Jump to content

"युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५७: ओळ ५७:
विदर्भ साहित्य संघातर्फे यापूर्वी पुसद आणि लाखनी येथे विदर्भ पातळीवरील दोन युवा साहित्य संमेलने घेण्यात आली होती.
विदर्भ साहित्य संघातर्फे यापूर्वी पुसद आणि लाखनी येथे विदर्भ पातळीवरील दोन युवा साहित्य संमेलने घेण्यात आली होती.

==आणखी एक युवा साहित्य संमेलन==
==आणखी युवा साहित्य संमेलने==
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्था (फुलचूर गोंदिया) यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित नवचैतन्य साहित्य कला मंचाचे ४थे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन अर्जुनी-मोर येथे २३ व २४ मार्च २०१३ या काळात झाले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोरेश्वर मेश्राम होते.

नवोदित नवचैतन्य साहित्य, कलाश्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या सहयोगाने नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंचाचे ५वे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन अर्जुनी मोरगाव येथे १५ व १६ फेब्रुवारी २०१४ या काळात पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या पाचव्या युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा साहित्यिक प्रा. मिलिंद रंगारी होते.

[[अग्निपंख युवा मराठी साहित्य संमेलन]] नावाचे एक संमेलन पुण्यात २३-२४ जानेवारी २०१७ या काळात भरले होते. वीरा राठोड त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.

२०:५७, २३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

या नावाची संमेलने अनेक संस्था भरवितात. त्यांपैकी काही संमेलने :-

अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलन

पुणे शहरात नव्या पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात १७-१८ मार्च २०१५ या दिवसांत हे तथाकथित पहिले अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष गोव्याचे साहित्यिक सचिन परब होते. टेकरेल ॲकॅडमीने हे संमेलन पुरस्कृत केले होते.

आतापर्यंत पाच आंबेडकरी युवा साहित्य संमेलने झाली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते. त्या संमेलनामधील कविसंमेलन हे कवी रोहित नागदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.

पाचवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन अकोला येथे २०-२१ एप्रिल २०१३ या तारखांना झाले. लोकोत्तम साहित्य, कला व सांस्कृतिक मंच तथा दीनबंधू फोरमने संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी लेखिका प्रा. प्रतिभा अहिरे होत्या.

ही संमेलने अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती महामंडळ (अमरावती) या संस्थेतर्फे होतात.

सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्ताने एक फुले, शाहू, आंबेडकर युवा साहित्य संमेलन दि. २८ मार्च २०१५ ला विदर्भातील बाराभाटी येथे झाले. संमेलनाध्यक्ष आंबेडकरी विचारवंत सत्यजित मौर्य होते.

कोमसापचे युवा साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवा शक्तीचे पहिले वहिले "युवा साहित्य संमेलन‘ दापोलीत १४ डिसेंबर २०१४ रोजी झाले. कवी सौमित्र यांनी या संमेलनाचे उद्‌घाटन केले होते..

भारतीय युवा साहित्य संमेलन

ईशान्य आणि पश्‍चिम भारतीय युवा साहित्य संमेलनाच्या साहित्य अकादमीतर्फे मुंबईत दादर (पूर्व) येथे, ३०-३१ मे २०१३ या तारखांना दोन दिवसीय भारतीय युवा साहित्य संमेलन झाले. डॉ. भालचंद्र नेमाडे संमेलनाध्यक्ष होते. या संमेलनाचे उद्‌घाटन प्रसिद्ध गुजराथी साहित्यिका धीरूबेन पटेल यांच्या हस्ते झाले. साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हे संमेलन मराठी भाषेपुरते मर्यादित नव्हते.

या साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी काव्यवाचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुजराथी, कोकणी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, सिंधी आदी विविध भाषांमधील कविता सादर केल्या गेल्या.. दुसर्‍या सत्रात प्रकाश भातंब्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुजराथी, कोंकणी, मराठी, सिंधी आदी भाषांमधील कथावाचन सादर केले गेले.. संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी "सृजनात्मक लेखनाच्या माझ्या प्रेरणा‘ या विषयावर जयंत पवार यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमात आसामी, गुजराथी, कोंकणी, सिंधी आदी भाषांमधील निबंधांचे वाचन त्या त्या भागांतील युवा लेखकांनी केले.

संमेलनात गुजराती साहित्यिक धीरुभाई पटेल यांचे उद्‌घाटनपर भाषण तर साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांचे स्वागतपर भाषण झाले. त्यानंतर गुजराती, कोकणी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, सिंधी भाषेतील काव्यवाचनांचे आणि दुपारी विविध भाषांमधील कथाकथनांचे कार्यक्रम झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी 'लेखक की कलम से - सृजनात्मक लेखन की मेरी प्रेरणाएँ' या विषयावर परिसंवाद आणि विविधभाषी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन

रत्‍नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेज व पेम संस्था यांनी आयोजित केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ७ ते ९ डिसेंबर २०१३ या तारखांना ’पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन’ झाले.

संमेलनाच्या निमित्ताने १४ लघुपट दाखविण्यात आले, विद्यार्थ्यांनी पर्यावरण, पाणी, निसर्गावर आधारित कविता ऐकवल्या आणि गरम पाण्याच्या झर्‍यातील उष्णतेपासून प्रदूषणविरहित वीजनिर्मिती कशी करता येते हे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. ए. अबसर यांनी सांगितले.

फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्‍सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन

निर्मिती विचारमंचच्यावतीने कोल्हापूरला ८ डिसेंबर २०१३ रोजी सहावे फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्‍सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन झाले. संमेलनादरम्यान, प्रमिला गुरव-डॉ. बाबूराव गुरव व डॉ.जयश्री चव्हाण - डॉ. राजीव चव्हाण या जोडप्यांना सावित्री-जोतिबा पुरस्कार देण्यात आले. पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीतील शंभर ग्रंथ, मानचिन्ह व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि स्वागताध्यक्ष अकबर मकानदार होते. या संमेलनाच्या उद्‌घाटनानंतर लक्ष्मण माने यांचा ‘खेळ साडेतीन टक्क्यांचा’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर दुपारी ४ वाजता ‘जाती अंत’ या विषयावर डॉ. भारत पाटणकर यांची प्रकट मुलाखत घेतली गेली.

हे संमेलन झाल्यानंतर, काही दिवसांनी लैंगिक अत्‍याचाराचे आरोप असलेल्या लक्षण माने यांना संमेलनात समाविष्ट केल्याबद्दल विद्रोही साहित्यिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. (संदर्भ : लोकसत्ता, पुणे, ११-१२-२०१३, लक्ष्मण मानेंच्या कार्यक्रमांना विद्रोही चळवळीचा विरोध)

युवा विद्रोही साहित्य संमेलन

विद्रोही सांसकृतिक चळवळीतर्फे, पुणे विद्यापीठातील नामदेव सभागृहात महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त २८ नोव्हेंबर २०१७ रोजी हे एकदिवसीय संमेलन भरणार आहे. अध्यक्ष कवी संतोष पवार असतील.

युवा साहित्य-नाट्य संमेलन

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे २३ ते २५ डिसेंबर २०११ दरम्यान पहिले युवा साहित्य-नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले. अच्युत गोडबोले हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. साने गुरुजी स्मारक समितीच्या सहकार्याने हे संमेलन झाले. पुण्यात झालेल्या ८३ व्या मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फाउंडेशनकडून जो ८३ लाख रुपयांचा निधी मसापला मिळाला त्याच्या व्याजातून हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचाच हे संमेलन एक भाग आहे. महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत असलेली वाड्मय मंडळे, कलामंडळे, तसेच अन्य उपक्रमांशी हे संमेलन जोडले जाईल असे संमेलनादरम्यान परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. म्हणाले त्यावेळी परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, की ’युवा प्रतिभेला मातृभाषेतील साहित्याकडे आकर्षित करणे आणि नव्या प्रतिभेचा शोध घेणे, या हेतूने मसापने हा युवा साहित्य-नाट्य संमेलनाचा उपक्रम आयोजित केला आहे’.

२रे युवा साहित्य-नाट्य संमेलन सातारा येथे २४-११-२०१३ला झाले.

३रे युवा नाट्य साहित्य संमेलन बारामती येथे २१ मार्च २०१५ रोजी झाले. अभिराम भडकमकर अध्यक्ष होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेने भरवले होते.

४थे (?) युवा साहित्य-नाट्य संमेलन रविवार दि. ११ मार्च २०१८ रोजी इस्लामपूरला झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक, कवी, गायक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेने भरवले होते.

युवा साहित्य संमेलन

नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंच व प्रबुद्ध विनायती (मिशन) कल्याणकारी संस्था गोंदियाच्या संयुक्त विद्यमाने दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन १२ फेब्रुवारी २०११ला अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्न सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंच व प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन २२ जानेवारी २०१४ रोजी गोंदिया येथील भवभूती रंगमंदिरात झाले. सेंलनाध्यक्ष म्हणून युवा साहित्यिक प्रमोद अणेराव होते.

राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन

विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेतर्फे १४ व १५ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत वर्धा येथील स्वाध्याय मंदिरात हे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन भरले होते. संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून साठ ते सत्तर लेखक, कवी आणि वक्ते सहभागी झाले होते.

विदर्भ साहित्य संघातर्फे यापूर्वी पुसद आणि लाखनी येथे विदर्भ पातळीवरील दोन युवा साहित्य संमेलने घेण्यात आली होती.

आणखी युवा साहित्य संमेलने

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्था (फुलचूर गोंदिया) यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित नवचैतन्य साहित्य कला मंचाचे ४थे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन अर्जुनी-मोर येथे २३ व २४ मार्च २०१३ या काळात झाले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोरेश्वर मेश्राम होते.

नवोदित नवचैतन्य साहित्य, कलाश्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या सहयोगाने नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंचाचे ५वे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन अर्जुनी मोरगाव येथे १५ व १६ फेब्रुवारी २०१४ या काळात पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या पाचव्या युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा साहित्यिक प्रा. मिलिंद रंगारी होते.

अग्निपंख युवा मराठी साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन पुण्यात २३-२४ जानेवारी २०१७ या काळात भरले होते. वीरा राठोड त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.

पहा : विद्रोही साहित्य संमेलन पहा : साहित्य संमेलने