"माधुरी बळवंत पुरंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १०२: | ओळ १०२: | ||
* पंढरीची वाट |
* पंढरीची वाट |
||
* माझी भवरी गाय |
* माझी भवरी गाय |
||
* रात पिया के संग जागी रे सखी |
|||
* सासों में दर्द, दर्द में साँसें बसी हुई हम में कोई, किसी में समायें हुएं हैं हम (चित्रपट आक्रोश) |
|||
* हमामा रे पोरा हमामा |
* हमामा रे पोरा हमामा |
||
२३:४९, ८ जुलै २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
माधुरी बळवंत पुरंदरे | |
---|---|
जन्म |
29 एप्रिल, १९५२ महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, नाटक, संगीत |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी, चरित्र, भाषांतर |
वडील | बाबासाहेब पुरंदरे |
आई | निर्मला पुरंदरे |
पुरस्कार | ‘पिकासो’ पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पारितोषिक (१९८९) |
नृत्य, नाटक, लेखन, गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या माधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या मराठी भाषेतील एक लेखिका आहेत. त्यांचे वडील म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आणि आणि आई म्हणजे समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन, स्त्री-शिक्षण, ग्रामविकास, बालवाड्या अशा अनेक आघाड्यांवर काम करणाऱ्या समाजसेविका पुण्यभूषण निर्मला पुरंदरे. त्यांची ‘वनस्थळी’ नावाची संस्था आहे.
शिक्षण
शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण मुंबईत चर्चगेट येथे ‘लेडीज हॉस्टेल’मध्ये राहून केले. नंतर त्यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून जीडी आर्ट केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले.
माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेली 'हमामा रे पोरा हमामा, घुंगरू वाजे घुमामा.. ’ही ज्ञानेश्वरांची रचना अतिशय गाजली आहे. ‘अमृतगाथा’ आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेतच, पण ‘तीन पैशाचा तमाशा’मध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि त्यात गायलेली ‘गझल’ याला तोड नाही. माधुरी देशपांडे यांच्या गीतांचे ’शेवंतीचं बन’ या नावाचे अल्बम आहेत.
कारकीर्द
- जब्बार पटेल, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, चंद्रकांत कुलकर्णी, समर नखाते, मोहन गोखले, अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांत अभिनय, नेपथ्य आणि रंगभूषा.
- गोविंद निहलानी, अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत अभिनय.
- जितेंद्र अभिषेकी, भास्कर चंदावरकर, आनंद मोडक या संगीतकारांच्या रचनांचे गायन
कादंबऱ्या
- सिल्व्हर स्टार
एकांकिका
- कोकरू आणि फ्लॅट नंबर थर्टी सिक्स
चरित्रे
- पिकासो
भाषांतरे
- झाडं लावणारा माणूस
- त्वान आणि इतर कथा
- न भयं न लज्जा
- वेटिंग फॉर गोदो
- व्हिन्सेंट व्हॅन गॉग
- हॅनाची सूटकेस
फ्रेंचमध्ये भाषांतरे
- बलुतं (दया पवार)
- स्त्री-पुरुष तुलना (ताराबाई शिंदे)
बालसाहित्य
- आमची शाळा
- कंटाऴा
- काकूचं बाळ
- किकीनाक
- खजिना
- जादूगार
- त्या एका दिवशी
- पाहुणी
- बाबाच्या मिशा
- मामाच्या गावाला
- मासोळी आणि चिमुकलं पाखरू
- मुखवटे
- मोठी शाऴा
- राजा शहाणा झाला
- राधाचं घर
- लालू बोक्याच्या गोष्टी
- शाम्याची गंमत
- सुपर बाबा
- हात मोडला
संपादन/संकलन
- वाचू आनंदे - बाल गट १ व २, कुमार गट १ व २
शैक्षणिक
- लिहावे नेटके
- चित्र वाचन (भाग १ व २)
माधुरी पुरंदरे यांनी गायलेली हिंदी-मराठी गीते
- अगं अगं सखूबाई
- कुणी धावा गं धावा
- डेरा गं डेरा
- देवळाच्या दारी
- देवाचा गं देवपाट
- देवा सूर्यनारायणा
- पंढरीची वाट
- माझी भवरी गाय
- रात पिया के संग जागी रे सखी
- सासों में दर्द, दर्द में साँसें बसी हुई हम में कोई, किसी में समायें हुएं हैं हम (चित्रपट आक्रोश)
- हमामा रे पोरा हमामा