राष्ट्रीय भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उदाहरणे व अपवाद[संपादन]

पाकिस्तान[संपादन]

पाकिस्तानाच्या इ.स. १९७३ च्या राज्यघटनेतील राष्ट्रीय भाषा असे शीर्षक असलेल्या कलम २५१(१) अनुसार "पाकिस्तानाची राष्ट्रीय भाषा उर्दू असून, पुढील पन्नास वर्षांत तिचा वापर अधिकृत व अन्य कामांसाठी व्हावा, यासाठी तजवीज केली जाईल." इ.स. १९७९ साली संबंधित तरतुदी करण्यासाठी नॅशनल लॅंग्वेज अथॉरिटी नावाची संस्था स्थापण्यात आली.

भारत[संपादन]

राज्यघटनेनुसार भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषा असून, त्यात कुठेही राष्ट्रीय भाषा अशी संज्ञा योजलेली नाही. भारतीय राज्यघटनेच्या ३४३ व्या कलमानुसार प्रजासत्ताकाच्या केंद्रशासनाच्या कार्यालयीन कामकाजासाठी इंग्लिशहिंदी या दोन भाषा वापरल्या जातात, तर राज्यशासनांच्या कार्यालयीन कामकाजासाठी प्रत्येक राज्याच्या अधिकृत भाषा वापरल्या जातात.

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा असल्याचा काही भारतीयांमध्ये गैरसमज आढळून येतो [१].

सिंगापूर[संपादन]

सिंगापुराच्या प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेनुसार मलय भाषा ही मूळ मलय सिंगापुरी रहिवाशांची भाषा प्रजासत्ताकाची अधिकृत, तसेच राष्ट्रीय भाषा आहे. मलय भाषक सिंगापुराचे मूळ रहिवासी असले, तरीही चिनी वांशिक लोकांच्या मोठ्या स्थलांतरामुळे सध्या सिंगापुरात अल्पसंख्य भाषकसमूह आहेत. इ.स. २००० सालातल्या जनगणनेनुसार ४५.५ लाख लोकसंख्येमध्ये मलय भाषक १४ % आहेत. मलयेसोबत इंग्लिश, मॅंडरिन चिनीतमिळ या सिंगापुराच्या अधिकृत भाषा आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारताला राष्ट्रभाषा नाही : गुजरात उच्च न्यायालय" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)