Jump to content

"शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७९: ओळ ७९:
* कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य. लेखक : एकनाथ केशव घोरपडे
* कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य. लेखक : एकनाथ केशव घोरपडे
* राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य. लेखक : [[रा.ना. चव्हाण]]
* राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य. लेखक : [[रा.ना. चव्हाण]]
* राजर्षी शाहू कार्य व काळ. ([[रा.ना. चव्हाण]])
* राजर्षी शाहू कार्य व काळ. (लेखक - [[रा.ना. चव्हाण]])
* समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज (डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
* समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)

* छत्रपती शाहू -दूरचित्रवाणी मालिका
==चित्रपट दूरचित्रवाणी मालिका==
* लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
* राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट बनत आहे.(निर्माते नितीन देसाई)


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१९:२७, १९ जुलै २०१५ ची आवृत्ती

छत्रपती शाहू महाराज (द्वितीय)
छत्रपती
छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र
कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ इ.स.१८८४ - इ.स.१९२२
राज्याभिषेक २ एप्रिल इ.स.१८९४
राज्यव्याप्ती कोल्हापूर जिल्हा
राजधानी कोल्हापूर
पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म २६ जून इ.स.१८७४
कागल, कोल्हापूर
मृत्यू ६ में इ.स.१९२२
मुंबई
पूर्वाधिकारी चौथे शिवाजी
वडील आपासाहेब घाटगे
आई राधाबाई
राजघराणे भोसले
चलन
राजर्षी शाहू महाराज

चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.

जीवन

शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

कार्य

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाला.

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

शाहू महाराजांचे नाव असलेल्या संस्था

  • शाहू कापड गिरणी, कोल्हापूर
  • शाहू कुस्ती मैदान, खासबाग (कोल्हापूर)
  • शाहू कॉलेज, पुणे
  • शाहू चित्रमंदिर, कोल्हापूर (स्थापना : १५ मे, इ.स. १९४७)
  • राजर्षी शाहू जलतरण तलाव, मोहननगर (पिंपरी-पुणे)
  • शाहू नगर. जळगाव
  • छत्रपती शाहू पुतळा, महाराष्ट्र भवन (नवी दिल्ली); संसद प्रांगण (नवी दिल्ली), दसरा चौक (कोल्हापूर)
  • कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू पुरस्कार
  • शाहू भवन, बलिया (बिहार)
  • छत्रपति शाहू जी महाराज मेडिकल विश्वविद्यालय, लखनौ (आता या विद्यापीठाचे नाव बदलून किंग जॉर्ज मेडिकल विश्वविद्यालय केले गेले आहे!)
  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर
  • राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर
  • शाहू मैदान, कोल्हापूर
  • राजर्षी शाहू विकास आघाडी, जयसिंगपूर
  • छत्रपति शाहू जी महाराज विश्वविद्यालय, कानपूर
  • छत्रपति शाहू जी महाराज शोध एवं प्रशिक्षण संस्थान, भागीदारी भवन, गोमती नगर, लखनौ
  • राजर्षी शाहू सहकारी बँक
  • राजर्षी शाहू महाराज सोशल नॅशनल पुरस्कार
  • राजश्री शाहू महाराज स्मारक भवन, कोल्हापूर
  • राजर्षी छत्रपती शाहूमहाराज रेल्वे टर्मिनस (अधिकृत हिंदी लघुरूप ’छशाट’) : कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव
  • लोकराजा राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्था, पुणे
  • अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे
  • शाहु ग्लोबल स्कुल (स्वराज्य रयत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ,औरंगाबाद.)

शाहू महाराजांवरील प्रकाशित साहित्य

  • Rajarshi Shahu Chatrapati : A Socially revolutionary King (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
  • शाहू महाराजांची चरित्रे. लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ.अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार(यांनी २००१ साली लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती, ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
  • बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
  • राजर्षी शाहू छत्रपती. लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव. नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.
  • कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य. लेखक : एकनाथ केशव घोरपडे
  • राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य. लेखक : रा.ना. चव्हाण
  • राजर्षी शाहू कार्य व काळ. (लेखक - रा.ना. चव्हाण)
  • समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)

चित्रपट दूरचित्रवाणी मालिका

  • लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
  • राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट बनत आहे.(निर्माते नितीन देसाई)

बाह्य दुवे