Jump to content

"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३५: ओळ ३५:
* राज्यस्तरीय योगासन सांघिक पुरस्कार : पुणे जिल्हा योग संस्था (२०१२)
* राज्यस्तरीय योगासन सांघिक पुरस्कार : पुणे जिल्हा योग संस्था (२०१२)
* अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कलारत्न पुरस्कार : मंगला बनसोडे (तमाशा कलावंत)
* अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कलारत्न पुरस्कार : मंगला बनसोडे (तमाशा कलावंत)
* आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : [[फैय्याज]] शेख
* आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : [[फैय्याज]]
* बोरीवली नाट्य परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार (२००९) : [[फैय्याज]]
* अखिल नाट्य विद्यामंदिर समिती(सांगली)आणि अखिल महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद यांच्यातर्फे '''[[विष्णुदास भावे]]''' गौरव पदक(२०१०) : [[फैय्याज]]
* ‘चंद्रलेखा’चा ज्येष्ठ रंगकर्मींसाठी असलेला शारदाबाई वाघ पुरस्कार(२०१०) : [[फैय्याज]]


==जीवनगौरव पुरस्कार आणि तो ज्यांना मिळाला अशा काही व्यक्ती==
==जीवनगौरव पुरस्कार आणि तो ज्यांना मिळाला अशा काही व्यक्ती==

१६:२२, ८ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

ज्ञान, साहित्य, कला, समाजकार्य आदि विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक संस्था पुरस्कार देतात. हे पुरस्कार मानपत्राच्या रूपात, रोख रकमेच्या स्वरूपात किंवा स्मृतिचिन्हाच्या रूपात असतात. अनेक संस्था आणि त्यांनी दिलेल्या पुरस्कारांची माहिती वेळोवेळी वर्तमानपत्रांमधून किंवा त्या संस्थेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध होत असते. पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्‍न या सरकारने दिलेल्या पुरस्कारांप्रमाणेच हे पुरस्कार केवळ मानाचे असतात, व्यक्तिनामाच्या आधी किंवा नंतर त्यांचा लिखित उल्लेख करता येत नाही. त्या व्यक्तीला असा पुरस्कार मिळाला आहे असा उल्लेख केवळ बोलताना, भाषण करताना किंवा व्यक्तिवृत्त(Biodata) लिहिताना करता येतो. असाच प्रकार विद्यापीठांनी दिलेल्या डी.लिट. या सन्मानार्थ दिलेल्या पदवीचा आहे. ही पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, परीक्षा द्यावी लागत नाही किंवा जगावेगळे असे काही काम करावे लागत नाही. ही पदवी मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी डॉ.(डॉक्टर) असे लिहिण्याची प्रथा तर सर्वथैव अयोग्य आहे. एखाद्या राजकारणी माणसाला ही मानाची डॉक्टरेट एका विद्यापीठाकडून मिळाली की अन्य विद्यापीठांमध्ये त्याच व्यक्तीला डी.लिट. देण्याची स्पर्धा लागते. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ हे या बाबतीत माहीर आहेत. हाच प्रकार परदेशी विद्यापीठे करतात. येडियुरप्पा हे कर्नाटकातले एक उघड उघड भ्रष्टाचारी राजकारणी आहेत. त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्यातील सॅगिनॉ व्हॅली राज्य विश्वविद्यालयाने डी.लिट. दिली आहे. कां, तर यापूर्वी सॅगिनॉच्या अध्यक्षाला म्हैसूर विश्वविद्यालयाने प्रा. डी. मदैय्या या उपकुलगुरूंच्या कारकीर्दीत डी.लिट. दिली होती, या परतफेडीच्या भावनेने. सन्माननीय पदव्यांच्या बाबतीत विद्यापीठांचे असे साटेलोटे चालते. त्यामुळे यापुढे कधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे शब्द वाचनात येतील तेव्हा ते लिखाण गैर आहे असे समजावे.

हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर किंवा रावसाहेब अशा उपाध्या देत. मात्र या उपाध्या, नावाआधी लावण्याची मुभा होती.

पुरस्कारांचे प्रकार

या पुरस्कारांत पुढील प्रकार आहेत: -
  • औपचारिक पुरस्कार
  • कला, क्रीडा, वक्तृत्व-कौशल्य पुरस्कार
  • जीवनगौरव पुरस्कार
  • तंत्रज्ञानासाठीचे पुरस्कार
  • भूषण पुरस्कार
  • महोत्सवी पुरस्कार
  • वाङ्मयीन (साहित्य किंवा साहित्यिक) लेखन पुरस्कार
  • राष्ट्रीय पुरस्कार
  • लांगूलचालनासाठी दिलेले पुरस्कार
  • व्यवसाय पुरस्कार
  • शौर्य पुरस्कार
  • सद्‌भावना पुरस्कार
  • समाजसेवा पुरस्कार
  • सरकारी पुरस्कार
  • स्मृति पुरस्कार, आणि
  • अन्य पुरस्कार.

कला, क्रीडा, वक्तृत्व-कौशल्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती

  • अर्जुन पुरस्कार :
  • खेळरत्‍न पुरस्कार :
  • वैभव पुरस्कार : रमेश देव वगैरे १२जण
  • शंकरभय्या पुरस्कार : सुरेश तळवलकर (तबला-पखवाज वादनविद्येसाठी)
  • शिवरामपंत दामले स्मृति पुरस्कार  : अनंतराव थोपटे (व्यायामविद्येसाठी)
  • गिमा(ग्लोबल इंडियन म्युझिक ॲवॉर्ड) :
  • राज्यस्तरीय योगासन स्पर्धा पुरस्कार : सलोनी जाधव (२०१२ची सर्वोत्कृष्ट योगपटू)
  • राज्यस्तरीय योगासन सांघिक पुरस्कार : पुणे जिल्हा योग संस्था (२०१२)
  • अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कलारत्न पुरस्कार : मंगला बनसोडे (तमाशा कलावंत)
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : फैय्याज
  • बोरीवली नाट्य परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार (२००९) : फैय्याज
  • अखिल नाट्य विद्यामंदिर समिती(सांगली)आणि अखिल महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद यांच्यातर्फे विष्णुदास भावे गौरव पदक(२०१०) : फैय्याज
  • ‘चंद्रलेखा’चा ज्येष्ठ रंगकर्मींसाठी असलेला शारदाबाई वाघ पुरस्कार(२०१०) : फैय्याज

जीवनगौरव पुरस्कार आणि तो ज्यांना मिळाला अशा काही व्यक्ती

  • पत्रकारितेसाठी जीवनगौरव पुरस्कार : प्रभाकर पाणसरे
  • व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार :
  • राज कपूर जीवनगौरव पुरस्कार :
  • पुणे-महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका)चा साहित्य जीवनगौरव आणि समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव पुरस्कार : चित्रपटअभिनेत्री रेखा

भूषण पुरस्कार

  • बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार(नागपूर)
  • निफाडभूषण पुरस्कार
  • पुण्यभूषण पुरस्कार
  • ठाणे महापालिकेकडून मिळणारा ठाणेभूषण पुरस्कार : त्र्यंबक जोशी, श्रीराम नानिवडेकर, मोहम्मद हरून शेख, सरलाबेन, डॉ . किशोर भिसे

साहित्य पुरस्कार

  • राज्य मराठी विकास संस्थेचा डॉ.गं.ना.जोगळेकर स्मृति पुरस्कार : वसुंधरा पेंडसे-नाईक
  • पु.भा.भावे साहित्यसेवा पुरस्कार : भा.द.खेर(मरणोत्तर)
  • आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : प्रभाकर साळेगांवकर(विनोदी कविता);सुवर्णा दिवेकर (विनोदी लेखन); गिरीश जोशी(नाट्यलेखन)

सरकारी पुरस्कार

व्यवसायासाठीचे पुरस्कार

  • संकेत कला क्रीडा प्रतिष्ठान(पुणे)चे संकेत आदर्श शिक्षक पुरस्कार
  • संकेत कला क्रीडा प्रतिष्ठान(पुणे)चे संकेत आदर्श मुख्याधापक पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार
  • आदर्श शिक्षक पुरस्कार
  • आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनल संस्थेतर्फे उद्योजकता पुरस्कार : कॉटनकिंगचे मालक प्रदीप मराठे
  • अनंतश्री पुरस्कार (नांदेडच्या इंदिरा सेवा समितीचा अनंत दामोदर आठवले स्मृति पुरस्कार) : वैद्य जयंत दातार
  • आंबेडकर समाजगौरव पुरस्कार : कुलगुरू वासुदेव गाडे, अस्थिरोगतज्‍ज्ञ मदन हर्डीकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आदी ८जण.
  • ‘समर्थ’ संस्थेचा राज्यस्तरीय मानवी हक्क वार्ता पुरस्कार : सूर्यकांत नेटके (दैनिक सकाळचे अहमदनगर येथील बातमीदार)
  • तंटामुक्त अभियान (पत्रकारिता) पुरस्कार : सूर्यकांत नेटके
  • संपूर्ण स्वच्छता (पत्रकारिता) पुरस्कार : सूर्यकांत नेटके
  • अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार : सूर्यकांत नेटके
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘पत्रकार आचार्य अत्रे प्रेरणा’ पुरस्कार : भक्ती सोमण
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार : डॉ.आनंद शेडगे
  • सुधाताई अत्रे पुरस्कार : गीता महाजन;ज्योत्स्ना कदम
  • आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : महेश लोहोकरे (उद्योजकता)
  • पु.भा.भावे पुरस्कार : राजदत्त (चित्रपट दिग्दर्शन); विक्रमसिंह ओक (पत्रकारिता);

स्मृति पुरस्कार

  • राज्य मराठी विकास संस्थेचा डॉ.गं.ना.जोगळेकर स्मृति पुरस्कार : वसुंधरा पेंडसे-नाईक
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : फैय्याज शेख
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘पत्रकार आचार्य अत्रे प्रेरणा’ पुरस्कार : भक्ती सोमण
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार : डॉ.आनंद शेडगे
  • सुधाताई अत्रे पुरस्कार :गीता महाजन; ज्योत्स्ना कदम
  • आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : प्रभाकर साळेगांवकर(विनोदी कविता);सुवर्णा दिवेकर (विनोदी लेखन); गिरीश जोशी(नाट्यलेखन); संजय मेस्त्री(व्यंग्य चित्रकला); निलेश साबळे (हास्य अभिनय)
  • आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : डॉ.वर्षा देशपांडे (सामाजिक कार्य); विजय जामकर (राजकीय कार्य); चंद्रकांत कुलकर्णी (चित्रपट दिग्दर्शन); महेश लोहोकरे (उद्योजकता)

अन्य पुरस्कार

  • उद्धवश्री पुरस्कार
  • ठाणे महापालिका गणेशोत्सव आरास पुरस्कार
  • गिरिप्रेमी संस्थांसाठी निनाद पुरस्कार
  • सवरेत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार : डॉ.संचेती, निरंजन पंड्या, सतीश आळेकर
  • सोलापूरच्या लोकमंगल प्रतिष्ठानचा शिक्षकरत्‍न पुरस्कार
  • लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे लोकमान्य मातृभूमि पुरस्कार : बाबासाहेब पुरंदरे
  • वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान पुरस्कार :
  • सामाजिक शैक्षणिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी अण्णा भाऊ साठे पुरस्कार(२०१२-१३) : मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘मी कसा झालो’ पुरस्कार : डॉ.भालचंद्र मुणगेकर(मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू)
  • पु.भा.भावे पुरस्कार : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर