Jump to content

"अशोक पत्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३४: ओळ ३४:
==अशोक पत्की यांना मिळालेले पुरस्कार==
==अशोक पत्की यांना मिळालेले पुरस्कार==
* वि.वि.द. (विष्णु दिगंबर पलुसकर, विनायकराव पटवर्धन आणि द.वि. पलुसकर) संगीत समारोहात पं विनायकराव पटवर्धन संगीत जीवनगौरव पुरस्कार (१९-१२-२०१७)
* वि.वि.द. (विष्णु दिगंबर पलुसकर, विनायकराव पटवर्धन आणि द.वि. पलुसकर) संगीत समारोहात पं विनायकराव पटवर्धन संगीत जीवनगौरव पुरस्कार (१९-१२-२०१७)
* ब्राह्मण जागॄती सेवा संघातर्फे समाजभूषण पुरस्कार (ऑक्टोबर २०१७)




{{विस्तार}}
{{विस्तार}}

११:३७, २८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

अशोक पत्की (जन्म : २५ ऑगस्ट, इ.स. १९४१) हे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. आठ हजारांहून जास्त जिंगल्स, चारशे नाटकांचे संगीत, सव्वाशे चित्रपटांना संगीत, ५०० मालिकांची शीर्षकगीते त्यांच्या नावावर आहेत. ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ या हिंदी चित्रपटांची गाणी त्यांनी केली. पण, ती त्यांच्या नावावर नाहीत.

‘नाविका रे वारा वाहे रे’ हे सुमन कल्याणपूर यांनी गायलेले गाणे हे अशोक पत्की यांनी अगदी पहिल्यांदा संगीतबद्ध केलेले गाणे होय.

अशोक पत्की मुंबईतल्या कांदेवाडीत रहात, नंतर खारला आणि शेवटी माहीमला गेले. त्यांच्या धाकट्या भगिनी मीना पत्की याही गायिका आहेत.

अशोक पत्की यांनी लिहिलेल्या व गीतबद्ध झालेल्या कविता

  • अस्मिता : सावलीही अशात हसते । ठावठिकाणा माझा पुसते । मीच मला मग शोधत बसत...अस्मिता अस्मिता
  • तू सप्‍तसूर माझे : तू सप्‍तसूर माझे तू श्वास अंतरीचा । गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा
  • राधा ही बावरी हरीची : रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते... राधा ही बावरी हरीची

शीर्षकगीते

दूरचित्रवाणीवर एखादा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एखादा संगीताचा तुकडा किंवा गीत वाजवले जाते. चित्रवाणी मालिकांसाठी रचलेल्या अनेक गीतांना अशोक पत्कींनी संगीत दिले आहे. अशा काही मालिकांची नावे आणि त्यातल्या शीर्षकगीताची पहिली ओळ : -

  • अधांतर : नियती ऐसा खेळ रंगवी, सुन्‍न घराच्या उंबर्‍यावरी.....मार्ग शोधता प्रत्येकाचे पाऊल पडते, अधांतर
  • अनुपमा : दिवस कसे हे उगवून येती, आयुष्याला कवेत घेती
  • अभिलाषा : आयुष्याचे हे चक्र चालते साद घालते आशा । स्वप्‍नांमागून सत्य धावते ही दैवाची रेषा
  • अवघाचि संसार : मन माझे मोरपिशी स्वप्‍न जणू । मन माझे शिशिरातील इंद्रधनू
  • अस्मिता : सावलीही अशात हसते । ठावठिकाणा माझा पुसते । मीच मला मग शोधत बसत...अस्मिता अस्मिता
  • आभाळमाया : जडतो तो जीव । लागते ती आस । बुडतो तो सूर्य ।उरे तो आभास
  • आम्ही सारे खवय्ये : आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही-आम्ही सारे...आम्ही सारे खवय्ये
  • गोट्या : बीज अंकुरे, अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत । कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात?
  • जिवलगा : खुणावते आडुनिया एक मोरपिशी स्वप्‍न-सय....कधी येशिल येशिल जिवलगा जिवलगा
  • तुझ्याविना हे चांदणे हर्ष घेऊन आले । कवडसे हवेसे उधळीत आले
  • बंधन : नात्यांना ठाउक असते हे चालत जाणे रस्ते । वळणावर येता थांबून मग हळूच वळणे नुसते
  • मानसी : कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी । सार्‍या सख्या सजणींचे मन मानसी.. मानसी
  • मोगरा फुलला : दवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला । आज अशी मी मला गवसले- मोगरा फुलला
  • या सुखांनो या : तांबडं फुटलं आभाळ भरलं । मायेचं सूखही त्यातच दडलं । ...या सुखांनो या
  • वादळवाट : थोडी सागर निळाई थोडे शंख नि शंपले। कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले । ....कधी धूसर धूसर एक वादळाची वाट
  • सोनियाचा उंबरा : सोनियाच्या उंबऱ्यात प्रकाशाची उधळण | तुम्हांसाठी घेऊन आलो काळजाचं निरूपण

अशोक पत्की यांचे अन्य लेखन

  • ’सप्तसूर माझे‘ (आत्मचरित्र) प्रकाशक: मनोविकास प्रकाशन

अशोक पत्की यांना मिळालेले पुरस्कार

  • वि.वि.द. (विष्णु दिगंबर पलुसकर, विनायकराव पटवर्धन आणि द.वि. पलुसकर) संगीत समारोहात पं विनायकराव पटवर्धन संगीत जीवनगौरव पुरस्कार (१९-१२-२०१७)
  • ब्राह्मण जागॄती सेवा संघातर्फे समाजभूषण पुरस्कार (ऑक्टोबर २०१७)


बाह्य दुवे