लेखापरीक्षण
Appearance
अभियांत्रिकीलेखापरीक्षण ही व्यवसायाचा हिशोब लेखापुस्तकामध्ये द्विनोंदी पद्धतीने योग्य प्रकारे लिहिला गेला आहे की नाही याची फेरतपासणी करण्याची प्रक्रिया होय. लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याला लेखा परीक्षक म्हणले जाते. लेखापरीक्षक हा व्यवसायाचा पगारी नोकर किंवा बाह्य तज्ञ असू शकतो.
उद्देश
[संपादन]- द्विनोंदी पद्धतीने व्यवहारांची नोंद पुस्तपालनाची, लेखाकर्माची तत्त्वे पळून केली गेली आहे की नाही.
- उत्पन्न व खर्च हे चालू आर्थिक वर्षाशी संबंधित आहेत.
- पुढील वर्षात होऊ शकणाऱ्या खर्चासाठी तसेच संभाव्य नुकसानासाठी योग्य ती तरतूद केली आहे.
- सर्व प्रकारचे कर, कायदेशीर तरतुदींचे पालन व्यवसायाने केले आहे.
- उत्पन्नाचे आकडे योग्य आहेत व त्यात फेरफार होऊन व्यवसायाचे नुकसान होण्याची शक्यता नाही.
- खर्चाचे आकडे वाजवी असून खर्च करताना तो कमीत कमी असावा याची काळजी घेतली गेली आहे.
- बँकेचा खाते उतारा, लेखापुस्तकात असणाऱ्या बँकेच्या शिल्लक रकमेशी सुसंगत आहे.
- कामकाजाची पद्धत आर्थिक गैरव्यवहाराना वाव देणारी नाही.
प्रकार
[संपादन]- कायमस्वरूपी लेखापरीक्षण - दर महिन्याला अथवा ठराविक कालावधीनन्तर केले जाणारे लेखापरीक्षण.
- वार्षिक लेखापरीक्षण - वर्षाच्या शेवटी ताळेबंदाचे केलेले लेखापरीक्षण.
- वैधानिक लेखापरीक्षण - कंपनी कायदा अथवा तत्सम कायद्याच्या तरतुदीमुळे केलेलं परीक्षण.
- मालाचे लेखापरीक्षण - ग्राहकाने बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या मालाचे लेखापरीक्षण.