Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/एप्रिल २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्मनीचा राष्ट्रध्वज
जर्मनीचा राष्ट्रध्वज

जर्मनी (जर्मन: , Deutschland)(अधिकृत नाव: जर्मन संघराज्याचे प्रजासत्ताक , Bundesrepublik_Deutschland, जर्मन: , IPA:ˈbʊndəsʁepuˌbliːk ˈdɔʏtʃlant []) हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली.

जर्मानिया हे नाव रोमन लोकांनी र्‍हाइन नदी ते उरल पर्वतांमधील भूभागाला दिले होते. परंतु 'जर्मनी' हे नाव बहुतकरुन इंग्लिशभाषिक किंवा भूतपूर्व ब्रिटिश वसाहतींमधील देशांत वापरले जाते. खुद्द जर्मनीत जर्मन लोक आपल्या देशाचा उल्लेख 'दॉईचलांड' या नावाने करतात.

जर्मनीच्या उत्तरेला उत्तर समुद्र, डेन्मार्क आणि बाल्टिक समुद्र , पूर्वेला पोलंड आणि चेक प्रजासत्ताक , दक्षिणेला ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड आणि पश्चिमेला फ्रान्स, लक्झेंबर्ग, बेल्जियम आणि नेदरलंड आहे. एकूण भूभागापैकी ५३.५% भूभाग शेती व तत्सम उद्योगांसाठी वापरला जातो. जंगलांनी २९.५% भाग व्यापलेला आहे तर १२.३% भागावर नागरी वस्ती आणि रस्ते आहेत. १.८% भाग पाणथळ जमीन व नद्या आणि उर्वरित २.४% भाग नापीक, ओसाड आणि मानवी वापरामुळे दूषित झालेल्या जमिनीने व्यापला आहे.

पुढे वाचा...

  1. ^ मॅक्स मॅन्गोल्ड (सं.), ed. (१९९५). Duden, Aussprachewörterbuch (ड्यूडेन प्रोनन्सिएशन डिक्शनरी) (जर्मन भाषेत) (६ वी आवृत्ती ed.). मॅनहेम: Dudenverlag (Bibliographisches Institut & F.A. Brockhaus AG. pp. २७१, ५३फ. ISBN ३-४११-०४०६६-१ Check |isbn= value: invalid character (सहाय्य).