Jump to content

वैदू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैदू ही भारतातील एक भटकी जमात आहे. जंगलांतून आणि दऱ्याखोऱ्यांतून हिडून हे काष्ठौषधी आणि मुळ्या गोळा करतात आणि त्यांच्यापासून चूर्णादी औषधे तयार करून विकतात. जिथे डॉक्टर, हकीम आणि वैद्य पोचत नाहीत तिथले डॉक्टर म्हणजे वैदू. गावच्या बाजारात आणि जत्रेत एकतरी वैदू असतोच. शिवाय बाहेरगांवाहून लोक जिथे येण्याची शक्यता असते त्या शहराच्या भागातही हे पथारी अंथरून तिच्यावर औषधे ठेवून ती विकण्याचा व्यवसाय करतात. सालम मिश्री, सफेदमिश्री, शक्तिवर्धक औषध, वाईवर औषध, वातावर औषध, असे नाना प्रकारच्या औषधांचे भांडार वैदूंकडे असते. त्यांच्याकडे जळवा असतात आणि तुंबड्याही असतात. त्यांना साप धरायचा मंत्र येतो, असे ते म्हणतात. पण प्रसंगी ते नदीतल्या मगरीही पकडतात ही गोष्ट खरी आहे.

पहा : भटके कलावंत आणि भिक्षेकरी