विकिपीडिया चर्चा:प्रचालक/कामे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्लॉक व अनब्लॉक[संपादन]

  • आयपी अंकपत्ते, तसेच सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे

आयपी अंकपत्ते व सदस्यांना ब्लॉक करताना सदस्याने जर विकिपीडियाच्या मुख्य पानांमध्ये उत्पात केला असेल तर त्याला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय लागलीच ब्लॉक केले जावे पण जर सदस्य चावडीवर वा चर्चा पानावर उत्पात किंवा विकिपीडियाच्या लेखनसंकेताला न धरता लेखन करत असेल तर त्याला आधी तसे न करण्याची किमान एक सूचना देऊन नंतर ब्लॉक केले जावे असे वाटते. -संतोष दहिवळ १९:३५, २० जानेवारी २०१२ (UTC)

आत्तापर्यंत मराठी विकिपीडियावरील ब्लॉक करण्याबद्दलचे धोरण अत्यंत उदार ठेवलेले आहे. उत्पात, गोंधळ करणार्‍या सदस्यांविरुद्ध त्यास ब्लॉक करणे हा अगदी शेवटचा उपाय आहे आणि तो तसाच असावा. किरकोळ कारणांवरुन ब्लॉक करणे बरोबर नाही. त्यांना (वर म्हणल्याप्रमाणे) सूचना देणे, मार्गदर्शन करणे, त्यांचे प्रश्न, अडचणी समजावून घेण्यासाठी थेट संपर्क साधणे हे उपाय आधी करणे अत्यावश्यक आहे. दोन-तीन (किंवा अधिक) वेळेस हे करुन काही फरक पडत नाही असे वाटल्यास चावडीवर अशा सदस्याला इशारा देणे आणि त्यानंतरही उपद्रव चालू राहिल्यास इतर सदस्यांच्या किंवा प्रचालकांशी मसलत करुन मगच एखाद्या सदस्यास ब्लॉक केले जावे. असे न केल्यास प्रचालक (हेतू चांगला असला तरीही) मनमानी करीत आहेत असे वाटण्यास कारण होते.
अगदी ब्लॉक करण्यापर्यंत पावले उचलली तरीही अंकपत्ता ब्लॉक करणे हा तर अगदी त्यापलीकडील शिक्षा होते. यात त्या सदस्याची तर नव्हेच तर इतरांचीही गैरसोय होते. अनेकदा कॉर्पोरेट (किंवा इतर ठिकाणी सुद्धा) नेटवर्कवरुन अनेक व्यक्ती अनेक संगणक वापरून एकाच बाह्य अंकपत्ता वापरीत असतात (external IP/gateway address) असा अंकपत्ता अडवल्यास त्या subnetवरील सगळ्याच संगणकांना मराठी विकिपीडिया वापरणे/संपादित करणे अशक्य होते. फक्त निनावी संपादकांवर (इतर उपाय करुन झाल्यावर) ही कारवाई करण्यासाठी अंकपत्ता अडवावा.
अडवताना काही तास अडवावे, जर पुन्हा उपद्रव झाल्यास एखादा दिवस आणि त्यापलीकडेही त्रास देणे सुरू राहिल्यास अनेक दिवस प्रतिबंधन घालावे.
मराठी विकिपीडियावर प्रचालकांनी शक्य तितके hands off रहावे व धोरणात्मक, सकारात्मक बाबतींवर चर्चा, मसलत करुन इतर सदस्यांचे मत घेउन व त्यांना विश्वासात घेउन प्रगती चालू ठेवावी ही विनंती.
मला १००% माहिती आहे की येथील एकही प्रचालक विकिपीडियास आपली खाजगी मालमत्ता समजत नाही आणि जी काही पावले उचलली जातात ती केवळ आपला विकिपीडिया सुरक्षित, अबाधित ठेवण्यासाठीच उचलली जातात याची मला खात्री आहे परंतु असे तडकाफडकी ब्लॉक करण्यासारखी टोकाची प्रतिक्रिया दिल्यास नवीन सदस्यांचा गैरसमज होणे अशक्य नाही आणि जुन्या सदस्यांच्या मनातही प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.
हा विकिपीडिया सगळ्यांचा आहे आणि त्यातून लोकांना वगळण्यापेक्षा त्यांना व त्यांच्या Talentsना कसे सामावून घेता येईल याचाच विचार नेहमी करावा. हा प्रकल्प कायमच inclusive रहावा, exclusive नव्हे याबद्दल आपण इतकी वर्षे महाप्रयत्न केलेल आहेत तेच पुढे चालू ठेवूयात.
माझ्या या मताबद्दल शंका, प्रश्न असल्यास बेधडक विचारावे (येथे किंवा चावडीवर).
अभय नातू १५:३७, २१ जानेवारी २०१२ (UTC)