वसंत नारायण मंगळवेढेकर
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वसंत नारायण मंगळवेढेकर | |
---|---|
टोपणनाव | राजा मंगळवेढेकर |
जन्म | ११ डिसेंबर, इ.स. १९२५ |
मृत्यू |
एप्रिल १, २००६ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | बालसाहित्यकार, कादंबरीकार, गीतकार |
साहित्य प्रकार | बालसाहित्य, चरित्रे, अनुवाद, कविता |
राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर (११ डिसेंबर, इ.स. १९२५[१] - एप्रिल १, २००६:पुणे, महाराष्ट्र, भारत) हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.[१]
राजा मंगळवेढेकरांचे साहित्य
[संपादन]पुस्तके
[संपादन]- आवडत्या गोष्टी
- आपला भारत (पुस्तक मालिका)
- ऑलिव्हर ट्विस्ट (चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीचे मराठी रूपांतर)
- इंदिरा गांधी (चरित्र)
- कथकळी केरळ
- कथा आणि कथाकथन
- करी मनोरंजन मुलांचे
- कहाणी एका प्रयोगाची
- कुमार संस्कार माला (पुस्तक मालिका)
- शाहीर ग.दि. माडगूळकर
- गांगेय उत्तर प्रदेश
- गांधीजींच्या गोष्टी
- गोनू झाच्या गोष्टी
- तऱ्हा
- तळ्याकाठची अप्सरा
- तेनालीरामाच्या चातुर्यकथा
- देशोदेशींच्या कथा
- धमाल
- नवल कथा एका पुरुषार्थाची (बाळासाहेब भारदे यांचे चरित्र?)
- नवलकहाणी
- पंडित जवाहरलाल नेहरू (चरित्र)
- प्रियतम भारत
- प्रिय पूज्य साने गुरुजी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
- बारकू (रॉबर्ट लुई स्टीव्हनसनच्या ट्रेझर आयलंडचे मराठी रूपांतर)
- बाळांसाठी गाळीव गाणी
- बिनभिंतीची उघडी शाळा (ललित)
- बिरबलचे भाईबंद
- बुद्धी हेच खरे बल
- भले बुद्धिचे सागर नाना (नाना फडणविसांचे चरित्र)
- भारतभाग्यविधाता पं. जवाहरलाल नेहरू (चरित्र)
- भारतरत्न (भाग १, २, ३)
- भारूड (स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरचे अनुभव)
- भूमिपुत्र (चरित्र)
- मराठमोळा महाराष्ट्र
- माझ्या आवडत्या गोष्टी
- मित्राय नमः
- मुक्या
- मुल्लाजीचे किस्से
- मोती
- मोबी डिक
- राजा राममॉहन रॉय
- रॉबिनहूड
- राष्ट्रपिता गांधी (चरित्र)
- विंध्यमित्र मध्य प्रदेश
- विलक्षण ताईत
- वेडगाणी (कविता)
- वेताळाच्या गोष्टी
- शेखचिल्ली एक वल्ली
- समर्थ रामदास (चरित्र)
- सरदारजींच्या गोष्टी
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (चरित्र)
- सहोदर आंध्र
- सुलभ महाभारत
- सुलभ रामायण
- साने गुरुजी (चरित्र)
- साने गुरुजींची जीवन गाथा (चरित्र)
- सिद्धार्थ (गौतम बुद्धाचे चरित्र)
- सेनानी साने गुरुजी (चरित्र)
- स्वतंत्र झाला माझा भारत
- स्वातंत्र्य लढ्यातील कवने (कविता)
- स्वातंत्र्योत्तर माझा भारत
- हा शोध भारताचा (पुस्तक मालिका-१०भाग)
- ज्ञानयोगी ज्ञानेश्वर (चरित्र)
बालनाट्ये
[संपादन]- चतुराई
- बनवाबनवी
गीते
[संपादन]- असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
- ऊर्मिले त्रिवार वंदन तुला
- कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा
- सती तू दिव्यरूप मैथिली
पुरस्कार
[संपादन]- गदिमा पुरस्कार (इ.स. १९९९)
- फुलराणी थिएटरचा 'जवाहरलाल नेहरू स्मृती पुरस्कार' (इ.स. १९९७)
- बालसेवा पुरस्कार (इ.स. १९९५)
- बाबुराव शिरोळे बालसाहित्य पुरस्कार (इ.स. १९९७)
- स्वातंत्र्यसैनिक मामा गवारे फाउंडेशनचा 'बाल आनंद पुरस्कार' (इ.स. १९९५)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b संजय वझरेकर (११ डिसेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ११ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- "राजा मंगळवेढेकर यांची गाणी". 2014-06-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-21 रोजी पाहिले.