Jump to content

भाद्रपद अमावास्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाद्रपद अमावास्या ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

हिंदू पंचांगाप्रमाणे दक्षिणी भारतात हा दिवस भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस असतो, तर मध्य आणि उत्तरी भारतात हा दिवस आश्विन महिन्याच्या मध्याला येतो. इंग्रजी कालगणनेप्रमाणे हा दिवस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येतो. या अमावास्येला 'सर्वपित्री अमावस्या' किंवा 'पितृमोक्ष अमावस्या' असेही म्हणतात. ज्या हिंदूंना आपल्या पितरांची मृत्युतिथी नक्की माहीत नसेल असे सर्व धार्मिक प्रवृत्तीचे लोक, या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात. किंवा निदान, कावळ्यासाठी वाढलेल्या अन्‍नाचे ताट ठेवतात.

हिंदू पंचांगाप्रमाणे कधीकधी एका वर्षात, दोन भाद्रपद महिने आणि त्यामुळे दोन भाद्रपद अमावास्या येतात. पहिला भाद्रपद अधिक भाद्रपद असतो, तर दुसरा निज भाद्रपद. अशा वेळी दुसऱ्या म्हणजे निज भाद्रपद महिन्यातली अमावास्या, ही सर्वपित्री अमावास्या समजली जाते.

हे सुद्धा पहा

[संपादन]