"एलिनॉर झेलियट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:
झेलियट यांनी ऐंशी पेक्षा जास्त लेख लिहिले तसेच भारतातील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळ, मध्ययुगीन काळातील संत-कवीं आणि वर्तमानातील डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाखालील बौद्ध चळवळ या विषयांवरील तीन पुस्तकांचे संपादन केले आहे. भारताच्या अग्रणी दलित लेखक-लेखिकांमधील त्या एक होत्या.

== महाराष्ट्राशी नाते==
[[गुंथर सोंथायमर]] किंवा [[मॅक्सिन बर्नसन]] या अभ्यासकांप्रमाणे एलिनॉर झेलियट यांनीही शेवटपर्यंत [[महाराष्ट्र]]ाशी नाते टिकवले. अमेरिकेतील कार्लटन महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य न सोडता, भारताची- विशेषत: महाराष्ट्राची अगदी अद्ययावत माहिती मिळवत राहून या देशातील सामाजिक स्थिती-गतीच्या इतिहासाचा अभ्यास त्यांनी सुरू ठेवला. त्यांच्या या अभ्यासाची फळे म्हणजे [[चोखामेळा]], डॉ. बाबासाहेब आंबेडकर, [[रा. रं. बोराडे]], [[शंकरराव खरात]] ते [[नामदेव ढसाळ]], [[राजा ढाले]] यांचे जागतिक स्थान काय, याचे वेळोवेळी झालेले स्पष्टीकरण! ‘[[दलित]]’ ही संज्ञा आता अस्मितादर्शक अर्थाने वापरली जाते हे सकारात्मक विवेचन झेलियट यांचे, तसेच ‘दलित साहित्याची चळवळ लवकरच अखिल भारतीय स्वरूपाची होणार’ हे भाकीतही त्यांनीच १९८०च्या दशकात केले होते. त्या अर्थाने, त्या क्रांतदर्शी इतिहासकार ठरतात. आधुनिक भारतीय बौद्धधम्म-पुनशरेधाबद्दल लिहिताना ‘मी कथा सांगणार नाही’ असे म्हणणाऱ्या डॉ. झेलियट यांचा पिंड एखाद्या घटनेमागील कारणे शोधणाऱ्या, दुवे जुळवणाऱ्या इतिहासकाराचा होता. ‘दलितांचा अभ्यास करते म्हणून मला कोणी [[इतिहासकार]] समजतच नाहीत- [[मानववंश शास्त्रज्ञ]]च समजतात’ ही त्यांची तक्रार केवळ आत्मपर नसून, इतिहासाचे नवोन्मेष लोकांना का कळू नयेत याबद्दलची होती. ‘दलितांना इतिहास नाही, हे खरे; पण म्हणूनच अभ्यासकांनी तो शोधायला हवा’ ही त्यांची कळकळच त्यांना चोखामेळा इंग्रजीत नेण्याचे श्रेय देऊन गेली.
स्वतंत्र लेखांद्वारे त्यांच्या अभ्यासकीय कार्याचा परामर्श घेतला जाईलच,

अमेरिकी क्वेकरपंथीय कुटुंबात १९२६ साली जन्मलेल्या एलिनॉर यांच्यावर या पंथातील सहृदय मानवतावादाचा प्रभाव बालपणापासून होता. ‘‘महायुद्धात क्वेकरांनी अमेरिकेतील जपानी निर्वासितांना मदत केली आणि पुढे मी ‘नॅशनल असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल’ या (कृष्णवर्णीयांच्या) संघटनेचे काम करू लागले.. डॉ. आंबेडकर यांचे नाव अधूनमधून वाचू लागले.. मग १९५२ मध्ये क्वेकर युवा दलातर्फे भारतात आले.. तेव्हा डॉ. आंबेडकरांशी भेट नाहीच झाली..’’ अशा आठवणी त्यांनी (‘कास्ट इन लाइफ’ या पुस्तकातील लेखात) नमूद केल्या आहेत.

‘डॉ. आंबेडकर अ‍ॅण्ड द महार मूव्हमेंट’ हा [[पीएच.डी.]] प्रबंध (पेनसिल्व्हानिया विद्यापीठ, १९६९) लिहिण्यासाठी १९६४ पासून त्या [[पुणे|पुण्यात]] येत. पुढे एस. एन. कदमांसह [[महाड]]ला व पुढे कोकणात, [[दादासाहेब गायकवाड]]ांना भेटण्यासाठी [[नाशक]]ात, [[दीक्षाभूमी]]साठी [[नागपुर]]ात अशा अनेक ठिकाणी त्या फिरल्या. [[वसंत मून]] यांच्या कार्याने भारावल्या आणि मीनाक्षी मून, सुधीर वाघमारे अशांच्या सुहृद बनल्या.
== निधन ==
झेलियट यांचे मिनेसोटा मध्ये ५ जून, २०१६ रोजी मिनेसोटा येथे निधन झाले.
झेलियट यांचे मिनेसोटा मध्ये ५ जून, २०१६ रोजी मिनेसोटा येथे निधन झाले.

००:२२, १४ मार्च २०१७ ची आवृत्ती

एलिनॉर झेलियट (ऑक्टोबर ८, इ.स. १९२६ - जून ५, इ.स. २०१६) ह्या अमेरिकन लेखक, कार्लटन महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका आणि भारताचा इतिहास, दक्षिण-पूर्व आशिया, व्हिएतनाम, आशियाई स्त्रीयां, अस्पृश्यता आणि सामाजिक चळवळीं या विषयांवरील तज्ज्ञ होत्या.

झेलियट यांनी ऐंशी पेक्षा जास्त लेख लिहिले तसेच भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळ, मध्ययुगीन काळातील संत-कवीं आणि वर्तमानातील डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाखालील बौद्ध चळवळ या विषयांवरील तीन पुस्तकांचे संपादन केले आहे. भारताच्या अग्रणी दलित लेखक-लेखिकांमधील त्या एक होत्या.

महाराष्ट्राशी नाते

गुंथर सोंथायमर किंवा मॅक्सिन बर्नसन या अभ्यासकांप्रमाणे एलिनॉर झेलियट यांनीही शेवटपर्यंत महाराष्ट्राशी नाते टिकवले. अमेरिकेतील कार्लटन महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य न सोडता, भारताची- विशेषत: महाराष्ट्राची अगदी अद्ययावत माहिती मिळवत राहून या देशातील सामाजिक स्थिती-गतीच्या इतिहासाचा अभ्यास त्यांनी सुरू ठेवला. त्यांच्या या अभ्यासाची फळे म्हणजे चोखामेळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रा. रं. बोराडे, शंकरराव खरात ते नामदेव ढसाळ, राजा ढाले यांचे जागतिक स्थान काय, याचे वेळोवेळी झालेले स्पष्टीकरण! ‘दलित’ ही संज्ञा आता अस्मितादर्शक अर्थाने वापरली जाते हे सकारात्मक विवेचन झेलियट यांचे, तसेच ‘दलित साहित्याची चळवळ लवकरच अखिल भारतीय स्वरूपाची होणार’ हे भाकीतही त्यांनीच १९८०च्या दशकात केले होते. त्या अर्थाने, त्या क्रांतदर्शी इतिहासकार ठरतात. आधुनिक भारतीय बौद्धधम्म-पुनशरेधाबद्दल लिहिताना ‘मी कथा सांगणार नाही’ असे म्हणणाऱ्या डॉ. झेलियट यांचा पिंड एखाद्या घटनेमागील कारणे शोधणाऱ्या, दुवे जुळवणाऱ्या इतिहासकाराचा होता. ‘दलितांचा अभ्यास करते म्हणून मला कोणी इतिहासकार समजतच नाहीत- मानववंश शास्त्रज्ञच समजतात’ ही त्यांची तक्रार केवळ आत्मपर नसून, इतिहासाचे नवोन्मेष लोकांना का कळू नयेत याबद्दलची होती. ‘दलितांना इतिहास नाही, हे खरे; पण म्हणूनच अभ्यासकांनी तो शोधायला हवा’ ही त्यांची कळकळच त्यांना चोखामेळा इंग्रजीत नेण्याचे श्रेय देऊन गेली. स्वतंत्र लेखांद्वारे त्यांच्या अभ्यासकीय कार्याचा परामर्श घेतला जाईलच,

अमेरिकी क्वेकरपंथीय कुटुंबात १९२६ साली जन्मलेल्या एलिनॉर यांच्यावर या पंथातील सहृदय मानवतावादाचा प्रभाव बालपणापासून होता. ‘‘महायुद्धात क्वेकरांनी अमेरिकेतील जपानी निर्वासितांना मदत केली आणि पुढे मी ‘नॅशनल असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल’ या (कृष्णवर्णीयांच्या) संघटनेचे काम करू लागले.. डॉ. आंबेडकर यांचे नाव अधूनमधून वाचू लागले.. मग १९५२ मध्ये क्वेकर युवा दलातर्फे भारतात आले.. तेव्हा डॉ. आंबेडकरांशी भेट नाहीच झाली..’’ अशा आठवणी त्यांनी (‘कास्ट इन लाइफ’ या पुस्तकातील लेखात) नमूद केल्या आहेत.

‘डॉ. आंबेडकर अ‍ॅण्ड द महार मूव्हमेंट’ हा पीएच.डी. प्रबंध (पेनसिल्व्हानिया विद्यापीठ, १९६९) लिहिण्यासाठी १९६४ पासून त्या पुण्यात येत. पुढे एस. एन. कदमांसह महाडला व पुढे कोकणात, दादासाहेब गायकवाडांना भेटण्यासाठी नाशकात, दीक्षाभूमीसाठी नागपुरात अशा अनेक ठिकाणी त्या फिरल्या. वसंत मून यांच्या कार्याने भारावल्या आणि मीनाक्षी मून, सुधीर वाघमारे अशांच्या सुहृद बनल्या.

निधन

झेलियट यांचे मिनेसोटा मध्ये ५ जून, २०१६ रोजी मिनेसोटा येथे निधन झाले.