विकिपीडिया:सदर/फेब्रुवारी १, २००६
Jump to navigation
Jump to search
गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा' हे मराठीतील ख्यातनाम कवि, लेखक व समीक्षक आहेत. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना 'अष्टदर्शने' या साहित्यकृतीसाठी जाहीर करण्यात आला. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले.
- आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार रविवार जानेवारी ८, इ.स. २००६ रोजी जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वृत्त समजताच, "पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा सन्मान आहे. आज मी फक्त त्याचे केंद्र झालो आहे", अशा शब्दांत विंदांनी भावना व्यक्त केल्या.