"करडा रंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''करडा रंग''' म्हणजे इंग्रजीत ग्रे कलर. हिम म्हणजे बर्फाचा चुरा पां...
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:


कृष्णधवल रंगातले चित्रपट आजही मन मोहवतात. त्या चित्रपटांच्या काळाची आठवण म्हणून आजही लोक करड्या रंगात ग्रुप फोटो काढवून घेतात.
कृष्णधवल रंगातले चित्रपट आजही मन मोहवतात. त्या चित्रपटांच्या काळाची आठवण म्हणून आजही लोक करड्या रंगात ग्रुप फोटो काढवून घेतात.

करडा रंग फिका केला,म्हणजे त्यात थोडा पांढरा रंग मिसळला की [[राखाडी]] रंग बनतो.


[[वर्ग:रंग]]

{{संकेतस्थळ रंग}}

२३:१९, १ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

करडा रंग म्हणजे इंग्रजीत ग्रे कलर. हिम म्हणजे बर्फाचा चुरा पांढरा असतो, तर ढगाचा रंग करडा असतो. करडा रंग म्हणजेच भुरा रंग. वृद्धापकाळ जवळ आला की सफेद होण्याआधी डोक्यावरील केस करडे होतात. त्यामुळे करडा रंग हा निवृत्तीचा मानला जातो.

गृहसजावटीत करडा रंग कोणत्याही अन्य रंगासोबत उठून दिसतो. महाराष्ट्रातील दगड हे करड्या रंगाचे आहेत, त्यामुळे पंढरपूरची विठ्ठलाची मूर्तीही करड्या रंगाची आहे.

प्रभाकर बर्वे, यशवंत देशमुख आदी चित्रकार त्यांच्या चित्रात करड्या रंगाचा वापर जास्त करीत. चित्रकार हुसेन यांची जुनी चित्रेही करड्या रंगात होती.

उच्चपदस्थ बुद्धिमान व्यक्ती करड्यारुपेरी कांतीच्या रंगाचे वस्त्र परिधान करताना दिसतात. कॉनव्हेंट स्कूलचा अशाच रंगाचा गणवेश असतो. करडा व रुपेरी अशा रंगाच्या अनेक शोभिवंत वस्तू गृहसजावट व अन्य सजावटीसाठी वापरतात. मनगटी घड्याळे मोबाइल्स, टीव्ही टेप, व्हीसीडी, डीव्हीडी, कॉम्प्युटर, कार या अनेकदा करड्या रुपेरी रंगाच्या असतात. ग्रॅफाईट पेन्सिलमध्ये अशा रंगाची छटा असते. पूर्वी वर्तमानपत्रातील चित्रे करड्या रंगात वाचकांशी थेट संवाद साधणारी असत. आताही ती आकर्षित करणारी वाटतात.

कृष्णधवल रंगातले चित्रपट आजही मन मोहवतात. त्या चित्रपटांच्या काळाची आठवण म्हणून आजही लोक करड्या रंगात ग्रुप फोटो काढवून घेतात.

करडा रंग फिका केला,म्हणजे त्यात थोडा पांढरा रंग मिसळला की राखाडी रंग बनतो.