रियो ग्रांदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रियो ग्रांदे
Rio Grande White Rock Overlook Park View 2006 09 05.jpg
न्यू मेक्सिकोमधील रियो ग्रांदे
उगम रॉकी पर्वतरांग, कॉलोराडो
37°47′52″N 107°32′18″W / 37.79778°N 107.53833°W / 37.79778; -107.53833
मुख मेक्सिकोचे आखात
25°57′22″N 97°8′43″W / 25.95611°N 97.14528°W / 25.95611; -97.14528
पाणलोट क्षेत्रामधील देश Flag of the United States अमेरिका, मेक्सिको ध्वज मेक्सिको
कॉलोराडो, न्यू मेक्सिको, टेक्सास, चिवावा, कोआविला, नुएव्हो लेओन, तामौलिपास
लांबी ३,०५१ किमी (१,८९६ मैल)
उगम स्थान उंची ३,६५८ मी (१२,००१ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४,७१,९००
उगमापासून मुखापर्यंत रियो ग्रांदेचा मार्ग

रियो ग्रांदे (इंग्लिश:  स्पॅनिश: Rio Grande) ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी कॉलोराडो राज्यातील रॉकी पर्वतरांगेत उगम पावते. तेथून आग्नेयेकडे ३,०५१ किमी लांब वाहत जाउन ती मेक्सिकोचे आखात ह्या अटलांटिक महासागराच्या उपसमुद्राला मिळते. अमेरिकेच्या कॉलोराडो, न्यू मेक्सिकोटेक्सास ह्या राज्यांमधून वाहणारी ही नदी अमेरिका व मेक्सिको राज्याची आंतरराष्ट्रीय सीमा ठरवण्यासाठी वापरली गेली आहे. रियो ग्रांदेच्या उत्तरेस टेक्सास राज्य तर दक्षिणेस मेक्सिकोची चिवावा, कोआविला, नुएव्हो लेओनतामौलिपास ही चार राज्ये स्थित आहेत.

ह्या नदीचे पाणी शेती व मानवी वापरासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्यामुळे केवळ २० टक्के पाणी समुद्रापर्यंत पोचते.


मोठी शहरे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: