विकिपीडिया:कारण
लघुपथ: विपी:सआ, विपी:सहाय्य, विपी:आशय, विपी:सआशय
लेख/पाने वगळली जाण्याची सर्वसाधारण कारणे
सर्व साधारणता नवख्या व्यक्तींना विकिपीडिया व तिच्या सहप्रकल्पांच्या परिघाची आणि मर्यादांची, विवीध लेखन संकेतांची पुरेशी कल्पना नसल्यामुळे विश्वकोशीय उल्लेखनीयतेस पात्र नसलेल्या किंवा अदखलपात्र पानांची निर्मिती अथवा लेखन होते, साधारणतः मराठी भाषा आणि भाषिकांच्या दृष्टीने हा प्रकल्प रचनात्मक आणि महत्वपूर्ण असल्यामुळे सहसा कुणी जाणीवपुर्वक उत्पात करत नाही पण तसे घडल्यास, विकिपीडियाचा दर्जा टिकवण्याच्या दृष्टीने अशी पाने वगळणे योग्य ठरते. ही पाने काढू नयेत म्हणून त्या-त्या पानाच्या 'चर्चापाना'वर सदस्यांकडून सूचना आल्या नाहीत, तर ही पान काढण्यास कोणाचीही हरकत नाही असे समजून विकिपीडिया:प्रचालक ही पाने काही काळाने वगळतात. त्यानंतरदेखील कोणाची काही हरकत त्या पानाच्या चर्चापानावर न आल्यास ते पान काढून टाकले जाते. वगळलेली पाने आपण वगळल्याची नोंदयेथे पाहू शकता.
सर्वसाधारणपणे निम्नलिखित कारणांनी पाने वगळली जातात:
- अमराठी शीर्षक (मजकूर योग्य असल्यास शक्य तेथे पानाचे योग्य शीर्षकाखाली स्थानांतरण करण्यात येते)
- अप्रमाणित शीर्षक/संकेतास धरून नसलेले शीर्षक(मजकूर योग्य असल्यास शक्य तेथे पानाचे योग्य शीर्षकाखाली स्थानांतरण करण्यात येते)
- शीर्षकात अशुद्ध लेखन(मजकूर योग्य असल्यास शक्य तेथे पानाचे योग्य शीर्षकाखाली स्थानांतरण करण्यात येते)
- जाणीवपूर्वक केलेले अप्रस्तुत संपादन/लेखन (Spaming/उत्पातVandalism)
- संपादन किंवा लेखन प्रताधिकारमुक्त नसलेले लेखन आहे असे सिद्ध होत असल्यास
- अनावश्यक लेख
- (या कारणाने वगळल्या जाणार्या लेखांच्या वगळण्याबद्दल पुरेशी माहिती घेऊन जोडलेली पाने तपासण्यासाठी पुरेसा कालावधी देण्याची काळजी घेणे प्रबंधकांना अपेक्षित आहे)
- आधीचे पान वगळून स्थानांतर केले
- लेखवगळण्यापूर्वी येथे काय जोडले आहे ते पान तपासून सर्व संबधित पानांत योग्य बदल घडवून मगच लेख/पान वगळले जाईल याची दक्षता घ्यावी
- अवैश्वकोशीय मजकूर
लेख/पाने वगळण्याची प्रक्रीया
हे पान {{पान काढायची विनंती }}येथे अथवा {{पान विलीनीकरण विनंती}}येथे जोडले आहे. हा साचे {{पान काढायची विनंती}} असे लिहून संबधित वगळणे योग्य पानांवर लावता येतात;अथवा {{पान विलीनीकरण विनंती}}.
मराठी विकिपीडियातील स्वयंसेवी सदस्य पहारा आणि गस्त देत असतात.त्यांनी मराठी विकिवरून काढायची विनंती केलेली पाने वर्ग:लवकर वगळावे विनंत्या या वर्गीकरणाने वर्गीकृत होतात.
आपण प्रथमतःच येथे संपादन प्रयत्न करत असल्यास विकिपीडिया काय आहे आणि विकिपीडिया काय नाही आहे हे समजावून घ्या. आपल्याला उदाहरणादाखल प्रायोगिक संपादन करून पहावयचे असल्यास धूळपाटी येथे संपादन करून प्रात्यक्षिक करून पहा.नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन त्रुटी आणि विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा हे लेख अभ्यासू शकल्यास उत्तमच.
दक्षता
लेखन वगळण्यापूर्वी संपादक व प्रबंधकांनी घ्यावयाची काळजी :
- लेख वगळण्याची विनंती करताना संपादकांनी शक्यतो व्यवस्थित कारण लिहावे. प्रथमच संपादन करणार्यांना येथील लेख वगळण्याची निर्णयप्रक्रिया अनपेक्षित वाटणार नाही, याची काळजी घ्यावी.
- एखादी नवखी व्यक्ती मराठीभाषक असूनही अजाणतेपणाने संपादन करत आहे असे आढळल्यास संपादक व प्रबंधकांनी {{Fasthelp}}, {{Fastfonthelp}}, {{Fonthelp}} हे साचे अशा नवख्या व्यक्तीच्या चर्चापानावर आवर्जून लावावेत.
- प्रबंधकांनी स्पॅमिंग सदृश लेखाव्यतिरिक्त, इतर प्रकारचा लेख वगळताना चर्चेची संधी देण्याकरिता पुरेसा कालावधी देऊन मगच लेख वगळावा.
- लेख वगळण्यापूर्वी तेथे कायकाय जोडले आहे हे तपासून सर्व संबधित पानांत योग्य ते बदल घडवून मगच लेख/पान वगळले जाईल याची दक्षता घ्यावी.
विकिपीडिया लेख कसे असू नयेत
- विकिपीडियातील लेख अर्थातच एकांगी नसावा.
- विकिपीडियातील लेख छापील ज्ञानकोशाप्रमाणे स्थायी नसावा सतत योग्य बदल करणे अपेक्षित असते.
- विकिपीडियातील लेख हा शब्दकोश नाही. शब्दकोशात असते त्यापेक्षा अधिक सखोल, अधिक विस्तृत व मुद्देसूद माहितीचे संकलन होणे अपेक्षित आहे. मराठी शब्दकोश [१] आहे.
- विकिपीडिया लेख हे मूळ संशोधन किंवा पहिलेच संशोधन असणे अपेक्षित नाही. येथे आधी झालेल्या इतरांच्या विचारांचा माहितीचा किंवा संशोधनाचा, लेखनाचा संदर्भ आधार देणे व मागोवा घेणे अपेक्षित आहे, त्यामुळे नवीन विचार पहिल्य़ांदाच मांडण्याकरिता हे व्यासपीठ वापरू नये.
- विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित माहितीची योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
- विकिपीडियातील लेख हे केवळ अंतर्गत किंवा बहिर्गत संकेतस्थळांचे संकलन किंवा पुर्ननिर्माणही नाही.
- विकिपीडियातील लेख धर्मादाय, व्यापारी वा व्यक्तिगत आस्थापनांचे संकेतस्थळ नाही. ब्लॉग नाही. केवळ सामाजिक संपर्क स्थापित करण्याची जागा नाही.
- विकिपीडियातील लेख हे अंदाधुंद माहिती गोळा करण्याचे ठिकाण नाही.
- नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नांची यादी नाही.
- दूरस्थ संबध असलेल्या विषयांची, किंवा सुविचारांची यादी नाही.
- विकिपीडियातील लेख स्थळांची माहिती देतात पण ते प्रवासवर्णन किंवा प्रवासी ठिकाणाची जाहिरात करत नाहीत.
- आपल्या प्रिय नातेसंबध असलेल्या किंवा वैयक्तिक मित्रांची माहिती देण्याचे, आठवण करण्याचे ठिकाण नाही.
- पहिल्यावाहिल्या माहितीचा स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज़ नाही.
- विकिपीडिया हे व्यक्ती, स्थळे, दूरध्वनी क्रमांक. इत्यादींचा संग्रह, (Yellow Pages) नाही.
- दूरदर्शन किंवा आकाशवाणीची कार्यक्रमपत्रिका नाही.
- चर्चापाने व सदस्यपाने ही प्रबोधनाची, निवेदनांची किंवा जाहिरातींची मुखपृष्ठे (होमपेजेस) नाहीत.
- विकिपीडिया वापरास सुकर करणारे लेख सोडले तर विकिपीडियावरील अन्य लेख हे, एखादी गोष्ट "कशी करावी" हे सांगण्यासाठी नाहीत.
- हा आंतरजाल मार्गदर्शक नाही. लेख ज्ञानकोशाप्रमाणे असावेत.
- हे पाठ्यपुस्तक नाही.
- ललितलेख, कथा, कादंबरी यांबद्दल केवळ ढोबळ कथा व समीक्षण अपेक्षित आहे.
- संकेतस्थळे असंबद्ध, अनपेक्षित ठिकाणी उघडणे अपेक्षित नाही.
- विकिपीडियातील लेख हे भविष्यकालीन घटनांची असंबद्ध किंवा विनाधार यादी नाही.
- विकिपीडिया माहितीच्या आदानप्रदानाला प्रतिबंध करत नाही. व्यक्तिगत जाणीवांना व रुचीला न पटणार्या गोष्टींची म्हणजेच विरोधी दृष्टिकोणांची, संचिकांची, छायाचित्रांची व संकेतस्थळांची इथे मांडणी असू शकते. अशी मांडणी समतोल करण्याच्या व सुसंबद्ध करण्याच्या दृष्टीने येथे संपादन करता येते. धोरणांचे पालन करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी आम्ही लिखाण करणार्या प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहोत. फ्लोरिडासह इतर अनेक ठिकाणी सर्व्हर्स असून तेथील कायद्यांचा परिणाम विकी धोरणांवर होऊ शकतो. प्रत्येक वापरकर्त्याने आपापल्या देशातील कायद्यांबद्दल वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे अपेक्षित आहे.
हेसुद्धा पहा