Jump to content

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा संक्षेप


चित्रांचे प्रताधिकार आणि नेमके वर्गीकरण

[संपादन]

मराठीप्रेमी, तुम्ही मराठी चित्रपटांच्या लेखात, मराठी अभिनेत्यांच्या लेखात चढवलेली चित्रे प्रताधिकारमुक्त(Copyright free) आहेत का? नसतील तर अशी चित्रे मराठी विकिपीडियावर ठेवणे/वापरणे विकिपीडियाच्या मार्गदर्शक धोरणांत बसत नाही (). दुसरी गोष्ट, तुम्ही गंमत जंमत, चित्रपट या लेखाचे वर्गीकरण 'Category:Templates', 'Category:साचे', 'Category:माहितीचौकट साचे' या वर्गांत केले होते; ते चुकीचे होते. कारण, साचा(template) ही फक्त parameters असणारी आणि चौकटीची मांडणी दाखवणारी बाब आहे (; त्यात parameters च्या values लिहिणे अपेक्षित नाही. तुम्ही लिहिलेल्या लेखात 'गंमत जंमत, चित्रपट' चित्रपटाच्या माहितीसंदर्भात values भरल्या होत्या. त्यामुळे तो लेख 'साचा' होऊ शकत नाही. सबब, मी तो लेख 'Category:मराठी चित्रपट नामसूची' मध्ये हलवला आहे.

--संकल्प द्रविड 07:59, 18 जानेवारी 2007 (UTC)

मराठीप्रेमी, मी वर जे लिहिले ते तुमच्या चुका दाखवून द्यायला नव्हे; फक्त ज्या गोष्टी जाणवल्या त्या तुमच्या लक्षात आणून द्यायला. Take it lightly :) तुमच्या-माझ्यासारख्या सदस्यांच्या सहभागातून हा विश्वकोश घडतो आहे, त्यामुळे एकमेकांना वेगवेगळ्या पैलूंबाबत योग्य दिशा दाखवणे, मदत करणे हे काम गृहितच आहे! :)
तुम्ही व्हिसीडीवरून ती चित्रे चढवली असली तर एकदा त्या व्हिसीडीवर आतील सर्व मुद्देमालाचे कॉपीराइट आहेत किंवा कसे याबद्दल खातरजमा करून बघा. तिथे पक्की माहिती मिळाली नाही तर विकिपीडिआ:चावडी येथे तत्संबंधी प्रश्न विचारून बघा; म्हणजे इतर सदस्यांपैकी कोणाला अशा मटेरियलच्या कॉपीराइट संकेतांविषयी माहिती असेल तर चर्चा घडून येईल.
अशोक सराफ यांच्या चित्राबद्दल तुम्हाला ते कॉपीराइटेड चित्र असल्याची खात्री असेल तर मी ते उडवू शकेन. फक्त एकदा तुम्ही बघितलेल्या संकेतस्थळाचा पत्ता सांगा, म्हणजे कदाचित त्या संकेतस्थळ संचालकांना प्रताधिकाराबद्दल विचारून बघता येईल.
बाकी, तुम्ही मराठी चित्रपटविषयक लेखांवर उत्साहाने योगदान देत आहात.. चालू ठेवा. :) तसेच, विकिपीडियावर इतर लेखांवर हळूहळू जमेल तसे चक्कर मारून विकिपीडियाच्या लेखनपद्धती, वर्गीकरण, interwiki links वगैरे गोष्टींशी ओळख करून घ्या.. मजा येईल!
--संकल्प द्रविड 18:46, 18 जानेवारी 2007 (UTC)
मी अशोक सराफ़ या पेजवरुन इमेज delete करु शकले (I hope I am allowed to do this deletion work..correct me if I am wrong)
अगदी अगदी! लेखातील मजकुराचे संपादन (लिखाण, तसेच चित्रे डकवणे/काढून टाकणे, साचे वापरणे), लेखाचे स्थानांतरण या बाबी सर्व सदस्यांना करता येतात. मात्र लेख/संचिका उडवण्याचे काम प्रबंधकांना करता येते.
अशोक सराफ हे चित्र काढून टाकले आहे. परंतु इतर चित्रे मात्र काही दिवसात त्यांच्या प्रताधिकारमुक्ततेविषयी काही माहिती न मिळाल्यास काढून टाकू.
--संकल्प द्रविड 19:23, 18 जानेवारी 2007 (UTC)
तुम्ही सांगितलेले काम झाले आहे - ती चित्रे उडवली आहेत. सॉरी.. माझ्याकडून अंमळ उशीर झाला.
--संकल्प द्रविड 17:52, 21 जानेवारी 2007 (UTC)

लक्ष्मणराव किर्लोस्कर

[संपादन]

श्री. शंतनुराव किर्लोस्कर यांचेवरील लेखात नुकतेच जे त्यांचे म्ह्णून चित्र टाकले गेले, ते त्यांचे वडील व किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे आहे. श्री. शंतनुराव किर्लोस्करांचे चांगले छायाचित्र 'गूगल्' वर "शंतनुराव किर्लोस्कर" म्हणून शोध घेऊन 'इमेजेस्' मधे पाहिल्यास लगेचच मिळते. कृपया जरूर ती सुधारणा ताबडतोब करावी.

त्रूटी निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद.खरेतर.श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि श्री. शंतनुराव किर्लोस्कर या दोघांनीही मराठी उद्योगजगतात अढळ स्थान प्राप्त केले आहे. अर्थात मराठी व्यवसाय विषयक लेखन विकिपीडियावर करण्यास घेतल्यानंतर माझ्या मनात प्राध्यान्याने श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा उल्लेख करणे आले.

खरेतर मला इंटरनेटवर उपलब्ध असलेले .श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि श्री. शंतनुराव किर्लोस्कर दोघांचे कोणतेही छायाचित्र मोकळ्या मनाने विकिपीडियात वापरता येते नाही आहे.कारण सध्या ती कॉपीराईट असलेल्या संकेत स्थळावर आहेत.

श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि श्री. शंतनुराव किर्लोस्कर दोघांच्याही छायाचित्रांचा खरेतर सकारात्मकच उपयोग होणार आहे.त्यांच्या चित्रांवर कॉपीराईट त्यांच्या वंशजांनी जाणीवपूर्वक चालू ठेवलाही नसेल पण त्यांची चित्रे विकिपीडियावर वापरणे सध्या कठीण जात आहे.

किरोस्कर ग्रूपच्या एका एमेल आय़डीवर अतूल किर्लोस्करांच्या नावे प्रताधिकार मुक्ति करण्याचे विनंती इमेल पाठवले पण अद्यापतरी प्रतिसादाच्या प्रतिक्षेतच आहे. किर्लोस्कर कुटूंबियांपैकी कुणाच्या वाचण्यात हि विनंती येवो आणि त्यांना श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि श्री. शंतनुराव किर्लोस्कर दोघांची छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करण्याची इच्छा होवो म्हणून प्रतिक्षेत आहे.

आपण लेखाकडे लक्ष देणे आणि त्रूटी उधॄत करणे या बद्दल धन्यवाद

Mahitgar ०६:५०, १५ ऑगस्ट २००९ (UTC)

चित्रांविषयी

[संपादन]
चित्र:Kasaba.jpg
कसबा गणापती

नमस्कार स्नेहल,
तुम्हाला लेखात चित्र टाकायचे असल्यास [[चित्र:Kasaba.jpg|thumb|right|कसबा गणपती]] असे लिहावे (gallery वापरू नये). यामुळे शेजारी दिसते तसे चित्र दिसेल. कृपया चित्रे चढविण्यापूर्वी त्यांचे प्रताधिकार काय आहेत हे पाहावे. विकिपीडियावर फक्त मुक्त प्रताधिकार असलेली चित्रे चढवावीत. अधिक महितीसाठी पाहा. ---- कोल्हापुरी ०९:३६, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)

चुकांबद्दल काळजी नसावी. नवीन लोकांना मदतीसाठी विकिकर नेहमीच तत्पर असतात. फक्त तुम्ही येथे नियमीत योगदान करत रहा.---- कोल्हापुरी ११:०१, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)

चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल माहिती हवी आहे

[संपादन]

नमस्कार!

आपण मराठी विकिपीडियावर चढवलेली चित्रे पाहिली. या चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल (कॉपीराइटांबद्दल) आपण त्या-त्या ठिकाणी माहिती पुरवलेली दिसत नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत प्रकल्प असल्याने प्रताधिकाराबद्दल यथायोग्य पडताळणी करून शक्यतो प्रताधिकारमुक्त चित्रे चढवावीत. प्रताधिकारित (कॉपीरायटेड) चित्रे काही प्रसंगी 'Fair use' तत्त्वावर च्हालू शकतात, परंतु त्याचे समर्थन तुम्हांला मांडावे लागते.
कृपया याबद्दल अधिक माहिती पुरवा, म्हणजे या संचिका ठेवव्यात की काढाव्यात, ठेवल्यास प्रताधिकारविषयक माहिती व वर्गीकरण कसे करावे याबद्दल ठरवता येईल.

प्रताधिकारांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथील संबंधित लेख कृपया नजरेखालून घाला.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:४९, २४ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार, वेळ आपल्या सवडीनुसारच द्यावा , वर आधी म्हणल्या प्रमाणे एका व्यक्तिवर आणि व्यक्तिगत जीवनावर आपल्याला ताण पडून नको आहे.अधीक लोकांना कस सामिल करून घेता येईल हे बघावयास हवे या संदर्भाने आपण पुढे चर्चा करत राहूच. मी खाली काही विचार मांडत आहे त्यामुळे आपल्याला कल्पना देतानाच माझेही विचार क्रिस्टलाईज होण्यास मदत होईल असा उद्देश आहे.
आपण चढवलेल्या चित्रांसोबत डिजीटल कॅमेराने दिलेले डिटेल पण आले आहेत त्यावरून बहूतेक सर्व चित्रे आपली स्वतःची आहेत असे वाटते. चित्रे आपली स्वतःची आहेत आणि आपण प्रताधिकारमुक्त copyright free स्वरूपात ऊपलब्ध करून देत अहात, किंवा ज्या स्रोतातून घेतली आहेत तो स्रोत नमुद करून तो प्रताधिकार मुक्त असल्याचे स्पष्ट नोंद करत गेल्यास येथील विकिसंस्कृतीस बरे पडेल.
सोबत आपण चढबवलेल्या चित्रसंचिकाचे वर्गिकरण कसे व्हावे हे नमुद केल्यास अथवा वर्गीकरणही करून घेतल्यास इतर काही लेखात कुणाला चित्रे पुन्हा वापरावीत असे वाटले तर अधीक सहज शोधता येतील.
वनस्पती लेखांचीसुद्धा वर्गीकरणे कशी असावीत या बद्दल वर्ग चर्चा:विकिपीडिया वनस्पती येथील वर्ग:विकिपीडिया वनस्पती चर्चेतही आपल्या मार्गदर्शनाचे स्वागत असेल.
विकिपीडिया:वनस्पती/लेखात काय काय असावे पानाचे भाषांतरात प्राधान्याने सहभागाची आवश्यकता आहे म्हणजे महा विद्यालयीन विद्यार्थ्यांना येथे सहभागी होणे कदाचीत अधीक सोपे पडेल आणि आपले काही वनस्पती क्षेत्रातील विद्यार्थी आपल्या या विक्शनरी सहप्रकल्पातील वनस्पतीशास्त्र विषयक इंग्रजी -मराठी वनस्पतिशास्त्रीय परिभाषा भरण्यात आघारकर रिसर्चच्या गाडगीळसरांना सहाय्यकरू शकतील तर स्वागत आहे.
अजून काही गोष्टी आहेत पण एकदम सगळे कळवून गोंधळवून टाकू इच्छित नाही. आपल्या अमूल्य सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

माहितगार ०६:१६, २४ डिसेंबर २००९ (UTC)


आपली छायाचित्र पाने तुमची तुम्हालाही पुर्नसंपादीत करता येतील {{क्रिकॉमन्स}} कोणत्याही पानात लावल्या नंतर कसा दिसेल ते खाली दर्शवतो आहे.त्याचे सध्याचे रूप सदस्यपानावर लावण्याच्या दृष्टीने अधीक योग्य वाटते. साचातील सध्याची भाषा अनुरूप न वाटल्यास पर्यायी वाक्य सुचवावे तसा साचा मीही तुम्हाला बनवून देईन.माहितगार ०५:२०, २५ डिसेंबर २००९ (UTC)
सर्व क्रिएटीव कॉमन्स परवाना
मी माझे सर्व योगदान ग्नु जीएफडीएल , क्रिएटीव कॉमन्स परवाने sa v1.0, v2.0, nd v2.0, nc v2.0, nc-nd v2.0, nc-sa v2.0, आणि sa v2.0. या परवान्याअंतर्गत प्रकाशीत करत आहे. कृपया इतर संपादक असे करतलीच असे नाही याची नोंद घ्यावी. आपणांस जर माझे योगदान पर्यायी परवान्याअंतर्गत वापरायचे असल्यास कृपया क्रिएटीव कॉमन्स दुहेरी परवानाअनेक परवाने संबंधीची पाने पहा.


उ. चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल

[संपादन]

नमस्कार अमित! सर्वप्रथम चित्रे चढवण्याबद्दल :

  1. जर मराठी, इंग्लिश किंवा त्यांहून अधिक भाषिक विकिपीडियांवर चित्रे वापरायची असतील (म्हणजे केवळ मराठी किंवा केवळ इंग्लिश विकिपीडियावरच चित्रे वापरायचा मर्यादित इरादा नसेल), तर चित्रे विकिमीडिया कॉमन्स या सामायिक संचिका-डेटाबेसात चढवावीत. 'विकिमीडिया कॉमन्स' या सामायिक डेटाबेसाबद्दल सारांशाने माहिती इथे इंग्लिशीत] उपलब्ध आहे.
  2. 'विकिमीडिया कॉमन्स' किंवा कुठल्याही भाषिक विकिपीडियावर चित्रे चढवताना चित्राचा मूळ चित्रकार/ प्रकाशचित्रकार (= फोटोग्राफर) कोण, ते नमूद करावे. तसेच चित्राचे प्रताधिकार स्वतःकडे किंवा सार्वजनिक डोमेन (पब्लिक डोमेन) असल्याशिवाय चित्रे चढवू नयेत. प्रताधिकारविषयक आचारसंहितेविषयी अधिक माहिती कॉमन्स:(प्रताधिकारविषयक) परवान्याची निवडकॉमन्स:(प्रताधिकारविषयक) परवाना जारी करण्याबद्दल या पानांवर इंग्लिशीत नोंदवली आहे.

दुसरा मुद्दा ग्राह्य / अग्राह्य स्रोतांबद्दल :

  1. जी चित्रे / प्रकाशचित्रे आपण स्वतः काढलेली काढलेली आहेत आणि प्रताधिकारविषयक उपलब्ध परवान्यांमधून एका परवान्यांतर्गत ज्यांचे प्रताधिकार आपल्याला खुले (= मुक्त) करायचे असतील, अशी चित्रे चढवण्यास पात्र ठरतात.
  2. जी चित्रे अगोदरच सार्वजनिक वापरासाठी प्रताधिकारमुक्त म्हणून घोषित केली गेली आहेत, अशी चित्रे किंवा त्यांत थोडे फेरफार करून बनवलेली आधारित चित्रे चढवण्यास पात्र ठरतात.
  3. जी चित्रे एखाद्या प्रताधिकारित माध्यमात / प्रसारमाध्यमात (पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके/मासिके/वार्षिक अंक/दिवाळी अंक, व्हिडिओ सीड्या/ डीव्हीड्या / कॅसेट, ध्वनिफिती / ऑडिओ कॅसेट, कॅसेट/सीडी/डीव्हीडी यांच्या वेष्टणांवरील चित्रे) अगोदरच प्रकाशित झाली आहेत, अशी चित्रे बहुश: प्रताधिकारित (कॉपीरायटेड) असल्यामुळे विकिपीडिया/ विकिमीडिया कॉमन्स येथे चढवण्यास पात्र ठरत नाहीत. मात्र, जर मूळ प्रताधिकार बाळगणार्‍या व्यक्तीने/ निर्मात्याने/ कंपनीने विशिष्ट चित्राच्या वापरासाठी लेखी/ ईमेल अनुमतिपत्र देऊन प्रताधिकार खुले करण्यास परवानगी दिली, तर ते विशिष्ट चित्र चढवण्यास पात्र ठरू शकते.

अजून काही शंका असल्यास, जरूर विचारा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३६, २८ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार अमित! तुम्ही काही वृत्तपत्रे/पुस्तके/नियतकालिके इत्यादी माध्यमांतून काही चित्रे स्कॅन करून/फोटो काढून विकिपीडियावर चढवल्याचे पाहिले. परंतु उपरोक्त प्रताधिकारविषयक बाबींमुळे ही चित्रे प्रताधिकारित ठरतात, असे दिसते. तुमच्याकडे या संदर्भात लेखी/ईमेल अनुमतिपत्र असल्यास, ते त्या-त्या संचिकेच्या पानावर नोंदवा किंवा 'Fair-use' तत्त्वांतर्गत प्रताधिकारित गोष्ट वापरायची असल्यास त्याचे समर्थन त्या-त्या संचिकेच्या पानावर मांडा. अन्यथा या संचिका काढाव्या लागतील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:५६, २९ डिसेंबर २००९ (UTC)
नमस्कार अमित! घाई अजिबात नाहीये; फक्त ही गोष्ट ध्यानात असू द्या, म्हणजे झाले. दरम्यान, मी काल विकिमीडिया कॉमन्स या सामायिक संचिका विदागाराबद्दल (डेटाबेसाबद्दल) लिहिले होते; ते संकेतस्थळ जरूर पाहा. तुम्ही चित्रे तिथे चढवलीत, तर मराठी, इंग्लिश व अन्य सर्व भाषिक विकिपीडियांमधून ती वापरता येतील.
अजून एक गोष्ट : संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्यास, चढवते वेळीच संचिकेचे वर्गीकरण वर्ग:संचिका या वर्गात किंवा त्यातील उपवर्गांत करत चला. प्रताधिकारित संचिकांसाठी वर्ग:प्रताधिकारित संचिका असा वर्ग वापरा - म्हणजे ज्या प्रताधिकारित चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल परवानग्या मिळवण्याचे काम चालू आहे, अशीही चित्रे एका ठिकाणी सापडतील; आणि परवानग्या न मिळाल्यास त्या-त्या संचिका काढून टाकणे सोपे जाईल.
तुमचा मराठी विकीवरील उत्साहवर्धक वावर चालू ठेवा. धन्यवाद!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:३३, २९ डिसेंबर २००९ (UTC)

प्रताधिकार बाबतची सूचना

[संपादन]
संचिका चढवा येथे गेल्यानंतर सध्या प्रताधिकारीत चित्रे न चढवण्याबद्दल सूचना अंतर्भूत केलेली दिसत नाही .

"इतर संकेतस्थळांवरचा मजकूर परवानगीशिवाय येथे जसाचातसा उतरवू नये. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येइल" हि सध्याची सूचना प्रताधिकाराबाबत्ची भूमिका पुरेशी सुस्प्ष्ट मांडते आहे असे वाटत नाही. सुचवणीचा सवडीने आंतर्भाव केलात तरी चालेल कृपया नोंद घ्यावी माहितगार ०७:३२, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)

विकिपीडियावर चित्रे चढवण्याबद्दल

[संपादन]

नमस्कार गिरीश,

आपण नुकतीच चढवलेली चित्र:Prabodhankar.jpg ही संचिका पाहिली. या चित्राच्या प्रताधिकारांबद्दल (कॉपीराइटांबद्दल) आपण त्या-त्या ठिकाणी माहिती पुरवलेली दिसत नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत प्रकल्प असल्याने प्रताधिकाराबद्दल यथायोग्य पडताळणी करून शक्यतो प्रताधिकारमुक्त चित्रे चढवावीत. प्रताधिकारित (कॉपीरायटेड) चित्रे काही प्रसंगी 'Fair use' तत्त्वावर चालू शकतात, परंतु त्याचे समर्थन तुम्हांला संचिकेच्या पानावर मांडावे लागते.
कृपया याबद्दल अधिक माहिती पुरवा; जेणकरून ती संचिका ठेवावी की काढावी, ठेवल्यास प्रताधिकारविषयक माहिती व वर्गीकरण कसे करावे, यांबद्दल ठरवता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५६, १६ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार गिरीश,
आपण नुकतीच काही चित्रांच्या स्रोतांसंबंधी माहिती त्या-त्या संचिकांमध्ये भरल्याचे पाहिले. त्यातील बहुतांश चित्रे आपण अन्य कुठल्यातरी संस्थळावरून मिळवल्याचे व तेथे कोणतीही प्रताधिकार नोटीस नसल्याचे आपले म्हणणेही वाचले. सहसा ही चित्रे ज्या संस्थळांवर होती, त्या संस्थळांवरील सर्व आशयावर (मजकूर, लेख, चित्रे, व्हिडिओ, गाणी, ऍनिमेशने) बहुतांश वेळा त्या-त्या लेखक / कलाकारांचा किंवा प्रकाशक या नात्याने संस्थळाचा प्रताधिकार असतो. काही वेळा कित्येक संस्थळांवरही मूळ लेखक/चित्रकार/प्रकाशचित्रकार यांच्याकडून कसलीही परवानगी न घेता ढापलेला व प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन करून संस्थळावर चढवलेला आशय असतो. त्यामुळे प्रताधिकार नोटीस किंवा स्पष्टपणे प्रताधिकारविषयक जाहीर प्रकटन नसलेल्या संस्थळांवर / ब्लॉगांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडील चित्रे आपल्या विकिपीडियावर चढवू नयेत. जर आपल्याला मूळ लेखक / चित्रकार / प्रकाशचित्रकार यांच्याकडून थेट परवानगी मिळाली असेल (लेखी किंवा ईमेलावर) किंवा जर आपण स्वतःच काढलेले चित्र/फोटो असेल किंवा जर चित्राचे/प्रकाशचित्राचे कायदेशीररित्या प्रताधिकार बाळगणार्‍या प्रकाशकांकडून / संस्थळांकडून आपल्याला लेखी/ ईमेलावर परवानगी मिळाली असेल, तर अशी चित्रे प्रताधिकारमुक्त म्हणून विकिपीडियावर वापरावीत. यांहून इतर चित्रे ही (डीफॉल्ट) प्रताधिकारित समजावीत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:०७, १८ डिसेंबर २००९ (UTC)

टपाल तिकिटांवरील प्रताधिकारांबद्दल

[संपादन]

नमस्कार गिरीश!

आपण काही टपालतिकिटांची चित्रे चढवल्याचे पाहिले. परंतु विकिमीडिया कॉमन्स संस्थळावरील (विकिमीडिया = विकिपीडियाचे पालक संकेतस्थळ) या वर्णनानुसार भारतीय टपालतिकिटांची चित्रे खालील परिस्थितीमध्ये प्रताधिकारमुक्त समजली जातात :

  1. ६० वर्षांहून जुनी भारतीय टपालतिकिटे (म्हणजे इ.स. २००९ सालात इ.स. १९४९ सालापूर्वीची तिकिटे) प्रताधिकारमुक्त मानली जातात.
  2. टपालतिकिटांविषयी एखादे प्रकाशन (पुस्तक इ.) किंवा लेख असल्यास, टपालतिकिटांचे कृष्णधवल चित्र चालू शकते. (याचा अर्थ : अन्य विषयांसाठी, उद., विकिपीडियावरील व्यक्तिविषयक लेख सजवायला तिकिटांची चित्रे वापरू नयेत. टपालतिकिटांविषयी विकिपीडियावरील लेखात तिकिटांची कृष्णधवल चित्रेच चालू शकतील; रंगीत नाहीत.) तिकितांची रंगीत चित्रे वापरण्यासाठी टपाल खात्याच्या जनरल डायरेक्टरांची (लेखी) अनुमती मिळवावी लागेल.

त्यामुळे सहसा अशी चित्रे व्यक्तिपर लेखांसाठी वापरू नयेत, असा निष्कर्ष काढता येतो. तूर्तास मी तुम्ही आज चढवलेली चित्रे 'प्रताधिकारित संचिका' वर्गात वर्ग केली आहेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:४५, १८ डिसेंबर २००९ (UTC)


प्रताधिकारांबद्दल अधिक

[संपादन]
नमस्कार,
जिथे कॉपीराईटचा आणि लेखकाचे नाव मेंशन नसते त्या स्थितीत प्रकाशन तारखे पासून ६०वर्षे प्रताधिकार लागू रहातो. जर कॉपीराईट होल्डर (बहुतेक बाबतीत लेखक किंवा छायाचित्रकार) च्या मृत्यूपासून ६०वर्षे कॉपीराईट लागू रहातो.
गेल्या दशकभरात भारतात कॉपीराईट कायद्यात खूप कदक असे बदल घेडवले गेले.सामान्य लोकांना त्या बद्दल खूप कमी एज्यूकेट केले गेले आहे त्यामुळे कॉपीराईट्सचे सर्रास उल्लंघन होते.
विकिपीडियावर आपल्याला याबाबत अधिक सजगतेची आवश्यकता याकरिता आहे कि येथील माहिती इतरत्र प्रकाशकांना प्रकाशनाकरिता मुक्त्स्वरूपात उपलब्ध करून देताना त्यात अनवधानाने प्रताधिकारयूक्त माहिती शक्यतोवर रहाणार नाही याची कालजी घेतलेली बरी.
जिथे कॉपीराईट फ्री असल्याचे नमुदकेलेले नाही त्या बाबतीत शक्यतोवर छायाचित्रांचे आणि बाकी माहितीचे बाह्य दुवे द्यावेत हे अधिक श्रेयस्कर ठरते.
या संदर्भाने अधीक माहितीकरिता विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प अभ्यासावा
माहितगार ०५:४४, १८ डिसेंबर २००९ (UTC)
ता.क. विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे प्रकल्पही सवडीने पहावा.माहितगार १०:०६, १८ डिसेंबर २००९ (UTC)

प्रताधिकार?

[संपादन]

आपण वर्ग:फुले पानावर वापरलेले चित्र:Flower structure.gif सकृतदर्शनी प्रताधिकारीत दिसते आहे. ते copy right free स्वरूपात उपलब्ध असल्यास त्या बद्दलचा संदर्भ लवकरात लवकर उपलब्ध करावा अथवा ते अनवधानाने वापरले असल्यास येथून वगळण्या करिता विकिपीडिया:प्रचालक यांना विनंती करावी.

प्रताधिकार रहीत चित्रे विकिपीडिया commons:वर विपूल प्रमाणावर उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करण्याबद्दलही विचार करावा. प्रिय विकिसदस्य,

विषयः प्रताधिकार संदर्भात

आपले मराठी विकिपीडियावरील योगदानाचा प्रयत्नाचे हार्दीक स्वागत आहे.आपल्या लेखनाचे प्राथमीक आवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.

आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रिकरून घेणे उचित ठरते.

साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते महाराष्ट्र साहीत्य परिषद टिळकरोड पुणे येथे उपलब्ध होणे संभवते.

आपण प्रताधिकार बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती इतरत्र स्थानांतरीत करू शकता.आपली स्वतःची खात्री होई पर्यंत {{साचा:स्थानांतरीत१}} हा साचा तेथे लावावा.प्रताधिकार विषयक आपली खात्रि झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून ती आपण पुन्हा वापस मिळवू शकता.

आपले प्रताधिकार विषया संदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडीयेथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.


आपले विनीत,

साहाय्य चमू

योगासनविषयक लेखांमधील चित्रांबद्दल

[संपादन]

नरसीकर, मी DrYogita यांनी काही योगासनांच्या लेखांत वापरलेली चित्रे तपासली. ती सर्व चित्रे 'विकिमीडिया कॉमन्स' या संस्थळावरील आहेत (तुम्ही प्रत्येक चित्र मराठी विकिपीडियातून उघडले, तर त्यात पुढीलप्रमाणे एक संदेश दिसतो : 'This file is from Wikimedia Commons and may be used by other projects. The description on its file description page there is shown below' . असा संदेश ज्या संचिकांवर दिसतो, त्या सर्व संचिका विकिकॉमन्सात चढवलेल्या असतात.)
विकिकॉमन्स संकेतस्थळ मराठी विकिपीडियाच्या अंतर्गत येत नाही. विकिकॉमन्स येथील प्रचालक व सक्रिय सदस्य तेथील चित्रांची पडताळणी करत असतातच (ही चित्रे बहुधा त्यांनी तपासली असावीत). खेरीज, या चित्रांवर संबंधित संकेतस्थळाने 'ग्नू जीएफडीएल' परवान्यांतर्गत प्रताधिकार मुक्त केले असल्याची नोंद आहे; तीही लक्षात घ्यायला हवी.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:११, ३१ डिसेंबर २००९ (UTC)

फोटो

[संपादन]

इथे फोटो कसे आणावेत ?

नमस्कार,
फोटो येथे डावीकडील पेटीमध्ये संचिका चढवा दुव्यावर टिचकी द्या व नंतरच्या सूचना पाहून तसेतसे करा.
आठवण करून देतो की विकिपीडियाच्या नियमांनुसार आपण चढवलेले फोटो प्रताधिकारमुक्त असले पाहिजेत तसेच चढवल्यावर आपला प्रताधिकार या फोटोंवर राहणार नाही.
एखादा लेख वगळायचा असल्यास त्यावर {{delete}} असेल लिहावे. प्रचालकांपैकी कोणीतरी तो लेख एकदा नजरेखालून घालून वगळेल.
अभय नातू १५:३४, २५ एप्रिल २००८ (UTC)

संचिका चढवण्यास परवानगीची खरेतर आवश्यकता नाही. तरी मी एकदा तपासून बघतो.

अभय नातू ०४:२३, २६ एप्रिल २००८ (UTC)

तुम्ही २९ एप्रिल पासून संचिका चढवू शकाल. कारण या विकिमध्ये नोंदणी केल्यानंतर ४ दिवस संचिका चढविता येत नाहीत. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:५२, २६ एप्रिल २००८ (UTC)

प्रताधिकारित चित्रे

[संपादन]

निमिष, आपण चित्रपटांच्या पोस्टरांची काही चित्रे चढवलीत ते पाहिले. परंतु, ती चित्रे प्रताधिकारित असावीत अशी दाट शक्यता मला वाटते. विकिपीडियावर प्रताधिकारित चित्रे वापरू नयेत असे धोरण आहे. प्रताधिकारित चित्रांच्या मालकाकडून जर छोट्या आकारमानातील चित्र वापरायची परवानगी मिळाली तरच असे चित्र विकिपीडियावर चढवावे. उदा.: वळू चित्रपटाचे पोस्टर प्रताधिकारी मालकाच्या पूर्वपरवानगीने चढवले आहे. तश्या परवानग्या तुम्ही नुकत्याच चढवलेल्या चित्रांबद्दल मिळवू शकाल काय? किंवा ही चित्रे प्रताधिकारित असूनही छोट्या आकारमानामुळे/ अन्य कारणांमुळे तुम्ही प्रताधिकारकायद्याचा भंग करत नाही याचे समर्थन लिहावे लागेल. तसे करता आले तर उत्तम, अन्यथा ही चित्रे उडवण्याबाबत विचार करावा लागेल.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०१:५१, १० जुलै २००८ (UTC)

प्रताधिकार?

[संपादन]

या लेखातील चित्रे, प्रकाशित साहित्यातील मजकूर इत्यादी बाबी प्रताधिकार-नियमांत बसत नसावीत असे दिसते. योगदान देणार्‍या सदस्यांनी कृपया येथे प्रताधिकारांबद्दल माहिती नोंदवावी, म्हणजे लेखातील कोणता मजकूर/चित्रे ठेवावीत व कोणती उडवावीत, हे ठरवता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:०१, २९ डिसेंबर २००९ (UTC)

श्रीराम लागू व अशोक सराफ यांच्या चित्रांबद्दल

[संपादन]

सुभाष, तुम्ही श्रीराम लागूअशोक सराफ या लेखांमध्ये दोन नवीन छायाचित्रे वापरली आहेत असे दिसले; तसेच त्या दोन्ही चित्रांच्या संचिका तुम्हीच चढवल्यात असे दिसले. ती दोन्ही चित्रे तुम्हाला कुठून मिळाली, व ती 'कॉपीराइट-फ्री' आहेत का? विकिपीडियावर कॉपीराइट-मुक्त चित्रेच वापरायची परवानगी आहे. तुम्ही चढवलेल्या चित्रांचे कॉपीराइट आहेत किंवा नाहीत ते कळवा, म्हणजे त्यानुसार ही चित्रे वापरायची किंवा उडवायची हे ठरवता येईल.

--संकल्प द्रविड ०८:२८, २७ ऑगस्ट २००७ (UTC)

कॉपीराइट चित्रे

[संपादन]

सुभाष, मी तुम्ही दिलेल्या दुव्यांवरील चित्रे पाहिली. त्यातील श्रीराम लागूंच्या चित्रावर 'संजय पेठे' असे नाव लिहिले आहे, जे व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. तस्चे, अशोक सराफ यांचे चित्र कुठल्याशा छायाचित्रकारानेच काढले असावे. अश्या चित्रांवर स्वतः छायाचित्रकार किंवा त्या वेबसाइटचा प्रताधिकार( = कॉपीराइट) असतो. त्यामुळे ही चित्रे उडवावी लागतील असे मला वाटते.

तसेच, तुम्ही आता किशोर कुमारसचिन देव बर्मन यांची चित्रे प्रताधिकारमुक्त आहेत किंवा मर्यादित प्रताधिकार सवलतीने देऊ केली आहेत हे सांगाल का? म्हणजे त्याप्रमाणे या चित्रांबाबतही निर्णय घेता येईल. अधिक माहितीसाठी इंग्लिश विकिपीडियावरील हे पान वाचा.

बाकी, किशोर कुमार, सचिन देव बर्मन यांच्या लेखांत तुम्ही 'माहितीचौकट अभिनेता' हा साचा वापरलात असे दिसते. खरे तर हे दोघंही जण गायक, संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे संबंधित साचा वापरावा. माझ्या माहितीप्रमाणे 'माहितीचौकट संगीतकार' हा साचा अजून कोणी बनवला नाहीये. मला तुम्ही २-३ दिवस दिलेत तर मी तो बनवून देऊ शकेन. किशोर कुमार यांच्या लेखात गायकाबद्दलचा माहितीचौकट साचा वापरावा असे मी सुचवतो.

--संकल्प द्रविड ०९:१५, ४ सप्टेंबर २००७ (UTC)

Tungi pinnacle Jain Pilgrimage.jpg चित्राबद्दल

[संपादन]

नमस्कार विनोद,

आपण नुकतीच चढवलेली चित्र:Tungi pinnacle Jain Pilgrimage.jpg ही संचिका पाहिली. या चित्राच्या प्रताधिकारांबद्दल (कॉपीराइटांबद्दल) आपण त्या-त्या ठिकाणी माहिती पुरवलेली दिसत नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत प्रकल्प असल्याने प्रताधिकाराबद्दल यथायोग्य पडताळणी करून शक्यतो प्रताधिकारमुक्त चित्रे चढवावीत. प्रताधिकारित (कॉपीरायटेड) चित्रे काही प्रसंगी 'Fair use' तत्त्वावर चालू शकतात, परंतु त्याचे समर्थन तुम्हांला संचिकेच्या पानावर मांडावे लागते.
कृपया याबद्दल अधिक माहिती पुरवा; जेणकरून ती संचिका ठेवावी की काढावी, ठेवल्यास प्रताधिकारविषयक माहिती व वर्गीकरण कसे करावे, यांबद्दल ठरवता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५६, १६ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार विनोद,
आपण चढवलेल्या चित्रांबद्दल प्रताधिकारविषयक (कॉपीराइटविषयक माहिती, उदा.: मूळ छायाचित्रकार, स्रोत, प्रताधिकारहक्क कुणाच्या आधीन आहेत इ.) माहिती पुरवाल काय?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २३:४६, १७ डिसेंबर २००९ (UTC)
माहितीबद्दल धन्यवाद विनोद. ही माहिती खरे तर, त्या-त्या संचिकेच्या पानावर लिहून ठेवलीत, तर खूप बरे होईल. संचिका चढवतानाच, ही माहिती भरली तर चांगले आहेच्ह; परंतु आतादेखील ही माहिती त्या-त्या संचिकेच्या पानावर जाऊन तुम्हांला लिहिता येईल.
दुसरी गोष्ट म्हणजे, दाभोळकरांच्या संकेतस्थळावरील चित्र प्रताधिकारित असायची शक्यता आहे; कारण सहसा संकेतस्थळांवरील चित्रे, स्पष्टपणे 'प्रताधिकारमुक्त' (कॉपीराइट-फ्री) असे तेथे लिहिले नसल्यास, त्या-त्या संकेतस्थळांची किंवा मूळ चित्रकारांची प्रताधिकारित मालमत्ता समजली जाते. त्यामुळे सहसा संकेतस्थळांवरील चित्रे, त्यांवर बहुतांश वेळा प्रताधिकार असल्यामुळे, विकिपीडियावर चढवली जात नाहीत.
दाभोळकरांच्या चित्राबद्दल आणि तुम्ही चढवलेल्या अन्य चित्रांबद्दल संबंधित माहिती त्या-त्या संचिकेच्या पानावर लिहिलीत, तर वर्गीकरणाचे काम सोपे होईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:२७, १८ डिसेंबर २००९ (UTC)

जालावरील फोटो आहे

[संपादन]
जालावरील चित्र्/छायाचित्रे प्रताधिकारीत असण्याची शक्यता असते,प्रताधिकारीत नासल्याची खात्री नसल्यास विकिपीडियावर घेणे टाळावे. प्रताधिकार नसलेले छायाचित्र उपलब्ध नसल्यास कॉमन्स वर शोधघ्यावा. तीथेपण उपलब्ध न झाल्यास बाह्यदुवा देणे अधीक चांगले.

अधीक माहितीकरिता विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प तसेच विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे पहावा. माहितगार ०७:२१, २१ डिसेंबर २००९ (UTC)

Sarasvati.png
इंग्रजी विकिपीडियातील en:Saraswati River या लेखात [[चित्र:Sarasvati.png|इवलेसे|डावे|Sarasvati.png]] हे चित्र वापरले आहे.commons:Category:Maps of rivers of India नद्यांच्या पात्राबाबतीत नासाची जालावरची चित्र् वापरता येतील सहसा ती प्रताधिकारमुक्त असतात. काही वेळा अशी तत्सम प्रताधिकारमुक्त् छायाचित्रे घेऊन पेंटब्रश मध्ये हवे तसे बदल करूनही चढवली जातात.
गेल्या वर्षाभरात मी अहमादमध्ये visit वर असताना times of India त एक स्टोरी वाचल्याची आठवते बहूधा ईस्रोच्या संशोधकाने उपग्रह छायाचित्रांच्या आधारे मांडलेले तर्क मला तर्कनिष्ठ वाटल्याचे स्मरते.



माहितगार १२:४५, २१ डिसेंबर २००९ (UTC)

ऊपक्रम पाहिले आहे. पण विकितून बाहेरपडून तीकडे पुरेसा वेळ देणे होत नाही माहितगार १३:३८, २१ डिसेंबर २००९ (UTC)

छायाचित्र मीत्राने किंवा परिचित व्यक्तिने काढले आहे

[संपादन]

कृपया मित्रांनी परिचित व्यक्तिनेच नव्हे तर अगदी तुमच्या आई किंवा वडीलांनी काढलेले चित्र किंवा छायाचित्रसुद्धा त्यांच्या लेखी प्रताधिकारमुक्ती परवानगीनेच चढवावीत. जर अशी मूळ छायाचित्रणकरणअरी परिचयातील व्यक्ति हयात नसेल तर अधिकृत वारसाच्या प्रताधिकारमुक्ती परवानगीनेच चढवावीत. माहितगार ०६:४५, १३ जानेवारी २०१० (UTC)