"भटके कलावंत आणि भिक्षेकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
* जोगी |
* जोगी |
||
* [[कानफाटे|डवऱ्या गोसावी]] |
* [[कानफाटे|डवऱ्या गोसावी]] |
||
* डोंबारी : कोल्हाट्याप्रमाणे रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. |
* डोंबारी : [[कोल्हाटी|कोल्हाट्याप्रमाणे]] रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. [[कोल्हाटी|कोल्हाट्यांनाच]] प्रामुख्याने कर्नाटकात डोंबारी म्हणतात. |
||
* तेलंगी ब्राम्हण : हे ब्राह्मण घरोघर हिंडून घनपाठ, जटापाठ आदी स्वरूपातले वेद म्हणतात, भविष्य सांगतात आणि त्याप्रीत्यर्थ मिळालेले दान स्वीकारतात. |
* तेलंगी ब्राम्हण : हे ब्राह्मण घरोघर हिंडून घनपाठ, जटापाठ आदी स्वरूपातले वेद म्हणतात, भविष्य सांगतात आणि त्याप्रीत्यर्थ मिळालेले दान स्वीकारतात. |
||
* दरवेशी : गावोगावी जाऊन अस्वलाचे खेळ करणारा. हे अस्वलाला नाचवतात, त्याच्याशी कुस्ती खेळतात आणि त्याचे केस मुलांच्या गळ्यातल्या ताइतासाठी आयाबायांना विकतात. |
* दरवेशी : गावोगावी जाऊन अस्वलाचे खेळ करणारा. हे अस्वलाला नाचवतात, त्याच्याशी कुस्ती खेळतात आणि त्याचे केस मुलांच्या गळ्यातल्या ताइतासाठी आयाबायांना विकतात. |
१७:४२, २१ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
या लेखाच्या निःपक्षपाती दृष्टिकोनाबद्दल विवाद आहे. कृपया तशी परिस्थिती निर्माण होईपर्यंत, हा संदेश हटवू नका. |
एके जागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे काही भटके कलावंत आणि भिक्षेकरी महाराष्ट्रात पिढ्यान् पिढ्या राहत आले आहेत. त्यांपैकी काही असे :
- उदासी : या पंथाचे लोक भिक्षेवर जगतात.
- कडकलक्ष्मी :
- काथोडी : आदिवासींमधील एक जमात
- कानफाटे : हे नाथपंथीय असतात.
- कुडमुड्या जोशी : गळ्यात उपरणे घालून डोईस रुमाल बांधून, कपाळाला गंध लावलेले हे स्वच्छ कपड्यातले भिक्षेकरी वर्षभविष्य सांगत गावोगाव फिरतात. घरी एकट्या दुकट्या असलेल्या गृहिणीला ‘ती किती कष्ट करते आणि तिच्या कष्टाचे कसे चीज होत नाही हे सांगून तिच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही’ देतात व तिच्याकडून पैसे उकळतात.
- कैकाडी: बुरुडांप्रमाणेच हे टोपल्या बनवतात. पण त्यासाठी करंज्याच्या बारीक फांद्या किंवा तरवड्याच्या ओल्या फांद्या वापरतात. घायपातापासून दोर बमवून विकतात.
- कोल्हाटी : रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे.
- गारुडी : हे साप, अजगर आणि नाग पकडतात आणि त्यांचे गावोगाव खेळ करतात.
- गोंधळी : हे बिनबोलावता येत नाहीत. अनेकजण घरात लग्नमुंजीसारखा मंगल प्रसंग होऊन गेल्यावर यांना देवीच्या गोंधळाच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावले जाते.
- गोसावी : या पंथातले लोक दानधर्मावर जगतात. यांना स्वत:चा खास असा काही व्यवसाय नसतो. उत्तरी भारतात यांचे मठ आणि आखाडे असतात. कुंभमेळ्याला यांची हमखास हजेरी असते.
- जोगतिणी : या यल्लम्मा देवीला वाहिलेल्या स्त्रिया डोक्यावर देवघरात ठेवलेली देवीची मूर्ती किंवा छायाचित्र घेऊन गावोगाव आणि रस्तोरस्ती फिरत फिरत दान मिळवतात.
- जोगी
- डवऱ्या गोसावी
- डोंबारी : कोल्हाट्याप्रमाणे रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. कोल्हाट्यांनाच प्रामुख्याने कर्नाटकात डोंबारी म्हणतात.
- तेलंगी ब्राम्हण : हे ब्राह्मण घरोघर हिंडून घनपाठ, जटापाठ आदी स्वरूपातले वेद म्हणतात, भविष्य सांगतात आणि त्याप्रीत्यर्थ मिळालेले दान स्वीकारतात.
- दरवेशी : गावोगावी जाऊन अस्वलाचे खेळ करणारा. हे अस्वलाला नाचवतात, त्याच्याशी कुस्ती खेळतात आणि त्याचे केस मुलांच्या गळ्यातल्या ताइतासाठी आयाबायांना विकतात.
- नंदीबैलवाला
- पांगुळ : स्वत:ला सूर्याचा पांगळा सारथी अरुण याचे वंशज मानण्याऱ्या भिकाऱ्यांची एक जात.
- पोतराज :
- फकीर : मुसलमान भटके भिक्षेकरी.
- फांसेपारधी : डुकरे, ससे, हरणे, पाखरे असे शेतीला त्रासदायक असणारे पशुपक्षी, हे फासे लावून पकडतात.
- बहुरूपी : बहुरूपी रोज एक सोंग घेऊन गावात येतो. कधी पोलीस, कधी इंग्लिशमन तर कधी जख्ख म्हातारा. गर्भार बाईचे सोंग देखील आणणारे हे भटके भिक्षेकरी आपल्या कलेवर पोट भरतात.
- बाळसंतोष
- बुरूड : बांबूच्या टोपल्या विणणारी माणसे. हे फक्त बांबूकाम आणि वेतकाम करतात. बांबू किंवा वेत वाकवून त्याच्या पातळ पट्ट्या किंवा कामट्या करून हे वस्तू बनवतात. बांबूच्या टोपल्या, दुरड्या, बुरकुल्या, शेल्फ व उदबत्तीच्या काड्या, आणि वेताच्या खुर्च्या बनवणारे बव्हंशी बुरूडच असतात. प्रत्येक शहरात एखादी बुरूडआळी असते, तिथे यांची वस्ती असते. एरवी हे गावागावातून भटकत आपला व्यवसाय करतात.
- बैरागी : तोंडाला राख फासलेली हातात कमंडलू घेऊन भिक्षा मागणारे.
- भराडी
- भुत्या : देवीचे हे भक्त गावोगाव फिरत दान मिळवतात.
- मांगगारुडी : हे म्हशी भादरायचे काम करतात.
- रामदासी: ही माणसे गावोगाव आणि शहरातील घरोघरी फिरून रामदासांच्या काव्यरचना ऐकवून दान मिळवतात. यांचे मुख्यालय सज्जनगडावर आहे.
- लमाण : बैलावरून सामानाची वाहतूक करणारी भटकी जमात.
- वंजारी : लमाणांसारखेच काम करणारी माणसे.
- वडारी : गाढवावरून, माती, विटा आदींची वाहतूक करणारे आणि बाधकामात मजुरी करणारे. यांच्या बायका चोळी घालत नाहीत. गावोगाव एखादी वडारवाडी असते.
- वाघ्ये आणि मुरळ्या : हे जेजुरीच्या खंडोबाचे भक्त गावोगाव फिरून खेडुतांच्या कपाळाला भंडारा फासतात, त्यांना जेजुरीच्या खंडोबाची आण घालतात, आणि खंडोबाची गाणी म्हणत भिक्षा मागतात.
- वासुदेव : अगदी पहाटे पहाटे कृष्णभक्तीची गाणी ऐकवून लोकांना झोपेतून उठवणारा गुणवान भिक्षेकरी.
- वैदू : कंदमुळे आणि झाडपाल्याची औषधे विकणारे भटके वैद्य.