सर ज.जी. कलामहाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

सर ज.जी. कलामहाविद्यालय[१][२] [३] तथा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही भारतातील एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. जमशेटजी जीजीभॉय (१७८३ - १८५९) यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीमधून १८५७च्या मार्च महिन्यात मुंबईत ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड इंडस्ट्री’ ही संस्था नाना शंकरशेट यांनी दिलेल्या जमिनीवर स्थापन झाली. जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीनिधीचा संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा असल्याने त्यांच्या स्मरणार्थ संस्थेचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मात्र ब्रिटिशांनी या संस्थेच्या नावातले ‘ॲन्ड इंडस्ट्री’ हे शब्द हटवले.

१९८१ सालापासून ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ लोकसत्ता टीम, विशेष प्रतिनिधी. "सर ज. जी. कला महाविद्यालयांना स्वायत्तता!". लोकसत्ता.
  2. ^ "राज भवन येथे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन व कलाकारांचा सत्कार". https://rajbhavan-maharashtra.gov.in/. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ "Mehta Marathi GranthJagat - May 2014": ४९. Cite journal requires |journal= (सहाय्य)