Jump to content

"जयंत सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२६: ओळ १२६:
* मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात १४ ऑगस्ट २०१५ रोजी जयंत सावरकर यांना डॉ. मा.गो. खांडेकर स्मृतिपुरस्कार देऊन गौरविले. त्यावेळी सावरकर यांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या नाटकांतली गाजलेली स्वगते आणि नाट्यप्रवेश सादर केले.
* मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात १४ ऑगस्ट २०१५ रोजी जयंत सावरकर यांना डॉ. मा.गो. खांडेकर स्मृतिपुरस्कार देऊन गौरविले. त्यावेळी सावरकर यांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या नाटकांतली गाजलेली स्वगते आणि नाट्यप्रवेश सादर केले.
* रत्‍नागिरी जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरव (१९९६)
* रत्‍नागिरी जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरव (१९९६)
* ९७व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद (२०१६)





२२:१२, १४ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

जयंत सावरकर
जन्म जयंत सावरकर
३ मे, १९३६
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

जयंत सावरकर (जन्म : ३ मे. इ.स. १९३६) हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी, इ.स. १९५५पासून त्यांची आभिनयाची कारकीर्द सुरू झाली.

नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली.

सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले.

मा. अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर, केशवराव दाते, जयराम शिलेदार, मा. दत्ताराम, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रमेश देव, राजा परांजपे, रामदास कामत, सुरेश हळदणकर, ते आजच्या पिढीतील अद्वैत दादरकर, मंगेश कदम यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे.

जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत.

कौटुंबिक

  • सासरे - कै. मामा पेंडसे
  • पत्‍नी - उषा पेंडसे
  • मुलगा - कौस्तुभ
  • कन्या - सुषमा आणि सुवर्णा

जयंत सावरकर यांची भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील भूमिकांची नावे

  • अपराध मीच केला (गोळे मास्तर)
  • अपूर्णांक (ब्रम्हे)
  • अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष)
  • अल्लादीन जादूचा दिवा (हुजर्‍या)
  • अवध्य (नाचणे)
  • आम्ही जगतो बेफाम (चिवटे)
  • एकच प्याला (तळीराम)
  • एक हट्टी मुलगी (गृहस्थ)
  • ओ वुमनिया
  • कळलाव्या कांद्याची कहाणी (कारभारी; मंगळ्या)
  • के दिल अभी भरा नही
  • गणपती बप्पा मोरया (राजा)
  • चव्हाटा (कुळबुडवे)
  • जादूचा खेळ (गावकरी
  • तुझे आहे तुजपाशी (आचार्य; श्याम)
  • दिवा जळू दे सारी रात (पोस्टमास्तर)
  • दुरितांचे तिमिर जावो
  • धंदेवाईक (विमा एजंट)
  • टिळक आणि आगरकर (गोपाळराव जोशी)
  • नयन तुझे जादुगार (पतंगे रिपोर्टर)
  • नाथ हा माझा (विनयकुमार)
  • प्रेमसंन्यास (गोकुळ)
  • प्रेमा तुझा रंग कसा (बच्चाजी बल्लाळ)
  • बेबंदशाही (खंडोजी, खाशाबा)
  • भानगडीशिवाय घर नाही (मोठा भाऊ; विवाहित)
  • भावबंधन (कामण्णा)
  • मातीच्या गाड्याचे प्रकरण (चेट)
  • यमाला जेव्हा डुलकी लागते (बजाबा)
  • लग्नाची बेडी (अवधूत)
  • लहानपण देगा देवा
  • लैला होलैला (इन्स्पेक्टर मालपाणी)
  • वन रूम किचन (जोशी)
  • वरचा मजला रिकामा (पोपट)
  • वाजे पाऊल आपुले (भाऊराव)
  • व्यक्ती आणि वल्ली (अंतू बर्वा; हरितात्या)
  • सम्राट सिंह (विदूषक)
  • सूर्यास्त (गायकवाड)
  • सौजन्याची ऐशी तैशी (मंडलेकर)
  • हंगामी नवरा पाहिजे (आचारी, नायक)
  • हॅम्लेट (नाटकातल्या नाटकातली राणी)
  • हं हं आणि हं हं हं (राजा)
  • हाच खेळ उद्यापुन्हा (नंदलाल)
  • हा तेराव्वा
  • हिमालयाची सावली (केशव)
  • हिरा जो भंगला नाही (राजज्योतिषी)

जयंत सावरकर यांचे काम असलेले चित्रपट

  • इजा बिजा तिजा
  • इना मिना डीका (हिंदी)
  • कुरुक्षेत्र (हिंदी)
  • गडबड गोंधळ
  • गुलाम-ए-मुस्तफा (हिंदी)
  • जावई माझा भला
  • तेरा मेरा साथ रहें (हिंदी)
  • धमाल बाबल्या गणप्याची
  • प्रतिसाद : द रिस्पॉन्स (हिंदी)
  • पोलीस लाईन
  • बडे दिलवाला (हिंदी)
  • बिस्कीट
  • झांगडगुत्ता, वगैरे
  • युगपुरुष (हिंदी)
  • रिंगा रिंगा
  • रॉकी हॅन्डसम (हिंदी)
  • लव्ह का तडका (हिंदी)
  • वक्रतुंड महाकाय
  • वास्तव : द रिअॅलिटी (हिंदी)
  • विघ्नहर्ता महागणपती
  • वोह छोकरी (हिंदी, दूरचित्रवाणी चित्रपट)
  • शासन (हिंदी)
  • समुद्र (हिंदी)
  • सिंघम (हिंदी)
  • हरिओम विठ्ठला

आत्मचरित्रात्मक पुस्तक

  • मी एक छोटा माणूस

जयंत सावरकर यांना मिळाले पुरस्कार आणि सन्मान

  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार (२०१५)
  • मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात १४ ऑगस्ट २०१५ रोजी जयंत सावरकर यांना डॉ. मा.गो. खांडेकर स्मृतिपुरस्कार देऊन गौरविले. त्यावेळी सावरकर यांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या नाटकांतली गाजलेली स्वगते आणि नाट्यप्रवेश सादर केले.
  • रत्‍नागिरी जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरव (१९९६)
  • ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१६)