वामन होवाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वामन होवाळ (इ.स. १९३५:तडसर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - २३ डिसेंबर, इ.स.२०१६:विक्रोळी, मुंबई, महाराष्ट्र) हे आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये सक्रिय असलेले एक मराठी साहित्यिक होते.

मूळचे सांगलीचे असलेले होवाळ उच्च शिक्षणासाठी मुंबईला आले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण आधी ठाण्यात आणि नंतर फोर्टमधील सिद्धार्थ महाविद्यालयात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारतीय रेल्वेत नोकरीला लागले.

यांची पहिली माणूस ही कथा इ.स. १९६३मध्ये कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर सत्यकथा, यशवंत, राजश्री, वसुधा, धनुर्धारी आदी मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या.

त्यांनी पानतावणे यांच्या अस्मितादर्श या नियतकालिकातही लेखन केले. होवाळ यांना दलित साहित्यिकांतील प्रमुख साहित्यिकांतील एक समजले जाते. पहिल्या फळीत वामन होवाळ यांचे नाव घेतले जात

अनुवाद[संपादन]

त्यांच्या मजल्याचं घर, पाऊसपाणी या कथांचे इंग्लिश व फ्रेंच भाषांत अनुवाद झाले आहेत. अन्य काही कथा हिंदी, उर्दू आणि कन्‍नड भाषांतही अनुवादित झाल्या आहेत.

कथाकथन[संपादन]

होवाळ यांना शंकर पाटील, द.मा. मिरासदार, ग.दि. माडगूळकर यांच्या नंतरच्या पिढीतील प्रमुख कथाकथनकार समजले जाते. त्यांच्या कथांमधून दलित ग्रामीण विश्वाचे दर्शन घडते. मुंबईमधील झोपडपट्टीमधील रहिवाशांचे आयुष्यही त्यांनी त्यांच्या कथांमधून रेखाटले.

अभिनय[संपादन]

वामन होवाळ यांनी सदाशिव अमरापूरकर यांच्या चित्रपटात पोलिसाची भूमिका केली होती.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • ऑडिट (कथासंग्रह)
 • आंधळ्याची वरात बहिर्‍च्या घरात (लोकनाट्य)
 • आमचीकविता (संपादन)
 • जपून पेरा बेणं (लोकनाट्य)
 • बेनवाड (कथासंग्रह)
 • येळकोट (कथासंग्रह)
 • वाटाआडवाटा (कथासंग्रह)
 • वारसदार (कथासंग्रह)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

 • दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
 • होवाळ यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत.
 • कारदगा (चिकोडी जिल्हा) येथील साहित्य विकास मंडळातर्फे १ डिसेंबर २००२ रोजी झालेल्या ?व्या कादरगा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद,