवून त्यांना अभ्यंग स्नान घालतात. व दुपारीं एकोद्दिष्ट श्राद्धाप्रमाणें एक तंत्राने (एकदम) ही श्राद्धे करतात. असमर्थाने आमान्नाने करावींत.


==तर्पण==
==तर्पण==
पितरांना वंशजांकडून जशी पिंडदानाची व ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते,त्याचप्रमाणे त्यांना उदकाचीही अपेक्षा असते. पितरांना उद्देशून दिलेले हे उदक म्हणजे पितृतर्पण होय.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा </ref>
पितरांना वंशजांकडून जशी पिंडदानाची व ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे त्यांना उदकाचीही अपेक्षा असते. पितरांना उद्देशून दिलेले हे उदक म्हणजे पितृतर्पण होय.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा </ref>


==संदर्भ==
==संदर्भ==
*[http://www.sanatan.org/mr/a/778.html sanatan.org या संकेतस्थळावरील श्राद्ध विधी विषयक लेख]
*[http://www.sanatan.org/mr/a/778.html sanatan.org या संकेतस्थळावरील श्राद्धविधी विषयक लेख]


[[वर्ग:हिंदू धर्म उपासना पद्धती]]
[[वर्ग:हिंदू धर्म उपासना पद्धती]]

१५:४०, १८ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

श्राद्धविधीतील पिंडदान

'श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे.[]

पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. वडिलांच्या मृत्युतिथीला या पितृपक्षकाळात ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे. त्यानिमित्त पिंडदान करतात. प्रत्येक गृहस्थाश्रमीला तीन प्रकारचे कर्ज (ऋण) फेडायचे असते, असा समज आहे. मातृऋण, पितृऋणसमाजऋण. ही सर्व ऋणे पुत्राने/पौत्राने फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे असा शास्त्रसंकेत आहे. या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात. श्राद्धविधी सुरू असतांना मृत व्यक्तीचा आत्मा तेथे वासनामय कोषात उपस्थित असतो, असा समज आहे. पितरांचे श्राद्ध करतांना पिता पितामह प्रपितामह यांचेही स्मरण करतात. त्या आधीच्या पिढ्या ह्या मुक्त झालेल्या असतात असे मानतात. शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्यास मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो अशी भावना आहे. अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध अमावस्येस करतात. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने मृत्यू पावलेल्यांचे श्राद्ध करतात. पितृपक्षात अन्नदान व गोग्रास यांचेही महत्त्व मानतात. अधिक मासात मृत्यू पावलेल्याचे श्राद्धही महालयात (पितृपक्षात) त्याच तिथीवर करतात.

व्याख्या

धर्मशास्त्रावरील निरनिराळ्या ग्रंथात श्राद्धाच्या व्याख्या दिल्या आहेत. त्या अश्या - ब्रह्मपुराणात म्हटले आहे की 'पितराना उद्देशून (त्यांच्या हिताकरिता) जे जे काही योग्य काळी, योग्य स्थळी, सत्पात्र व्यक्तींना आणि ब्राह्मणाना धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीला अनुसरून श्रद्धापूर्वक देण्यात येते त्याला श्राद्ध म्हणतात.

याज्ञवल्क्याने म्हटले आहे की पितर म्हणजे श्राद्धामध्ये देवता असणारे वसू, रुद्र,आणि आदित्य श्राद्धाच्या योगाने संतुष्ट होऊन मनुष्याच्या पूर्वजांना संतोष देतात.[]

इतिहास

पितरांच्या अंगात जिवंत मनुष्यांचे हित अथवा अहित करण्याचे सामर्थ्य असते अशा प्रकारची कल्पना वेदांच्या काळी अस्तित्वात असल्याचे ऋग्वेदातील उल्लेखावरून आढळून येते. त्यामुळे प्राथमिक स्थितीत असणाऱ्या मृतांची पूजा करणे हे एक प्रमुख लक्षण बनले. अत्यंत प्राचीन काळी मृत पूर्वजांचा राग घालविण्याच्या उद्देशाने त्यांना उद्देशून काही पदार्थ अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल, त्यांना उद्देशून काही विधी करण्यात येऊ लागले असतील, आणि तो प्रघात आणि ते विधी पुढील काळात त्या मृत पूर्वजांविषयी शुद्ध प्रेमाचे लक्षण म्हणून पुढे चालू राहिले असावेत.[]

श्राद्धाचे प्रकार

  • अष्टका श्राद्ध (वद्य अष्टमीला करावयाचे श्राद्ध)-कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेनंतरच्या अष्टमीला केले जाणारे श्राद्ध.
  • आत्मश्राद्ध-जिवंत असताना गया येथे जाऊन स्वत:च स्वत:चे केलेले श्राद्ध . हे संन्यासी लोकांना संन्यास दीक्षा देण्यापूर्वीही करून घेतले जाते.
  • एकोद्दिष्ट - केवळ एकाला म्हणजे दिवंगत व्यक्तीला उद्देशून केले जाणारे श्राद्ध.
  • कर्मांगश्राद्ध -गर्भाधान, पुंसवन संस्कार अशा प्रसंगी केले जाणारे श्राद्ध.
  • काम्य श्राद्ध - विशिष्ट फळाच्या इच्छेने केले जाणारे श्राद्ध.
  • गोष्ठीश्राद्ध-श्राद्ध विषयाची चर्चा ऐकून त्यापासून प्रेरणा घेऊन केले जाणारे श्राद्ध. विद्वान लोकांनी एकत्र येऊन, श्राद्धाची सामग्री एकत्र करून पाच जणांनी केलेले सामूहिक श्राद्ध
  • घृतश्राद्ध (यात्राश्राद्ध)-यात्राप्रसंगी करावयाचे श्राद्ध. यामध्ये ब्राह्मणाला काही प्रमाणात तुपाचे दान केले जाते.
  • चटश्राद्ध-श्राद्धासाठी ब्राह्मण न मिळाल्यास दर्भावर त्याचे आवाहन करून केलेले श्राद्ध.
  • तीर्थश्राद्ध -गया, प्रयाग, काशी, हरिद्वार इ.तीर्थक्षेत्रांत आणि पवित्र समजल्या गेलेल्या नद्यांच्या संगमस्थानी आपल्या पूर्वजांसाठी केलेले श्राद्ध.
  • दैविकश्राद्ध -देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाणारे श्राद्ध.
  • नवमिश्र श्राद्ध-मृत्यूनंतर ११ व्या दिवसापासून पुढे ६ महिन्यापर्यंत केले जाणारे श्राद्ध.
  • नवश्राद्ध - [[मृत्यू] नंतर १० अथवा ११ व्या दिवस केली जाणारी श्राद्धे.
  • नांदीश्राद्ध - पुत्रजन्म, विवाह, उपनयन अशा शुभ प्रसंगी जे वृद्धिश्राद्ध करतात ते नांदीश्राद्ध होय.
  • नित्य श्राद्ध - दररोज करावयाचे पंचमहायज्ञ दिवंगत पूर्वजांचे स्मरण.तसेच अमावास्या,अष्टका या दिवशी केले जाणारे श्राद्ध.
  • नैमित्तिक श्राद्ध - काही विशेष निमित्ताने केले जाणारे श्राद्ध. उदा, अक्षय्यतृतीया या दिवशी केले जाणारे श्राद्ध.
  • पार्वण श्राद्ध - पित्रादी त्रयीला उद्देशून केलेलं श्राद्ध.यात वडील, आजोबा, पणजोबा, किंवा आई, आजी, पणजी अशा तीन पिढ्यांना पिंडदान केले जाते.
  • पुराणश्राद्ध - एक वर्षानंतर करण्यात येणारी श्राद्धे.
  • पुष्टीश्राद्ध-शरीर स्वास्थ्य व धन वृद्धीसाठी केले जाणारे श्राद्ध.
  • महालयश्राद्ध-महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते म्हणून हा काल शुभ मानला जात नाही! महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण–पूजन पिंडरूपाने करतो. यामध्ये आपले दिवंगत आई-वडील, आजी, आजोबा, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही, विहीण व अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतात. माणूस विविध गुरूंकडून आयुष्यभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना शिकवत असतो. त्यामुळे असे निधन पावलेले गुरु आणि शिष्य त्यांचे या श्राद्धाच्या निमित्ताने स्मरण केले जाते. माणसाचे आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, त्याच्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, घरातील पाळीव प्राणी जर दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते.
    पितृपक्षातील श्राद्धाचा नैवेद्य
  • मातामहश्राद्ध (दौहित्र)-आश्विन शुक्ल प्रतिपदेला आईच्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ नातवाने केलेले श्राद्ध.
  • शुद्धी श्राद्ध-एखाद्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी ब्राह्मणभोजन करणे हे या श्राद्ध प्रकारात अंतर्भूत आहे.
  • सपिंडीकरण - दिवंगत व्यक्तीचा पिंड तिच्या आधीच्या तीन दिवंगत पितरांच्या पिंडाशी करणे.
  • हिरण्यश्राद्ध- केवळ दक्षिणा देऊन केले जाणारे श्राद्ध.

[]

सोळा मासिक श्राद्धे

(१) आद्य मासिक :- हे मृत्यूनंतर पहिल्या महिन्याच्या आरंभास म्हणजे मरण दिवशीं करावयाचे; परंतु त्या दिवशी सूतक असल्याने, सूतक फिटल्यावर तें करावें असे वचन आहे.

(२) ऊन मासिक :- पहिला महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसाच्या पूर्वींच्या तीन दिवसांत केव्हाही करतात.

(३) द्वितीय मासिक :- दुसऱ्या महिन्याचे आरंभी करतात.

(४) त्रैपक्षिक :- तीन पंधरवड्यांनी म्हणजे पंचेचाळीसावे दिवशी करतात.

(५) तृतीय मासिक,

(६) चतुर्थ मासिक,

(७) पंचम मासिक,

(८) षष्ठ मासिक - ही श्राद्धे ज्या त्या महिन्याचे आरंभास करतात.

(९) ऊनषाण्मासिक :- मृत्यूनंतरचा सहावा महिना ज्या दिवशी संपतो, त्या दिवसाच्या पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हाही करतात.

(१०) सप्तम मासिक,

(११) अष्टम मासिक,

(१२) नवम मासिक,

(१३) दशम मासिक,

(१४) एकादश मासिक,

(१५) द्वादश मासिक :- ही ज्या त्या महिन्याचे आरंभी करतात.

(१६) ऊनाब्दिक : - मृत्यूनंतर बारावा महिना ज्या दिवशी संपतो त्या दिवसाच्या पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हाही करतात. मृत्यूचा दिवस अधिक मासात येत असल्यास त्या महिन्याचे मासिक श्राद्ध दोनदा करतात.; म्हणजे एकंदर सतरा श्राद्धे होतात. ही सर्व मासिके खरोखर त्या त्या उक्त काळी केली पाहिजेत; परंतु बाराव्या दिवशीं सपिंडी करावयाची असल्यानेे, व सपिंडी करण्याचा अधिकार मासिक श्राद्धेे केल्यावाचून प्राप्त होत नसल्याने, ती अकराव्या किंवा बाराव्या दिवशी अपकर्ष करून (अलीकडे ओढून) करण्याची चाल आहे. वास्तविक पाहता सपिंडीकरणश्राद्ध हे सर्व मासिके झाल्यानंतर वर्षाच्या शेवटचे दिवशी अब्दपूरित श्राद्ध करून करणे, हा उत्तम पक्ष, असे वचन आहे. परंतु सपिंडी केल्याशिवाय चल, उपनयन, विवाह इत्यादि मंगलकार्ये करतां येत नसल्याने, सपिंडी श्राद्ध बाराव्या दिवशींच करण्याचा आता प्रघात पडला आहे या विषयी 'धर्मसिंधू' ग्रंथात ‘आनंत्यात्कुलधर्माणां पुंसां चैवायुषः क्षयात् । अस्थिरत्वाच्छरीरस्य द्वादशाहः प्रशस्यते ॥’ असें वचन आहे. म्हणजे, कुलधर्म अपार आहेत, व मनुष्याचें आयुष्य क्षणभंगुर आहे, तसेंच शरीर अशाश्वत आहे; यासाठी बारावा दिवस (सपिंडीस) योग्य आहे. या कारणास्तव सपिंडी अलीकडे घेतल्याने तत्पूर्वींची जीं मासिक श्राद्धे तीहि सपिंडीपूर्वी ओढावी लागली. तथापि सपिंडी झाल्यावर हीं सर्व मासिके तत्काळी पुन्हा करतात. याबद्दलचे विवेचन धर्मशास्त्राचा इतिहास (डॉ. पां.वा. काणे, १९८० या गंथातील सपिंडी प्रकरणात केले आहे.

सोळा श्राद्धांस सोळा ब्राह्मण सांगतात. त्यांची श्मश्रू सकाळीं करवून त्यांना अभ्यंग स्नान घालतात. व दुपारीं एकोद्दिष्ट श्राद्धाप्रमाणें एक तंत्राने (एकदम) ही श्राद्धे करतात. असमर्थाने आमान्नाने करावींत.

तर्पण

पितरांना वंशजांकडून जशी पिंडदानाची व ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे त्यांना उदकाचीही अपेक्षा असते. पितरांना उद्देशून दिलेले हे उदक म्हणजे पितृतर्पण होय.[]

संदर्भ

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा
  2. ^ धर्मशास्त्राचा इतिहास (डाॅ. पां.वा. काणे, १९८०)
  3. ^ धर्मशास्त्राचा इतिहास (डॉ. पां.वा. काणे, १९८०)
  4. ^ धर्मशास्त्राचा इतिहास (डॉ. पां.वा. काणे, १९८०)
  5. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा