विजापूर (पालघर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?विजापूर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .३८५ चौ. किमी
जवळचे शहर वाडा
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,०१२ (२०११)
• २,६२९/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली, कुणबी.
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२१३०३
• +०२५२६
• एमएच/४८ /०४ /०५

विजापूर हे भारतामधील महाराष्ट्र राज्यातल्या उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातले एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

वाडा बस स्थानकापासून शहापूर मार्गाने गेल्यावर राजा वडापाव नंतर विजापूर लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ६.१ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती करतात.

लोकजीवन[संपादन]

विजापूर हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार ह्या गावात २०३ कुटुंबे राहतात. एकूण १०१२ लोकसंख्येपैकी ५०८ पुरुष तर ५०४ महिला आहेत. गावाची साक्षरता ७७ टक्के आहे. पुरुष साक्षरता ८३ टक्के आहे तर स्त्री साक्षरता ७२ टक्के आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२० आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. विजापूरला येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून ठरावीक वेळी मिळतात. रिक्षासुद्धा असतात.

जवळपासची गावे[संपादन]

वरईबुद्रुक, वरईखुर्द, कांबरे, आबितघर, सावरखांड, कोणे, मालोंदा, गाटेसबुद्रुक, गाटेसखुर्द, चिखले, गोळेघर ही जवळपासची गावे आहेत. कोणे ग्रामपंचायतीमध्ये कोणे आणि विजापूर ही गावे येतात.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/