"एस.एम. पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९९३ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}

पंडित यांचा जन्म गुलबर्ग्यातला. बालवयापासूनच त्यांचा चित्रकलेकडे ओढा होता. त्यांना घरूनही प्रोत्साहन मिळाले. [[चेन्नई]] येथून चित्रकलेचा डिप्लोमा मिळ्वून ते पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]]मध्ये दाखल झाले. आर्ट स्कूलचे प्रिन्सिपॉल सॉलोमन यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ त्यांना झाला आणि ब्रिटिश वास्तववादी चित्रशैलीतील रेखांकन व रेखाटन, मानवाकृतीचे चित्रण व चित्ररचना, तैलरंगाचे रंगलेपन तंत्र, उच्च दर्जाचे व्यक्तिचित्रण अशा विषयांचे ज्ञान त्यांना प्राप्त करता आले. त्यावर पंडित यांनी प्रभुत्व प्राप्त केले.

==भित्तीचित्रे==
शिक्षण पूर्ण झाल्यावर १९३८मध्ये त्यांच्या कारकिर्दीची रुरवात चित्रपटांचे पोस्टर करण्यापासून झाली. [[मेट्रो गोल्डविन मेअर]] कंपनीची पोस्टरे त्या वेळी अमेरिकेतून येत असत. ही पोस्टरे इथेच तयार करू शकेल अशा भारतीय चित्रकारांच्या शोधात कंपनी होती. त्यासाठी पंडित यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक जलरंगांचा (पोस्टर कलर) वापर पंडित यांनी सुरू केला. त्यांची कामे ‘मेट्रो’ सिनेमागृहाच्या शोकेसमध्ये झळकू लागली आणि रसिकांचे आकर्षण ठरू लागली. त्यानंतर भारतामध्ये हिंदी चित्रपटांसाठीची पोस्टर निर्मिती सुरू झाली.

==नियतकालिकांची मुखपृष्ठे व कॅलेंडरे==
प्रारंभी एस.एम. पंडित हे ‘फिल्म इंडिया’ मासिकाची मुखपृष्ठे करू लागले. १९४४ मध्ये यांनी स्वतःचा स्वतंत्र स्टुडिओ स्थापन केला. याच कालखंडात त्यांचं ‘राम-सीता’ हे चित्र पार्ले कंपनीच्या कॅलेंडरवर छापले गेले आणि ते प्रचंड गाजले. कंपनीने त्याच्या साठ हजार प्रती काढून विक्री केली. त्यानंतर पंडित यांच्या कारकिर्दीतील ‘कॅलेंडर पर्व’ सुरू झाले. त्यांनी चितारलेल्या देवदेवता व पौराणिक विषयांच्या चित्रांना प्रचंड मागणी होती. देशभरातून त्यांच्याकडे कामाचा ओघ सुरू झाला. त्या काळात रोज १५ ते १६ तास बसून पंडित चित्रे साकारत होते. हजारो/लाखोंच्या संख्येनं कॅलेंडरच्या प्रती निघत होत्या. घराघरांत ती चित्रे पोचत होती.

==धर्मिक, पौराणिक आणि वास्तववादी चित्रे==
चित्रपटसृष्टी व कॅलेंडरच्या विश्वात एस.एम. पंडित व्यग्र होते तरी त्यांचा पिंड आध्यात्मिक होता. ते काली मातेचे उपासक होते, ज्योतिषाचे अभ्यासक होते. १९६६मध्ये त्यांनी गुलबर्ग्याला काली मातेची व शिवाची प्राणप्रतिष्ठा केली व घर बांधून तेथे आर्ट गॅलरी स्थापन केली. १९६८ मध्ये व्यावसायिक कामातून निवृत्ती स्वीकारून पंडितांनी अतिशय काव्यात्मक वास्तववादाचे दर्शन घडवणारी भव्य तैलचित्रे साकारली. त्यासाठी आपल्या पौराणिक कथांमधील सर्वज्ञात विषय त्यांनी निवडले. त्यांच्या काव्यात्म अभिव्यक्तीला पोषक अशी सामग्री या विषयांद्वारे त्यांना लाभली. त्याच बरोबरीने अतिशय दर्जेदार अशी व्यक्तिचित्रे त्यांनी सातत्याने चितारली.

[[वर्ग:भारतीय चित्रकार|पंडित, एस्‌.एम्‌.]]
[[वर्ग:भारतीय चित्रकार|पंडित, एस्‌.एम्‌.]]

१४:५५, ६ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

एस्‌.एम्‌. पंडित
जन्म मार्च २५, १९१६
गुलबर्गा, कर्नाटक, भारत
मृत्यू मार्च ३०, १९९३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला
प्रशिक्षण शंकरराव आळंदकर, मद्रास स्कूल ऑफ आर्ट, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट
आई कल्लम्मा
पत्नी नलिनी पंडित, राजलक्ष्मी पंडित
अपत्ये सुभाष, कृष्णराज

पंडित यांचा जन्म गुलबर्ग्यातला. बालवयापासूनच त्यांचा चित्रकलेकडे ओढा होता. त्यांना घरूनही प्रोत्साहन मिळाले. चेन्नई येथून चित्रकलेचा डिप्लोमा मिळ्वून ते पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. आर्ट स्कूलचे प्रिन्सिपॉल सॉलोमन यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ त्यांना झाला आणि ब्रिटिश वास्तववादी चित्रशैलीतील रेखांकन व रेखाटन, मानवाकृतीचे चित्रण व चित्ररचना, तैलरंगाचे रंगलेपन तंत्र, उच्च दर्जाचे व्यक्तिचित्रण अशा विषयांचे ज्ञान त्यांना प्राप्त करता आले. त्यावर पंडित यांनी प्रभुत्व प्राप्त केले.

भित्तीचित्रे

शिक्षण पूर्ण झाल्यावर १९३८मध्ये त्यांच्या कारकिर्दीची रुरवात चित्रपटांचे पोस्टर करण्यापासून झाली. मेट्रो गोल्डविन मेअर कंपनीची पोस्टरे त्या वेळी अमेरिकेतून येत असत. ही पोस्टरे इथेच तयार करू शकेल अशा भारतीय चित्रकारांच्या शोधात कंपनी होती. त्यासाठी पंडित यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक जलरंगांचा (पोस्टर कलर) वापर पंडित यांनी सुरू केला. त्यांची कामे ‘मेट्रो’ सिनेमागृहाच्या शोकेसमध्ये झळकू लागली आणि रसिकांचे आकर्षण ठरू लागली. त्यानंतर भारतामध्ये हिंदी चित्रपटांसाठीची पोस्टर निर्मिती सुरू झाली.

नियतकालिकांची मुखपृष्ठे व कॅलेंडरे

प्रारंभी एस.एम. पंडित हे ‘फिल्म इंडिया’ मासिकाची मुखपृष्ठे करू लागले. १९४४ मध्ये यांनी स्वतःचा स्वतंत्र स्टुडिओ स्थापन केला. याच कालखंडात त्यांचं ‘राम-सीता’ हे चित्र पार्ले कंपनीच्या कॅलेंडरवर छापले गेले आणि ते प्रचंड गाजले. कंपनीने त्याच्या साठ हजार प्रती काढून विक्री केली. त्यानंतर पंडित यांच्या कारकिर्दीतील ‘कॅलेंडर पर्व’ सुरू झाले. त्यांनी चितारलेल्या देवदेवता व पौराणिक विषयांच्या चित्रांना प्रचंड मागणी होती. देशभरातून त्यांच्याकडे कामाचा ओघ सुरू झाला. त्या काळात रोज १५ ते १६ तास बसून पंडित चित्रे साकारत होते. हजारो/लाखोंच्या संख्येनं कॅलेंडरच्या प्रती निघत होत्या. घराघरांत ती चित्रे पोचत होती.

धर्मिक, पौराणिक आणि वास्तववादी चित्रे