विकिपीडिया चर्चा:संपादनेथॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी भाषा दिवसानिमित्त संपादनेथॉन (संपादन मॅरेथॉन)[संपादन]

नमस्कार मंडळी!

दरवर्षी फेब्रुवारी २७ला जगभर पाळल्या जाणाऱ्या मराठी भाषा दिवसानिमित्त येत्या २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित करावी काय ? या संपादनेथॉनात आपण एका दिवसात मराठी विकिपीडियावर शक्य तितकी संपादने करायची व यातून एका दिवसात आपण मराठी विकिपीडियाच्या प्रगतीला आपल्या सर्व ताकदीनिशी शक्य तितका मोठ्ठा रेटा द्यायचा हा मुख्य हेतू. आपण या संपादनेथॉनात खालील गोष्टी करू शकतो :

  • अस्तित्वात असलेल्या लेखांमध्ये भर घालून त्यांना पुष्ट करणे
  • लेखांचे वर्गीकरण करणे, नवीन वर्ग बनवणे
  • लेखांमध्ये विकिमीडिया कॉमन्स येथून विषयाला सुसंगत चित्रे शोधून चिकटवणे
  • किमान तीन-चार ओळींसह नवीन लेख बनवणे
  • शुद्धलेखनदृष्ट्या व व्याकरणदृष्ट्या लेख सुधारणे
  • विकिपीडियाविषयी साहाय्यक पाने (मदत, धोरणे, प्रकल्प, दालने इत्यादी) बनवणे

या दिवशी आपण मोठ्ठा रेटा देऊन दिवसभरात घडलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून आपल्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करू शकतो. त्यावरून आपल्याला पुढील वाटचालीसाठी काही मोलाची माहिती उपलब्ध होऊ शकेलच; पण त्याचबरोबर आपण विविध ऑनलाइन व छापील माध्यमांमधून याबद्दल वार्तांकन घडवून आणून मराठी विकिपीडिया प्रकल्पाची जाहिरात करण्यासाठी हा इव्हेन्ट वापरू शकू.

आपली काय मते ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०८, ८ फेब्रुवारी २०११ (UTC)

Thumb up icon.svg

२७ फेब्रुवारी रविवार आहे. किती मंडळी घरकामात गुंतलेली असतील, माहिती नाही, पण एखादा रविवार मातृभाषेसाठी द्यावा की!
२७ तारीख स्थानिक प्रमाणवेळेनुसार मोजावी की भारतीय प्रमाणवेळेनुसार?
अभय नातू १८:५५, ८ फेब्रुवारी २०११ (UTC)
दिवस स्थानिक कालविभागानुसार धरायला हरकत नाही. त्यामुळे दिवस २४ तासांहून अधिक होईल; पण नंतरची आकडेवारी तपासताना वाढलेल्या दिवसाचा विचार करून सरासरी जाहीर करता येईल.
खेरीज, अजून एक विचार - २७ तारीख रविवारी असल्याने व तो वीकेन्ड असल्यामुळे सर्वांना त्याच दिवशी रेटा द्यायला पुरेसा वेळ मिळेल की नाही सांगता येणार नाही; मात्र त्याऐवजी संपादनेथॉन जर शनिवार-रविवार अशी दोन दिवस चालू ठेवली, तर मात्र एरवी सक्रिय असणाऱ्या सदस्यांकडून चांगला प्रतिसाद लाभू शकेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:५१, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)
संकल्पजी, मी आपला हा संदेश फेसबुकमधील माझ्या पानावर शेअर केला तर दोघांनी पसंती नोंदवली.तर एकूण फूल न फुलाची पाकळी प्रतिसाद मिळेल अशी आशा करावयास हरकत नसावी. तर मग संपादनेथॉन होऊन जाण्यास हरकत नसावी , संपादनेथॉन शब्दही चांगला आहे फक्त आपल्या विवादपटूंनी मुख्यकाम बाजूला ठेवून या शब्दाबद्दल चर्चा करत बसू नये एवढी प्रांजळ अपेक्षा. बाकी आपली सहमती असेल तर सेन्ट्रल नोटीस, मेलिंगलिस्ट इत्यादीतून यास प्रसिद्धी देणे सुरू करता येईल माहितगार १८:३०, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)

संपादनेथॉनेकरता भविष्यातील तारखांचे पूर्वनियोजन करण्यासाठी प्रस्ताव[संपादन]

दिनांक निमित्त मथळा मजकूर
१ जानेवारी ते जानेवारी ३ १ जानेवारी १८४८ भिडे वाड्यात सावित्रीबाई फुल्यांनी मुलींची पहिली शाळा ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती
१५ जानेवारी इंग्रजी विकिपीडियाचा वाढदिवस इंग्रजी विकिपीडियावर आंतरविकि दुवे , इंग्रजी विकिपीडिया ते मराठी विकिपीडिया भाषांतर, इंग्रजी विक्शनरीवर मराठी शब्दांची भर
२ फेब्रुवारी मराठीतील पहिल्या ज्ञानकोशाचे संपादक डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांची जयंती उदाहरण
१९ फेब्रुवारी मराठीतील पहिल्या शब्दकोशाचे करविते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मराठी विकिपीडियावर मराठी शब्द सुचवणी आणि मराठी विक्शनरीवर संपादनेथॉन
२४ फेब्रुवारी युनेस्कोचा जागतिक मातृभाषादिन उदाहरण
२६ फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकरस्मृतीदिन मराठी भाषे शिवायच्या इतर भाषातील शब्दांचे मराठीत लेखन कसे करावे, नविन मराठी पारिभाषिक शब्दांची योजना, सुलभता आणि माहितीचे प्रसारण या संबंधाने चर्चा
२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन उदाहरण
८ मार्च महिला दिवस महिलांकरिता विकिअ‍ॅकेडमी आणि संपादनेथॉन
१४ एप्रील २३ एप्रील २६ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती ते International Day of the Book or World Book Days) is a yearly event on 23 April, organized by UNESCO to promote reading, publishing and copyright.World Intellectual Property Day is observed annually on April 26 उदाहरण
१ मे महाराष्ट्रदिन आणि १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. १ मे २००३ मराठी विकिपीडियाचा वाढदिवस उदाहरण
३ मे The United Nations General Assembly declared 3 May to be World Press Freedom Day मराठीभाषी पत्रकारांकरिता विकिअ‍ॅकेडमी आणि संपादनेथॉन
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी संपादनेथॉन विशेषत: नवागतांना स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा संदेश देण्याची संधी आणि नवागतांना साहाय्य आणि मार्गदर्शन
५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर ५ सप्टेंबर शिक्षक दिन ते युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस विकिबुक्स अथवा दिवाळी अंकावर काम, विकिस्रोतावर युनिकोड टायपींग कॉंपीटिशनची तयारी
९ नव्हेंबर लिगल लिटरसी दिवस कायदा विषयक लेखांवर लेखन
५ डिसेंबर International Volunteer Day (IVD) - (December 5) Human Rights Day is celebrated annually across the world on 10 December.

तिथीनुसार[संपादन]

संत तुकाराम समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर

फेब्रुवारी २७[संपादन]

मागील काही वर्षे आपण हा उपक्रम फेब्रुवारी २७ला राबवला होता. जागतिक मराठी दिन यासाठी उत्तम आहे असे मला वाटते व मी फेब्रुवारी २७ला हा उपक्रम कायम करावा असा प्रस्ताव मांडतो.

अभय नातू (चर्चा) २१:५४, ३१ जानेवारी २०१४ (IST)


संपादनेथॉन २७ फेब्रुवारी २०१६[संपादन]

भारताचा स्वातंत्र्यलढा लेख अद्यापही एकोळी राहीला आहे. येत्या मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने भारताचा स्वातंत्र्यलढा आणि वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा वर्गीकरणातील लेख सुधारण्याचे आवाहन करून पाहुयात. विद्यार्थ्यांना निबंध आणि स्पर्धापरिक्षांमध्ये चांगला उपयूक्त ठरेल विद्यार्थी वर्ग त्या निमीत्ताने मराठी विकिपीडियाशी अधिक जोडून घेणे सुलभ होईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:१८, २२ फेब्रुवारी २०१६ (IST)