Jump to content

विजय सुरवाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय सुरवाडे
जन्म: ३० जून १९५६
भुसावळ
चळवळ: आंबेडकरी चळवळ
शिक्षण: मुंबई विद्यापीठ
कार्यक्षेत्र: लेखन, सामाजिक चळवळ
धर्म: बौद्ध धर्म
प्रभाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तळटिपा: फेसबुक संकेतस्थळ

विजय सुरवाडे ( ३० जून १९५६) मराठी लेखक व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्राहक आहेत.[] अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक कीर्तीच्या अग्रणी वित्तीय संस्थेत (IDBI) प्रबंधक या पदावर ते कार्यरत होते.[] ते आता सेवा निवृत्त आहेत.

सुरुवातीचे जीवन व शिक्षण

[संपादन]

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे ३० जून १९५६ रोजी एका गरीब कुटुबांत विजय सुरवाडे यांचा जन्म झाला. भुसावळ, चाळीसगाव, ठाणे, मुंबई येथून त्यांनी शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाची बी.ए. (स्पे. इकॉनॉमिक्स) पदवी परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत.

कारकीर्द

[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र व चळवळींचा इतिहास हा त्यांचा आवडीचा, जिव्हाळ्याचा व सदैव संशोधनाचा विषय आहे. या व्यासगांतून त्यांनी फुले-आंबेडकर चळवळीसंबंधीचे ग्रंथ, मूळ छायाचित्रे, पत्रे, संबधित संदर्भ आदी दुर्मीळ अस्सल दस्तावेजांचा समृद्ध वैयक्तिक संग्रह तयार केला. डॉ. आंबेडकर जीवन व चळवळीवर लेखन किंवा संशोधन करणाऱ्या देश-विदेशातील अभ्यासकांना विजय सुरवाडे सहकार्य व मार्गदर्शन करतात.[]

चरित्रकार धनंजय कीर यांच्या 'कृतज्ञ मी कृतार्थ मी' व डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मचरित्राचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 'डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती'च्या फोटो अल्बम व पत्रव्यवहार खंड प्रकाशन समितीचे सदस्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० ते १९३६ या कालावधीत केलेल्या काही निवडक भाषणांचा संग्रह विजय सुरवडे यांनी संपादित केला आहे. यापूर्वी त्यांनी ’पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर’ या शीर्षकाचे दोन खंड संपादित करून प्रकाशित केले आहेत. डॉ. आंबेडकरांच्या ५००० पेक्षा अधिक मूळ छायाचित्रांचा संग्रहही त्यांनी केला आहे. ही छायाचित्रे त्यांनी संपूर्ण देशभरात फिरून मिळवलेली आहेत.

लेखन

[संपादन]
  • समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रकाशन : लोकवाङमय गृह (२००७)[]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे : भाग पहिला, प्रकाशन : लोकवाङमय गृह[]
  • पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर (खंड १ व २), तथागत प्रकाशन (१९८६)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष, तथागत प्रकाशन (मे २०१३)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रात्मक चरित्र (फोटो अल्बम ) ४ भाषांत
  • Selected Writings and Speeches of Dr. Ambedkar

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'डॉ.आंबेडकरांचे स्नेही : दत्तोबा पोवार' ग्रंथ संशोधनाच्या अंगाने मौलिक - तरुण भारत". तरुण भारत (इंग्रजी भाषेत). 2017-11-14. 2018-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ "http://velivada.com/2017/05/13/meet-vijay-surwade-living-encyclopedia-ambedkarism/". velivada.com. 2018-05-08 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  3. ^ "Finding Babasaheb Ambedkar s smile". mid-day. 2016-04-24. 2018-05-08 रोजी पाहिले.
  4. ^ सुरवाडे, संपादन-संकलन, विजय. "समकालीन सहकार्‍याच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर". 東京外国語大学附属図書館OPAC. 2018-05-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Dr.Babasaheb Ambedkaranchi Nivadak Bhashane Part -1 by Vijay Survade - Book Buy online at Akshardhara". Akshardhara (इंग्रजी भाषेत). 2018-05-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]