गुंथर सोंथायमर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


गुंथर सोंथायमर (जन्म : २१ एप्रिल १९३४ - मृत्यू : २ जून १९९२)[१] हे भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील लोकधर्म, लोकसंस्कृती, लोकदैवते, धर्मशास्त्र ह्या विषयांचा अभ्यास करणारे अभ्यासक आणि त्यांविषयी संशोधन करणारे संशोधक होते. दक्षिण भारतातील पशुपालक समाजाच्या धर्मश्रद्धांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.

जीवन[संपादन]

गुंथर ह्यांचा जन्म डॉइच्लांटमधील (जर्मनी) दोनाऊ नदीकाठच्या उल्म ह्या गावी झाला. त्यांचे वडील डॉ. वॉल्टर सोंथायमर हे स्टुट्गार्ट येथे एका शाळेचे मुख्याध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सोंथायमर कुटुंबाने गुंथर ह्यांच्या आई हेर्मा डीट्स-सोंथायमर ह्याच्या माहेरी ब्रॉम्बर्ग येथे स्थलांतर केले. तिथेच गुंथर ह्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. [१]

१९४५नंतर गुंथर ह्यांचे पुढील शिक्षण स्टुटगार्ट येथील एबरहार्ड-लुडविग्स-ग्युम्नासीयुममध्ये झाले. १९५३मध्ये त्यांनी तिथूनच आबीटुअर ही पदवी मिळवली.[१]

विद्यार्थिदशेपासूनच गुंथर हे स्टुटगार्ट येथील इंडो-जर्मन-सोसायटीच्या कामात सक्रिय सहभागी असत. त्यांनी काही काळ ह्या संस्थेचे सचिवपदही भूषवले. भारतीय मजलीस ह्या डॉइच्लांटमधील (जर्मनी) पहिल्या भारतीय-विद्यार्थि-संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी गुंथर हे एक सदस्य होते.[१]

गुंथर ह्यांना पुढील शिक्षणासाठी भारतविद्या (इंडॉलॉजी) हा विषय घेण्याची इच्छा होती. परंतु हा विषय घेतल्यास फारशा व्यावसायिक संधी उपलब्ध नाहीत असे त्यांच्या वडिलांचे मत पडल्याने गुंथर ह्यांनी विधि (कायदा) ह्या विषयाची पहिली राज्यस्तरीय परीक्षा दिली आणि १९५७मध्ये ते ही परीक्षा उत्तीर्ण झाले.[१]

संदर्भ[संपादन]

  1. a b c d e Jürgen Lütt.


संदर्भसूची[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]