"चमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''चांभार''' ('''चमार''') हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रा...
(काही फरक नाही)

१७:५२, २६ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

चांभार (चमार) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रामुख्याने उत्तर प्रदेशात राहतो. हिंदू वर्णव्यवस्थेत या जातीला अस्पृश्य (दलित) मानले गेले होते. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यात हा समाज मोठ्या संख्येने आढळतो. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत १४% आणि पंजाबच्या लोकसंख्येत १२% चांभार आहेत.

चांभारांना बारा बलुतेदारांपैकी एक समजले जाते. बूट निर्मिती हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामडीच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.