चर्चा:भटके कलावंत आणि भिक्षेकरी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
* कोल्हाटी : रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. यांच्या बायका लावण्या म्हणतात आणि गावातल्या तरुण पोरांना नादी लावतात.

अशी भाषा वापरायला लेखकाला लाज वाटायला पाहिजे. Sarvamanya (चर्चा) २२:०९, ८ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

स्त्री आणि पुरूषांना एकमेकांच आकर्षण वाटणे नैसर्गीक गोष्ट आहे. हि जगातल्या तमाम प्राणिमात्रांबद्दल सत्य आहे. नादी लागण्या करता आणि लावण्याकरता तरूण्याचीही आवश्यकता नसते म्हातारे आणि म्हाताऱ्याही नादानी करतात ती केवळ सिनेमात असे नव्हे.उताविळ जरठांचे बालांशी होणारे विवाहाच्या कथा महाराष्ट्रातून उच्चाटन करण्या करता काही समाज सुधारकांना उभी हयात घालवावी लागली हा इतिहास आहे. हे पुरुषच करतात असे नव्हे अर्थिक दृष्ट्या संपन्न देशातील म्हाताऱ्या स्त्रीयांचे पुर्व आफ्रीकेतील सुरस कथा म्हातारे आणि म्हाताऱ्या असा वेगळा भेद असल्याचे सांगत नाहीत.

नादी लागण्या करता आणि लावण्या करता लावण्यांची गरज नसतेच ,नादी लागणे आणि लावणे या करता व्यवसाय आणि जातीचेही कसलेही बंधन नसते.एखाद्दा विशीष्ट व्यवसाय जाती धर्म भाषा प्रांत वंश समुहा बद्दल असे पुर्वग्रह तयार करणे आणि समाजमन कलुषित करण्याचे प्रयत्न निषेधार्हच असतात असे नव्हे तर सबंध प्राणि मात्रातील ५० टक्के स्त्रिजातीचा अपमान करणारे असतात याचे भान बऱ्याच मानवी पुरूष प्राण्यांचे सुटत असते, त्यांनी आपली आई सुद्धा कधी तरूण होती आणि आपल्या स्वत:ला न रुचणारे, कल्पना नसलेले कटू सत्यही अस्तीत्वात असू शकते असा विचार करून भानावर यावे , न पेक्षा न जाणो स्वर्ग नावाची गोष्ट अस्तीत्वातच असली देव ना करो तर वर गेल्या नंतर आपल्याच मातासम उर्वशी अर्जुनाच्या मागे लागली त्या प्रमाणे कुणी नाही लागल्या आणि शिखंडीपण नाही दिले म्हणजे मिळवले म्हणून स्त्रित्वा बद्दल तुच्छता त्यागावी हे अधिक बरे .मी संबंधीत लेखकाचा तीव्र निषेध करते -रश्मी

वरील आक्षेपांची नोंद घेउन लेखात {{दृष्टिकोन}} हा साचा लावला आहे. सदस्यांनी येथे चर्चा करुन लेखात योग्य ते बदल करावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) २३:३०, ८ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

ऑब्जेक्शन सस्टेन्ड[संपादन]

लेखात बदल झालेले आहेत. कोल्हाटिणींचा लावण्या म्हणणे हा व्यवसाय आहे हे सत्य आहे; वाक्याचा पुढील अंश गाळायला हरकत नव्हती. कुठून तरी(बहुधा एखाद्या संकेतस्थळावरून, आंतरजालावरील ज्ञानकोशावरून किंवा वर्तमानपत्रातील जातिविषयक लेखावरून) नकल-डकव पद्धतीने वाक्य छापले गेले असावे....J (चर्चा) ००:१०, ९ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

J, रश्मी, sarvamanya,
लेखातील मजकूरावरून हमरीतुमरीवर न येता सुज्ञपणाने तडजोड केल्याबद्दल प्रचालक या नात्याने शतशः धन्यवाद.
एकदा सगळ्याच लेखावर नजर फिरवून आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास तेथे योग्य ते बदल करावे ही पुढील विनंती (उदा. या पंथातलेकोक काहीही काम न करता केवळ लोकांच्या दानधर्मावर जगतात.)
अभय नातू (चर्चा) ००:१७, ९ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

नकळत झाले असेल तरीही अश्या अपमानास्पद वाक्याचा वापर टाळायला पाहिजे. मला असे काही अपमानास्पद वाक्य काही लेखात दिसले आहेत, लेखाकाने किंवा इतर जाणकारांनी त्यात सुधार करण्याच्या गरज आहे.

Sarvamanya (चर्चा) ००:३१, ९ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

विश्वकोशातील माहिती[संपादन]

नकळत होणारी गोष्ट कशी टाळतात? गरजूंनी मराठी विश्वकोशातील कोल्हाट्यांची माहिती वाचावी....J (चर्चा) १७:४५, २१ डिसेंबर २०१२ (IST)Reply[reply]

माझा प्रश्न/चिंता ऐकीव/जुन्या माहितीवर आधारीत, कोणत्याही विशीष्ट समाजातील महिलांची 'उपभोग सुलभ' अशी, पुरूषजातीचा मतलब साधणारी, stereotype प्रतिमा तयार केली जाण्याबद्दल आहे.मराठी विश्वकोशातील माहिती 1916 आणि 1920–22च्या संदर्भावरून घेतली आहे असे दिसते. ती माहिती सुद्धा ऐकीव असू शकते. - रश्मी

ज्ञानकोशातील माहिती[संपादन]

येथे वाचावी