Jump to content

"साई बाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो कोणत्याही चर्चेविना लावलेला साचा काढला using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३: ओळ १३:
[[चित्र:साई बाबा.jpg|चौकट|साई बाबा]]
[[चित्र:साई बाबा.jpg|चौकट|साई बाबा]]

'''साई बाबा''' ' (जन्म : [[इ.स. १८५६]] - समाधी : [[१५ ऑक्टोबर १९१८]]) हे प्रसिध्द [[सुफी संत]] आहेत. साई बाबांचा जन्म [[परभणी]] जिल्ह्यातील [[पाथरी]] येथे झाला. त्यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते इ. स. १८७२ मध्ये एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीला (जिल्हा अहमदनगर) आले. त्यावेळी त्यांचे वय सोळा असावे. या वऱ्हाडाचा मुक्काम गावाबाहेरील खंडोबा मंदिराजवळ होता. शिर्डीतील म्हाळसापतिनामक एक सुवर्णकार दररोज खंडोबाच्या दर्शनास येत असत. एक दिवशी त्यांनी या तरुण मुलास पाहिले आणि त्याला एकदम ‘आवो साई’ अशी प्रेमाने हाक मारली आणि तेव्हापासून ‘साईबाबा’ हे त्यांचे नाव रूढ झाले. साईबाबा अखेरपर्यंत शिर्डीत राहिले. साई शब्दाचा अर्थ फकीर असा होतो अरबी भाषेतला हा शब्द आहे.
'''साई बाबा''' ' (जन्म : [[इ.स. १८५६]] - समाधी : [[१५ ऑक्टोबर १९१८]]) हे प्रसिद्ध [[सुफी संत]] आहेत. साई बाबांचा जन्म [[परभणी]] जिल्ह्यातील [[पाथरी]] येथे झाला. त्यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते इ. स. १८७२ मध्ये एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीला (जिल्हा अहमदनगर) आले. त्यावेळी त्यांचे वय सोळा असावे. या वर्‍हाडाचा मुक्काम गावाबाहेरील खंडोबा मंदिराजवळ होता. शिर्डीतील म्हाळसापती नावाचे एक सुवर्णकार दररोज खंडोबाच्या दर्शनास येत असत. एक दिवशी त्यांनी या तरुण मुलास पाहिले आणि त्याला एकदम ‘आवो साई’ अशी प्रेमाने हाक मारली आणि तेव्हापासून ‘साईबाबा’ हे त्यांचे नाव रूढ झाले. साईबाबा अखेरपर्यंत शिर्डीत राहिले. साई शब्दाचा अर्थ फकीर असा होतो अरबी भाषेतला हा शब्द आहे.

==विश्वास खेर==
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री [[बाळ गंगाधर खेर|बाळासाहेब खेर]] यांचे चिरंजीव विश्वास खेर (निधन ९०व्या वर्षी, १० मे, २०१६) हे शिर्डीचे पहिले विश्वस्त होते. त्यांनी केलेल्या ३७ वर्षांच्या शोधाशोधीनंतर साईबाबा यांचा जन्म [[पाथरी]] येथे झाल्याचे सिद्ध केले.

विश्वास खेर हे शिर्डी परिसरात राहणारे कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक गृहस्थ होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली [[पाथरी]] येथे साई स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती.[[पाथरी]] ते [[पंढरपूर]] अशी [[पालखी]] [[दिंडी]] त्यांनी सुरू केली.

== कार्य ==
== कार्य ==
त्यांनी आपले संपूर्ण जीवन (मृत्युपर्यंत) शिर्डी येथे वास्तव्य केले. या काळात त्यांनी शिर्डी येथे भिक्षा मागून आपला उदर निर्वाह केला. आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला. ते नेहमी अल्लाह मलिक असच म्हणायचे.
साईबाबांनी मृत्यूपर्यंत शिर्डीत राहिले. त्यांच्या जीवनकाळात त्यांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला. ते नेहमी अल्लाह मलिक असेच म्हणायचे.
== भक्त समुदाय==
== भक्त समुदाय==
भारत आणि भारताबाहेर हि फार मोठ्या प्रमाणात बाबांचे भक्त आहेत. ठीक ठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जाती धर्मांच्या लोकांचा समावेश होतो. या मध्ये प्रामुख्याने हिंदू, शीख व बौद्ध धर्मियांचा समावेश होतो. (मुस्लिम लोक फक्त अल्लाह चीच पूजा करतात पण मुस्लिम धर्मातही सुफी संतांच्या यादीत साई बाबांना मानाचे स्थान आहे)
साईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातिधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू, शीख व बौद्ध धत्मीय आहेत. (मुस्लिम लोक फक्त अल्लालाच मानतात. पण मुस्लिम धर्मातही सुफी संतांच्या यादीत साई बाबांना मानाचे स्थान आहे)

== साई बाबा आणि स्वामी स्वरूपानंद ==
== साई बाबा आणि स्वामी स्वरूपानंद ==
जून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मात्र साई बाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला त्यानंतर शिर्डी व काही ठिकाणी साई बाबांच्या भक्तांनी शंकराचार्यांच्या विरोधात निदर्शने केलीत. शिर्डी मध्ये शंकराचार्यांच्या विरोधात न्यायालयात हि धाव घेतली गेली आहे.
जून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मात्र साई बाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला त्यानंतर शिर्डी व काही ठिकाणी साई बाबांच्या भक्तांनी शंकराचार्यांच्या विरोधात निदर्शने केली. शिर्डी मध्ये शंकराचार्यांच्या विरोधात न्यायालयातही धाव घेतली गेली आहे.. यानंतर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती आणि त्यांनी भरवलेल्या धर्म संसदेने शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे.

साईबाबा हे जन्मानं ब्राम्हण होते, त्यामुळे ते हिंदूच आहेत. असा दावा कांदिवलीच्या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने सप्टेंबर २०१४मध्ये उच्च न्यायालयात दाखल केला आहे. शिर्डीचे साईबाबा हे मुस्लिम फकीर नव्हते, तर ब्राह्मण होते. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावात २७ सप्टेंबर १८३७ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या आईवडिलांनी बालपणी त्यांना मुस्लिम फकिराने केलेल्या आग्रहावरून त्यांच्या हवाली केले. पण नंतर त्या फकिराने साईबाबांना वेकुंशा नावाच्या हिंदू गुरूकडे सोपवले. साईबाबा यांचे खरे नाव हरिभाऊ आहे. याबाबत सबळ पुरावे असल्याचा दावाही साईधाम चॅरिटबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे.

== शिर्डी साईबाबा संस्थान==
== शिर्डी साईबाबा संस्थान==

०६:०४, २० जून २०१६ ची आवृत्ती

साई बाबा
मूळ नाव माहिती उपलब्ध नाही
जन्म इ.स. १८५६
पाथरी , महाराष्ट्र
निर्वाण १५ ऑक्टोबर १९१८
शिर्डी, महाराष्ट्र
उपास्यदैवत अल्लाह
भाषा उर्दू आणि मराठी
कार्यक्षेत्र शिर्डी , महाराष्ट्र
प्रसिद्ध वचन अल्लाह मलिक (सबका मलिक एक), श्रद्धा आणि सबुरी
साई बाबा

साई बाबा ' (जन्म : इ.स. १८५६ - समाधी : १५ ऑक्टोबर १९१८) हे प्रसिद्ध सुफी संत आहेत. साई बाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे झाला. त्यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते इ. स. १८७२ मध्ये एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीला (जिल्हा अहमदनगर) आले. त्यावेळी त्यांचे वय सोळा असावे. या वर्‍हाडाचा मुक्काम गावाबाहेरील खंडोबा मंदिराजवळ होता. शिर्डीतील म्हाळसापती नावाचे एक सुवर्णकार दररोज खंडोबाच्या दर्शनास येत असत. एक दिवशी त्यांनी या तरुण मुलास पाहिले आणि त्याला एकदम ‘आवो साई’ अशी प्रेमाने हाक मारली आणि तेव्हापासून ‘साईबाबा’ हे त्यांचे नाव रूढ झाले. साईबाबा अखेरपर्यंत शिर्डीत राहिले. साई शब्दाचा अर्थ फकीर असा होतो अरबी भाषेतला हा शब्द आहे.

विश्वास खेर

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे चिरंजीव विश्वास खेर (निधन ९०व्या वर्षी, १० मे, २०१६) हे शिर्डीचे पहिले विश्वस्त होते. त्यांनी केलेल्या ३७ वर्षांच्या शोधाशोधीनंतर साईबाबा यांचा जन्म पाथरी येथे झाल्याचे सिद्ध केले.

विश्वास खेर हे शिर्डी परिसरात राहणारे कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक गृहस्थ होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली पाथरी येथे साई स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती.पाथरी ते पंढरपूर अशी पालखी दिंडी त्यांनी सुरू केली.

कार्य

साईबाबांनी मृत्यूपर्यंत शिर्डीत राहिले. त्यांच्या जीवनकाळात त्यांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला. ते नेहमी अल्लाह मलिक असेच म्हणायचे.

भक्त समुदाय

साईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातिधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू, शीख व बौद्ध धत्मीय आहेत. (मुस्लिम लोक फक्त अल्लालाच मानतात. पण मुस्लिम धर्मातही सुफी संतांच्या यादीत साई बाबांना मानाचे स्थान आहे)

साई बाबा आणि स्वामी स्वरूपानंद

जून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मात्र साई बाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला त्यानंतर शिर्डी व काही ठिकाणी साई बाबांच्या भक्तांनी शंकराचार्यांच्या विरोधात निदर्शने केली. शिर्डी मध्ये शंकराचार्यांच्या विरोधात न्यायालयातही धाव घेतली गेली आहे.. यानंतर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती आणि त्यांनी भरवलेल्या धर्म संसदेने शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे.

साईबाबा हे जन्मानं ब्राम्हण होते, त्यामुळे ते हिंदूच आहेत. असा दावा कांदिवलीच्या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने सप्टेंबर २०१४मध्ये उच्च न्यायालयात दाखल केला आहे. शिर्डीचे साईबाबा हे मुस्लिम फकीर नव्हते, तर ब्राह्मण होते. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावात २७ सप्टेंबर १८३७ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या आईवडिलांनी बालपणी त्यांना मुस्लिम फकिराने केलेल्या आग्रहावरून त्यांच्या हवाली केले. पण नंतर त्या फकिराने साईबाबांना वेकुंशा नावाच्या हिंदू गुरूकडे सोपवले. साईबाबा यांचे खरे नाव हरिभाऊ आहे. याबाबत सबळ पुरावे असल्याचा दावाही साईधाम चॅरिटबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे.

शिर्डी साईबाबा संस्थान

  1. पुनर्निर्देशन साईबाबा संस्थान, शिर्डी

संदर्भ

साई सत्चरित्र शिर्डी संस्थान

बाह्य दुवे