Jump to content

"रमण प्रल्हाद रणदिवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रमण प्रल्हाद रणदिवे हे एक मराठी कवी आणि गझलकार आहे...
(काही फरक नाही)

२१:४१, १४ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

रमण प्रल्हाद रणदिवे हे एक मराठी कवी आणि गझलकार आहेत. त्यांचा जन्म पुण्याचा. वडील पोस्ट खात्यात नोकरी करत. वडलांचा संस्कृतचा चांगला व्यासंग होता. त्यांनी बायबलवर साडेपाच हजार मराठी कवितांचे भक्तिकाव्य लिहिले होते. रमणने आपल्या वडिलांकडूनच कवित्वाचा वारस घेतला.

रमण रणदिवे यांचे शिक्षण पुण्याच्या कॅम्प हायस्कूलमधून झाले. पुढे पं. यशवंतराव मराठे यांच्या कडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. इ.स. १९६५पासून रणदिव्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली. त्यांच्या कवितांमध्ये क्रूस आणि ख्रिस्ताचे वारंवार उल्लेख येतात. १९७० सालानंतर रमण रणदिवे जाणीवपूर्वक गझल लेखनाकडे वळले. त्यांच्या गझलांना कौशल इनामदार, राम कदम, भास्कर चंदावरकर, गिरीश जोशी, यशवंत देव आदींनी संगीतबद्ध केले आहे.

रमण रणदिवे यांचे काव्यसंग्रह

  • चंद्रमेंदीच्या खुणा (२००२)
  • संप्रधार (२००८)
  • काहूर (२०१३)
  • समर्पण (२०१४)

सन्मान आणि पुरस्कार