विजय पाटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विजय पाटकर
जन्म विजय पाटकर
२९ मे, इ.स. १९६१[१]
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पत्नी सरोज पाटकर
अपत्ये शार्दूल पाटकर

विजय पाटकर (२९ मे, इ.स. १९६१[१] - हयात) हा मराठी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता आहे. याने मराठीहिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे, तसेच मराठी नाटकांमधूनही भूमिका केल्या आहेत.

जीवन[संपादन]

१९७९ पासुन आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधून त्यांनी अभिनयाची सुरवात केली, आंतरबँकनाट्य स्पर्धातून नाट्य दिग्दर्शनाची सुरवात केली. १९८३ पासुन त्यांनी व्यावसायिक नाटकात कामे केली, बोलबोल म्हणता, टूरटूर, मुंबई मुंबई,घर घर इत्यादी अनेक नाटकांमधून त्यांनी कामे केली, १९८५ पासुन आजवर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, तुझ्यावाचून करमेना, नवरा माझा नवसाचा, झक मारली बायको केली पासुन अगदी अलीकडच्या गंमत, वन टू थ्री फोर, अर्धनारी नटेश्वर, आय पी एल अश्या अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या, त्याचप्रमाणे रिवायत, रिमांड होम, तेजाब, नरसिम्हा, क्या कुल है हम, ऑल द बेस्ट, गोलमाल ३ अश्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. एक उनाड दिवस, चष्मे बहादूर, जावईबापू झिंदाबाद, सासू एक नंबरी जावई दस नंबरी, सगळं करून भागले अश्या काही चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे. सध्या लाइफ इन दी डार्क या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. a b ठाकूर,दिलीप (२ डिसेंबर, इ.स. २०११). "श्रीमान श्रीमती : विजय पाटकर, सरोज पाटकर" (मराठी मजकूर). लोकप्रभा. 


बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.