Jump to content

लाल रानकोंबडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाल रानकोंबडा
लाल रानकोंबडा
Gallus gallus

लाल रानकोंबडा (इंग्लिश: Indian Red Junglefowl) हा एक पक्षी आहे.

आकाराने गावकोंबडीएवढा.नरमादीच्या रंगात फरक.मादी उदी रंगाची.त्यावर काड्या.खालून तांबूस उदी.पाळीव बॅटमप्रमाणे ह्या पक्षाचे नर व मादी असतात.जोडीने किंवा समूहाने आढळून येतात. कोकणात डोंगरेन कोंबा,सीम म्हणतात.गोंदियात गेरा गोगूर,कुरु,रेंगाल गोगड,रेंगाल गोगल(भंडारा),गेडा कोक परदा कोभरी(माडिया-गडचिरोली)म्हणतात.हिंदीमध्ये जंगली मुर्ग,जंगली मुर्गा,जंगली मुर्गी,बनमुर्ग,बनमुर्गा,बनमुर्गी,भुरी जंगली मुर्गी,लाल मुर्ग,लाल मुर्गी म्हणतात.संस्कृतमध्ये कृकवाकु,प्रख्यात रक्त वनकुक्कुट,वन कुक्कुट म्हणतात.तेल्गुम्ध्ये येर्र अडवि कोडि,यर्रानि,अडवि कोडि म्हणतात.

वितरण

[संपादन]

निवासी.हिमालयाच्या पायथ्यापासून पाकिस्तान,भूतान आणि अरुणाचल प्रदेश,बांगला देश,ब्रह्मपुत्रेकडील प्रांत,पश्चिम बंगाल,बिहार,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश ते पश्चिम सातपुडा,पश्चिम घाट(खंडाळा).अंदाजे गोदावरी नदीकाठ ते मुखापर्यंत.

निवासस्थाने

[संपादन]

पानगळीची आणि सालाच्या झाडांची दमट जंगले;तसेच शेतीचा भाग विखुरलेली झुडपी जंगले.हिमालयात २००० मीटर उंचीपर्यंत.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली